शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

हाेय, भविष्यात रोबो कवींचे संमेलनही हाेईल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2023 09:03 IST

AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणेल अन् साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देईल असा विश्वास काहींना आहे.

- डॉ. दीपक शिकारपूर

आधुनिक माहिती तंत्रज्ञानाने साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणली आहे. संगणक, इंटरनेट आणि इतर तंत्रज्ञानांनी लेखकांना नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. या तंत्राला शत्रू न मानता मित्र माना. अनेक विविध पर्याय उपलब्ध होतील. पूर्वी लेखक हस्तलिखित वापरात असत, त्यात काही चुका आढळल्या आढळल्या तर सर्व मजकूर पुन: लिहावा लागे. २००० नंतर डेस्क टॉप पब्लिशिंग (संगणकीय डेटा एंट्री)मुळे या प्रक्रियेत क्रांती झाली व सर्व घटकांना फायदा झाला (लेखक, प्रकाशक, टंकलेखक). आता यापुढील पायरी २०२५ नंतर येईल. चॅट बॉट्सशी संवाद साधून आपण मजकूर त्वरित संगणकीय फॉरमॅटमध्ये आपोआप  तयार करू शकाल. ना हातांनी लिहिणे, ना संगणकावर टाइप करणे. 

इंटरनेटमुळे (विशेषत: सोशल मीडिया) लेखक आता त्यांच्या साहित्यनिर्मितीला जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचवू शकतात. इतर तंत्रज्ञानांनीही साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात मोठा बदल घडवून आणला आहे. उदाहरणार्थ, थ्रीडी प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लेखक आता त्यांच्या साहित्यनिर्मितीची भौतिक प्रतिकृती तयार करू शकतात.  कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि मशीन लर्निंग (ML) ही अलीकडच्या वर्षांत साहित्यनिर्मितीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारी दोन महत्त्वाची तंत्रज्ञान आहेत. 

AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर साहित्यनिर्मितीच्या विविध पैलूंमध्ये केला जात आहे, जसे की लेखन, भाषांतर, संपादन आणि प्रकाशन. AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देत आहे आणि साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणत आहे.  तंत्रज्ञानाचा वापर करून लेखन प्रक्रिया स्वयंचलित केली जाऊ शकते. AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर करून, लेखकांना साहित्यनिर्मितीसाठी आवश्यक असलेले माहिती आणि संसाधने उपलब्ध करून दिली जाऊ शकतात. AI आणि ML तंत्रज्ञानाचा वापर करून, लेखकांना त्यांच्या साहित्यनिर्मितीमध्ये अधिक सर्जनशील होण्यास मदत केली जाऊ शकते.

काही लोकांचा असा विश्वास आहे की AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे आणि साहित्यनिर्मितीच्या पारंपरिक पद्धतींना आव्हान देणार आहे. तर काही लोकांना हे तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीवर नकारात्मकआणि साहित्यनिर्मितीच्या गुणवत्तेवर परिणाम करेल असे वाटते. आता हा एक चर्चेचा विषय आहे; परंतु, हे निश्चित आहे की AI आणि ML तंत्रज्ञान साहित्यनिर्मितीच्या क्षेत्रावर मोठा प्रभाव पाडणार आहे. कुठलेही तंत्रज्ञान आपण थांबवू शकणार नाही. यामध्ये कटपेस्ट पेरणारे  भोंदू नक्कीच बळी पडतील. चॅट जीपीटी विषय आणि साहित्यप्रकार व शैली सांगितली की, आपोआप कविता करतो. याचा दर्जा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. फक्त अक्षर जुळवून यमक जुळवणारे कवी हे तंत्रज्ञान संपवेल. ज्या साहित्यिकांना सृजनशील कल्पना सुचतात व जर त्या कुठल्याही प्रकार (पॅटर्न)मध्ये मोडत नसतील तर तुम्हाला धोका नाही. उदाहरणादाखल  पावसावर कविता एआयद्वारे अशी सादर झाली.पाऊस पडतो, पाणी वाहते,जमीन ओली होते, झाडे हिरवी होतात.पक्षी गातात, फुले उगवतात, वातावरण ताजेतवाने होते.पाऊस पडतो, हवा शुद्ध होते तापमान कमी होते,मानवांसाठी आरोग्यदायी बनते.पाऊस पडतो, जीवन सुरू होते,पृथ्वी तजेलदार होते,सृष्टी उज्ज्वल होते,पाऊस पडतो, आनंद होतो,सर्व काही नवीन दिसतेजग चांगले बनते.काहींना वरील कविता अगदी बाळबोध वाटेल; पण लक्षात ठेवा हे २०२३ आहे, २०२५ नंतर याचा दर्जा खूपच सुधारेल. कदाचित २०३० नंतर  कविसंमेलनात रोबो कवी (यंत्रकवी) सहभागी होतील व आपल्या कविता सादर करतील. त्यांना बक्षीस मिळाले तर ते कोणी घ्यायचे यावर वादही होतील. एकंदर आगामी काळ साहित्यिकांनाही संभ्रमाचा असेल.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान