शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कला समृद्ध करणारे भारतीय

By admin | Updated: November 12, 2014 23:25 IST

दुस:या देशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांनी स्थलांतर केलेल्या राष्ट्राच्या परंपरा कशा समृद्ध केल्या आहेत, याविषयीचे भरपूर वा्मय आढळते.

दुस:या देशातून येऊन स्थायिक झालेल्या लोकांनी स्थलांतर केलेल्या राष्ट्राच्या परंपरा कशा समृद्ध केल्या आहेत, याविषयीचे भरपूर वा्मय आढळते. अमेरिकेतील अर्नेस्ट हेमिंग्वे, रिचर्ड राईटपासून जेम्स बाड्विन आणि एडमंड व्हाईट या लेखकांर्पयत सर्वानी आपल्या ब:याच सवरेत्कृष्ट कलाकृती पॅरिसमध्ये लिहिल्या आहेत. हिटलर आणि स्टॅलीन यांनी केलेल्या छळामुळे लंडनमध्ये आश्रयाला आलेल्या आर्थर कोस्लर, सेबॅस्टिअन हाफनर, जॉर्ज माईक्स या लेखकांनी, तसेच इतिहासकार ई.एच. गोम्ब्रिच आणि एरिक हॉब्सबॉम यांनी, आन्द्रे डय़ूट्श आणि जॉर्ज वेडनफील्ड या प्रकाशकांसह लंडन गाजवून टाकले होते. कारण त्यांना तेथे पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते.
भारतातील ज्या लेखकांनी न्यूयॉर्कमधील साहित्यिक आणि कलात्मक जीवन समृद्ध केले आहे, त्यांच्या कार्याविषयी एखादे पुस्तकच लिहायला हवे. मी तेथे गेलो असताना पाश्चात्त्य संगीताची आवड असलेल्या, भारतातील राणीखेत येथे राहणा:या सकुन अडवाणी या प्रकाशकाचा ई-मेल मला प्राप्त झाला. त्यात अडवाणीने लिहिले होते की न्यूयॉर्क शहर हे तेथे वास्तव्य करणा:या दोघा भारतीयांमुळे ओळखले जाते. त्यापैकी एकजण संपादक आहे, तर दुसरी व्यक्ती वाद्यवृंद संचालक आहे. त्या दोघांची आडनावे मेहता असून त्यापैकी एक पंजाबी आहे, तर दुसरा पारशी आहे. या दोघा व्यक्तींविषयी त्यांच्या मनात कमालीचा आदर असल्याचे अडवाणी यांनी नमूद केले होते. वाद्यवृंद संचालक असलेली व्यक्ती पारशी असून त्याचे नाव झुबिन मेहता आहे. झुबिन मेहता हे मूळचे मुंबईचे रहिवासी असून, त्यांनी आपले भारतीय नागरिकत्व कायम राखले आहे. त्यांनी पाश्चात्त्य संगीतजगतात खूपच नाव कमावले आहे. तेलअविव, बर्लिन, व्हिएन्ना आणि न्यूयॉर्क यांसारख्या मोठय़ा शहरांत त्यांनी ऑर्केस्ट्राचे संचालन केलेले आहे. 
पंजाबी मेहतांचे पहिले नाव अजाई आहे; पण ते सोनी मेहता याच नावाने ओळखले जातात. अमेरिकेतील तीन मोठय़ा प्रकाशकांमध्ये सोनी मेहता यांची गणना करण्यात येते. अल्फ्रेड ए. नॉफ यांच्या कलाकृतींचे अनेक दशकांपासून ते पुनमरुद्रण करीत आले आहेत. न्यूयॉर्कच्या फाईव्ह बरोजच्या टेलिफोन डिरेक्टरीत मेहता आडनाव असलेली शेकडो नावे नोंदलेली आहेत. अनेक मेहता हे वॉल स्ट्रीटवर सट्टेबाजी करीत असतात. काही मेहता हे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आहेत, तर काही मेहता हे ग्रोसरीचे मालक आहेत. काही मेहता लेखकसुद्धा आहेत. झुबिन मेहता किंवा सोनी मेहता हे मॅनहॅटन येथे राहण्यासाठी आले. त्यापूर्वी वेद मेहता हे तेथे वास्तव्य करीत होते.
वेद मेहता हे अनेक वर्षे ‘न्यूयॉर्कर’ या नियतकालिकात काम करीत होते. त्यांनी वाचलेल्या राजकारणावरील तसेच साहित्यावरील पुस्तकांचा परिचय करून घेण्यासाठी त्यांनी नियतकालिकातून लेखमालाही लिहिली होती. वेद मेहता यांचा जन्म 1934 सालचा. त्यांची पत्नी गीता मेहता यांच्यापेक्षा ते नऊ वर्षानी मोठे आहेत. गीता मेहता या स्वत: चांगल्या लेखिका आहेत. त्या अनेक वर्षापासून मॅनहॅटन येथे वास्तव्य करीत आहेत. आणखी एक मेहता आहेत,  त्यांचे नाव सुकेतू मेहता आहे. माङया माहितीप्रमाणो ते ब्रुकलीन येथे राहतात. मुंबईसंबंधी लिहिलेल्या ‘मॅक्ङिामम सिटी’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. ते गीता मेहता यांच्यापेक्षा 2क् वर्षानी तरुण आहेत!
