शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
3
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
4
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
5
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
6
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
7
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
8
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
9
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
10
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
11
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
12
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
13
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
14
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
15
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
16
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
17
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
18
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
19
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
20
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले

वेध - रेल्वेस्थानक सौंदर्याचा ‘नाशिक पॅटर्न’

By admin | Published: February 18, 2017 12:16 AM

सर्वत्र निवडणुकीची धामधूम सुरू असताना व ‘व्हॅलेण्टाइन डे’ला प्रेमालापाचे दर्शन घडून येत असताना

 व्यवस्थेच्या नावाने बोटे मोडणे, हा अनेकांचा स्थायिभाव झाला असताना कर्तव्य भावनेतून काही तरी करून दाखविण्याची ऊर्मी घेऊन धडपडणारे जेव्हा पुढे येतात तेव्हा ते इतरांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरून जातात, ‘व्हॅलेण्टाईन डे’ला जिकडे-तिकडे प्रेमाचे पाट वाहात असताना नाशकातील ‘हॅण्ड फाउण्डेशन’ तसेच ‘नॅब’ व गुंज फाउण्डेशनसारख्या संस्थांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी घडविलेल्या सामाजिक बांधीलकीच्या प्रत्यंतराकडेही याच भूमिकेतून पाहता येणार आहे.सध्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांचा धुरळा उडत असल्याने राजकीय कार्यकर्त्यांचे बळ निवडणुकीकडे एकवटले आहे, त्यात आरोप-प्रत्यारोप करताना सत्ताधारी असणाऱ्यांनी अमुक एक केले नाही वा तमुककडे लक्ष दिले नाही म्हणून व्यवस्थेच्या अगर यंत्रणांच्या नावाने ठणाणा केला जात आहे. परंतु तसे न करता सामाजिक भान जपून असणाऱ्या संस्था, संघटनांनी आपल्या सेवाकार्याचे वेगळेपण अबाधित राखत, इतरांकडून अपेक्षा करण्याऐवजी आपण काय करू शकतो याचे अनुकरणीय उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. यात हॅण्ड फाउण्डेशनच्या माध्यमातून नाशिकरोड रेल्वेस्थानकाला चढवला गेलेला रंगसाज तर अनोखा ठरावा. ‘व्हॅलेण्टाइन डे’ला नाशकातील विविध चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक संदेश तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, दादासाहेब फाळके यांच्या चित्रांसह नाशिकची ओळख सांगणारी ग्राफिटी साकारल्याने रेल्वेस्थानकाचे अवघे रूपच पालटून गेले आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरून येणाऱ्या-जाणाऱ्या रेल्वेतील प्रवाशांना याद्वारे नाशिकची ओळख घडून येणार आहे. या उपक्रमाची यशस्वीता व त्यातून साधला जात असलेला परिणाम पाहता आता विभागातील जळगाव व भुसावळ येथील रेल्वेस्थानकांवरही असा प्रयोग राबविण्याची मागणी पुढे आली आहे. रेल्वेस्थानकासारखे सार्वजनिक वापराचे ठिकाण म्हटले की, तेथे अपरिहार्यपणे आढळणारी अस्वच्छता व एकूणच उबग आणणारे वातावरण बदलण्याच्या दृष्टीने सदरचा ‘नाशिक पॅटर्न’ निश्चितच उपयोगी ठरू शकणारा आहे.नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड (नॅब) व ‘नाशिक सायकलिस्ट’च्या वतीने समाजातल्या दृष्टीबाधित, दिव्यांग तसेच ‘सेलब्रेल प्लासी’ग्रस्त मुला-मुलींबद्दल स्नेहभाव निर्माण होण्यासाठी करण्यात आलेले डिव्हाईन सायक्लोथॉनचे आयोजनही सामाजिक जाणिवांचा परिचय करून देणारे ठरले आहे. यात दृष्टीबाधीत मुलांनी बोटांच्या चुटकीच्या इशाऱ्याचा मागोवा घेत सायक्लोथॉन पूर्ण केली, तसेच या रॅलीतील दिव्यांगांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन व हेल्मेट वापरण्याबाबत दिलेले संदेश धडधाकटांच्या डोळ्यात अंजन घालणारे ठरले. ‘आम्ही आपल्यापेक्षा वेगळे नाहीत तर आपल्या सारखेच आहोत’ हा त्यांचा संदेशही त्यांच्याकडे वेगळ्या भावाने बघणाऱ्यांची दृष्टी सुधारण्यास उपयोगी ठरावा. विशिष्टावस्थेतील समाज घटकासोबतच्या नात्याची, सहचराची व आपुलकीची वीण यातून घट्ट होण्यास नक्कीच मदत व्हावी. नाशकातील काही उद्योग-व्यावसायिकांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘गुंज फाउण्डेशन’चे कार्यही असेच नजरेत भरणारे व कौतुकास पात्र ठरणारे आहे. साधन-संपन्न कुटुंबात वापरून झालेल्या व अडगळीत पडलेल्या सायकल्स भेट म्हणून स्वीकारायच्या व त्या दुरुस्त करून ग्रामीण भागात शाळेसाठी दूरवरून पायी येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरवायच्या, असा उपक्रम या फाउण्डेशनद्वारे गेल्या अनेक दिवसांपासून राबविला जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत शेकडो गरजू विद्यार्थ्यांची पायपीट थांबविली गेली आहे. प्रत्येकवेळी, प्रत्येक बाबतीत शासकीय मदतीकडे डोळे लावून बसणाऱ्या घटकाला स्वयंसाहाय्याची तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे सारे उपक्रम आहेत. केवळ इतरांकडून अपेक्षा केल्याने काही होत नाही, आपण आपल्याला जे वा जेवढे जमेल ते आणि तेवढे करण्यासाठी पुढे सरसावलो तर बरेच काही आशादायी चित्र रेखाटता येऊ शकेल, तेव्हा केल्याने होत आहे रे, असाच संदेश या उपक्रमांतून मिळून गेला आहे.- किरण अग्रवाल