शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया खंडात नव्या युद्धाचे संकेत ! तैवानच्या एअरस्पेसमध्ये २१ चिनी लढाऊ विमानांची घुसखोरी
2
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी सोनाली मिश्रा सांभाळणार रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालकपद
3
गुडन्यूज! कियारा अडवाणीने दिला गोंडस मुलीला जन्म; सिद्धार्थ मल्होत्रा झाला 'नन्हीं परी'चा बाबा
4
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
5
'चॉकलेट हवं असेल तर...' म्हणत ८ वर्षांच्या चिमुरडीवर जंगलात नेऊन अत्याचार, आरोपी मुलगाही अल्पवयीनच !
6
कर्नाटकात २०० रुपयांपेक्षा जास्त नसणार पिक्चरचे तिकीट; सर्व मल्टिप्लेक्ससाठी निर्णय, सरकारची घोषणा
7
तुम्हाला काय अडचण, तुम्ही छपरी आहात का? कोर्टाने हिदुस्तानी भाऊला फटकारलं; म्हणाले, "नॅशनल जिओग्राफी बघा"
8
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीच मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
9
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
10
जीएनएम प्रवेशासाठी घेतली २० हजार लाच; परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
11
प्रचंड उष्णता, उडत होत्या आगीच्या ठिणग्या, तरीही या तंत्रज्ञानामुळे शुभांशू यांचं यान राहिलं सुरक्षित, पृथ्वीवर परतताना यानासोबत नेमकं काय घडलं?
12
95% ने आपटून ₹19 वर आला होता शेअर, दिग्गज गुंतवणूकदारानं खरेदी केले 32.78 लाख शेअर; झटक्यात 10% नं वाढला भाव!
13
विम्याच्या पैशांसाठी केले डबल मर्डर; बाबा बनून कुंभमेळ्यात फिरला, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
15
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
16
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
17
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
18
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
19
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
20
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?

प्रेरणास्थळ ‘अंतरी’चे

By admin | Updated: May 8, 2017 23:37 IST

माझ्या या युगाइतके, इतिहासातील कोणत्याही युगाने पेटविले नव्हते रक्तरंजित वैर परमेश्वराशी. दिसता आहेत मला सहस्र

माझ्या या युगाइतके, इतिहासातील कोणत्याही युगाने पेटविले नव्हते रक्तरंजित वैर परमेश्वराशी. दिसता आहेत मला सहस्र कट्यारी, ईश्वराच्या मारेकऱ्यांनी उपसलेल्या,  त्याच्या उरातील रक्त तांबडे आहे आपल्याप्रमाणे की पांढरे आहे खचलेल्या वृक्षातून वाहणाऱ्या द्रवाप्रमाणे हे शोधण्यासाठी आसुसलेल्या...- कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या या कवितेची आठवण येण्याचे कारण म्हणजे पुतळ्यांसदर्भात शासनाने काढलेला नवा आदेश. एखाद्या महापुरुषाचे एकापेक्षा अधिक पुतळे एकाच शहरात उभारण्यासाठी दोन किलोमीटर हद्दीची मर्यादा आखून देण्यात आली आहे. पुण्यासारख्या शहरात तर चौकाचौकात असे पुतळे असून, वाहतुकीच्या जटिल प्रश्नाला एका अर्थाने हे ‘महापुरुष’ही जबाबदार आहेत. त्याचबरोबर पुतळा उभारणाऱ्या संस्थेवर संबंधित पुतळ्याची देखभाल, पावित्र्य आणि मांगल्य राखण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. पुतळ्यांच्या उभारणीबाबत कोणाचाही विरोध किंवा दुमत असल्याचे कारण नाही. अनुयायांसाठी ती प्रेरणास्थळेच असतात. त्यांच्या रूपाने महापुरुषांच्या विचारशलाका तेवत असतात. परंतु, दुर्दैवाने हा उत्साह टिकत नाही. एखादा पुतळा उभारण्यासाठी गौरव समितीसारखी संस्था उभी राहते. पण त्यानंतर या महापुरुषाच्या नशिबी वनवास येतो. ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक संकटांबरोबर माथेफिरूंपासूनही धोका होतो. मग त्यातूनच दया, करुणेची शिकवण देणाऱ्या महापुरुषांचे अनुयायी हिंसेवर उतरल्याची उदाहरणे आहेत. जयंती, पुण्यतिथीशिवाय या पुतळ्यांची देखभालही होत नाही. यासाठी पुतळा उभारणाऱ्या संस्थेवरच ती जबाबदारी टाकण्याची केलेली तरतूदही स्वागतार्ह आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. ही अट पाळली गेली नाही तर पुतळा हटविण्याबरोबरच दंडाचे अधिकारही या समितीला दिले गेले आहेत. नेत्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनीही ही नियमावली सकारात्मकपणे घ्यावी हीच अपेक्षा आहे. महापुरुषांच्या दोन पुतळ्यांमध्ये किती अंतर आहे यापेक्षा त्याचे विचार आपल्या अंतरी किती वसत आहेत, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.