आणखी एका लेखकाने ब्रुकलीन शहरात वास्तव्य केले आहे. ब्रrादेश, इजिप्त, चीन आणि सुंदरबनच्या पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या अनेक कादंब:यांचे ते लेखक आहेत. आपल्या वेगळेपणाविषयी प्रसिद्ध असलेली एक भारतीय निर्माती आहे, तिचे नाव मीरा नायर आहे. त्यांनी निरनिराळ्या  खंडांना भेटी देऊन आपल्या चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. हे चित्रपट निरनिराळ्या कालखंडातील आहेत. मीरा नायर या सध्या न्यूयॉर्क येथे राहतात. दिल्ली विद्यापीठातील घोष यांच्या त्या समकालीन आहेत. घोष यांनी सेंट स्टीफन्स कॉलेजात शिक्षण घेतले, तर नायर यांनी मिरांडा हाऊस येथे शिक्षण घेतले.
पूर्वीच्या पिढीतील ‘मॅनहॅटन मिरांडियन’ अशी ओळख असलेल्या श्रीमती मधुर जाफरी यांनी भारतीय खाद्यपदार्थाची पाश्चात्त्य जगताला ओळख करून दिली आहे. हे कार्य त्यांनी पुस्तकाच्या व टीव्ही शोच्या माध्यमातून केले आहे. माधुरी यांनी लोकप्रिय शेफ असा लौकिक मिळविला आहे. पण त्यापूर्वी त्यांनी नाटकातून आणि चित्रपटातून कामे करून लोकप्रियता मिळविली होती. पूर्वीचे मुंबईकर असलेल्या; पण आता न्यूयॉर्कर झालेल्या इस्माईल र्मचट या निर्मात्यासोबत त्यांनी कामे केलेली आहेत. इस्माईल र्मचट हे त्यांच्या चित्रपटांशिवाय ‘रिमेन्स ऑफ द डे’ आणि ‘हॉर्वर्ड्स एन्ड’ या लघुपटाबद्दलही ओळखले जातात.
विकीपीडियावर न्यूयॉर्कमधील 14क् विद्यापीठे आणि कॉलेजेस यांची नोंद आढळते. त्यापैकी अनेक संस्थांतून भारतीय हे अध्यापनाचे काम करीत आहेत. आपल्या विषयाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी लौकिक मिळविला आहे. अशांपैकी तिघांची नावे अग्रस्थानावर आहेत. हे तिघेही कोलंबिया विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करीत असतात. ते आहेत साहित्याच्या अभ्यासक गायत्री चक्रवर्ती, इतिहासकार पार्थ चॅटर्जी आणि अर्थतज्ज्ञ जगदीश भगवती. पहिले दोघे डाव्या विचारसरणीचे बंगाली आहेत, तर तिसरे गुजराती आहेत. त्यांच्यावर उजव्या विचारसरणीचे लोक हक्क सांगत असतात. पण जगदीश भगवती हे मात्र उदारमतवादी म्हणून ओळखले जातात. ते मुक्त बाजारपेठ आणि विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत.
मॅनहॅटन येथे राहणा:या ई. एस. रेड्डी यांनी अमेरिकेतील राजकारण आणि विद्वत्ता यात भरपूर योगदान दिले आहे. संयुक्त राष्ट्रसंघात ते ज्येष्ठ अधिकारी असून, वंशभेद संपविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. निवृत्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याचे काम हाती घेतले आहे. ते या कामी सर्व वयोगटाच्या अभ्यासकांना लागेल ती मदत  देत असतात. आता न्यूयॉर्कमध्ये असलेल्या शेवटच्या पण अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या व्यक्तीची ओळख करून देतो. ते आहेत सलमान रश्दी. त्यांना जगातील तीन महत्त्वाच्या शहरात दीर्घकाळ राहण्याची संधी मिळाली. त्यांची जोपासना मुंबईत झाली. आपली पहिली कादंबरी त्यांनी लंडनमध्ये लिहिली आणि सध्या त्यांचे वास्तव्य न्यूयॉर्क येथे आहे. या शहराच्या निरनिराळ्या स्पंदनांशी त्यांनी स्वत:ला जुळवून घेतले आहे.
न्यूयॉर्क येथे अनेक दशकांपासून राहणा:या भारतीयांनी तेथील वा्मय, विद्वत्ता, नाटक, चित्रपट आणि संगीत समृद्ध केले आहे. याशिवाय फ्रान्सिस न्यूटन डिसूझा आणि इंद्राणी रहमान यांनी तेथील कला आणि नृत्यपरंपरांमध्ये चांगली भर घातली आहे. न्यूयॉर्कमध्ये वास्तव्य करणारे भारतीय वेगळ्या; पण  एकमेकात गुंतलेल्या जगात काम करीत असतात. ते एकमेकांना मित्र, सहकारी आणि स्पर्धक म्हणूनसुद्धा ओळखत असतात. त्यांच्याविषयीच्या पुस्तकाचे लेखन करताना हस्तलिखिते, पत्रव्यवहार, वृत्तपत्रे इ. प्राथमिक स्नेतांचा वापर करावा लागणार आहे. पण त्याशिवाय मुलाखती आणि आठवणींचाही समावेश करावा लागणार आहे. योग्यत:हेने काम केल्यास हे पुस्तक सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर घालू शकेल. कुणीतरी हे पुस्तक लिहिले पाहिजे. 
 
रामचंद्र गुहा
इतिहासकार