शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

सारे मशीन करणार, तर माणूस कशाला हवा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2023 08:55 IST

Chat GPT हा चॅटबॉट लेख लिहितो, कविता करतो, हरेक प्रश्नाचे उत्तर देतो. हे नवे तंत्रज्ञान म्हणजे भविष्याच्या दारावरची पहिली ‘थाप’ आहे, हे नक्की!

- साधना शंकर

नववर्षाची चाहूल लागत असतानाच नोव्हेंबर २०२२ मध्ये तंत्रज्ञानाच्या क्षितिजावर Chat GPT नावाच्या तळपत्या आविष्काराची ओळख जगाला झाली. लॉन्च होताच अवघ्या काही दिवसांत १० लाखांहून अधिक वापरकर्ते Chat GPT या चॅटबॉटशी जोडले गेले आणि हा आकडा दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढतो आहे. एव्हाना तुमचीही या नव्या तंत्रज्ञानाशी ओळख झाली असेलच.  नसेल झाली तर धडपड करा आणि हे नवे तंत्र समजावून घ्या.  ही माहिती आपल्याला असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण मानवाने विकसित केलेले हे तंत्रज्ञान म्हणजे भविष्याच्या दारावरची पहिली ‘थाप’  असेल, हे नक्की! 

मी Chat GPT ला पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहेस? स्वत:ची ओळख कशी करून देशील? Chat GPTने मला त्वरित उत्तर दिले, ‘मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. माणसाप्रमाणे विविध विषयांवरील मजकूर लिहिण्यासाठी मला प्रशिक्षित करण्यात आलेले आहे. मला कसलाही वैयक्तिक अनुभव किंवा भावना नाहीत. माझ्याकडे भौतिक शरीरही नाही. माझ्या प्रशिक्षणादरम्यान मला प्रदान केलेल्या डेटावर आधारित माहिती आणि प्रश्नांची उत्तरे मात्र मला देता येतात’. 

Chat GPT हे सॅन फ्रान्सिस्को येथील जगातील आघाडीच्या AI कंपन्यांपैकी एक असलेल्या Open AI कंपनीने विकसित केलेले चॅटबॉट आहे. हे अत्याधुनिक चॅटबॉट मानवी कल्पनांना आव्हान देणारे डोमेन  आहे. मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून, ते संवादाचे अनुकरण करू शकते, चुका सुधारू शकते, अयोग्य / चुकीची अगर अनुचित विनंती नाकारू शकते आणि तुम्ही त्याच्याशी केलेले संभाषण  लक्षातदेखील ठेवते! या चॅटबॉटबद्दल इलॉन मस्क यांची पहिली प्रतिक्रिया वैशिष्ट्यपूर्ण होती. ते म्हणाले, ‘इट इज स्केअरी गुड!’ खरेच आहे ते! भीती वाटावी इतका हा कल्पनातीत प्रकार आहे!

सध्या तरी हे तंत्रज्ञान विनामूल्य आहे, परंतु लवकरच त्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात. Chat GPT त्याच्या नावाप्रमाणे भाषेच्या मॉडेलवर आधारित असलेले तंत्रज्ञान आहे. हे इतर AI तंत्रज्ञानाप्रमाणे व्हिडीओ किंवा फोटो तयार करत नाही. परंतु त्याच्याकडे संवाद करण्याची आणि लिखित शब्दांची सखोल माहिती देण्याची ताकद आहे. इंटरनेटवरील मजकुराचा डेटाबेससारखावा वापर करून हे मॉडेल तयार करण्यात आले आहे. यामध्ये पुस्तके, वेब मजकूर, विकिपीडिया, लेख आणि इंटरनेटवरील लेखनाच्या इतर भागांमधून मिळविलेला सुमारे ५७० GB इतका अतिप्रचंड डेटा समाविष्ट आहे. या चॅटबॉटच्या सिस्टिममध्ये एकूण ३०० अब्ज शब्द फीड केले गेले आहेत. याच माहितीच्या जोरावर हा चॅटबॉट अभ्यास करतो, तुम्ही सांगाल त्या विषयावर लेख लिहितो, तुम्ही विचाराल त्या प्रश्नांची क्षणार्धात उत्तरे देतो, अगदी तुम्ही तर्जुमा सांगितलात तर तुमच्यासाठी पत्र / ई-मेलचा मजकूरही तयार करून देतो!

हा चॅटबॉट तुमच्यासाठी मजकूर तयार करू शकतो, स्क्रिप्ट्स, पुस्तके, कथा, कविता, शोधनिबंध लिहू शकतो, लेख संपादित करू शकतो, क्वांटम मेकॅनिक्स यासारखे अवघड  विषय सोप्या भाषेत स्पष्ट करू शकतो आणि यासारखी अनेक कामे चुटकीसरशी करू शकतो. चॅट जीपीटीचा व्यावसायिक विश्वात डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा, ऑनलाइन सामग्री तयार करणे, कोडिंग, उद्योगाशी निगडित प्रश्नांची उत्तरे देणे यासाठी मोठाच उपयोग होऊ शकतो. 

इंटरनेटवर फक्त ‘चॅट जीपीटीचा उपयोग’ (uses of Chat GPT) टाइप करा, म्हणजे सध्या लोक कशाकशासाठी चॅट जीपीटी वापरत आहेत, हे तुमच्या लक्षात येईल. Google ने Chat GPTसाठी ‘कोड रेड’ जारी केला आहे. चॅट जीपीटी इंटरनेटवरच्या सर्च डोमेनवर असलेल्या गुगलच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकतो. विविध साइट्सवर नेव्हिगेट करण्याऐवजी वापरकर्ते त्यांना हव्या त्या नेमक्या तपशिलासाठी बॉटची मदत घेऊ लागले, तर सर्च इंजिनच्या अस्तित्वाला काही अर्थच  उरणार नाही. Chat GPT केवळ सर्च इंजिनेच नव्हे, तर आगामी काळात इतर अनेक व्यवसाय आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करू शकते.

अर्थात, इतर AI उत्पादनांप्रमाणेच Chat GPTलाही मर्यादा आहेत. मी जेम्स वेब टेलिस्कोपबद्दल प्रश्न विचारल्यावर मला  मिळालेले उत्तर खूप जुने होते. त्याने ते मान्यही केले. ‘कालबाह्य माहितीसाठी दिलगीर आहोत. माझ्या प्रशिक्षण डेटामध्ये  २०२१ पर्यंतचीच माहिती फिड आहे’, असे उत्तर चॅटबॉटने मला दिले. बॉट देत असलेली माहिती इंटरनेटवरील माहितीच्या महासागरातून घेतली जात असल्याने नेटवर याआधीपासूनच अस्तित्वात असलेले पूर्वग्रह आणि चुकीची माहिती देखील मिळू शकते.

अनेकदा  मिळालेली उत्तरे किंवा माहिती चुकीची असू शकते. त्यामुळेच जेव्हा तुम्ही या तंत्रज्ञानासाठी रजिस्ट्रेशन करता तेव्हाही याची पूर्वकल्पना Chat GPT तुम्हाला देतो. मशीन लर्निंगचे तंत्रज्ञान आणि क्षमता सुधारत जातील, तशा या सर्व समस्यांवर आगामी काळात मातदेखील केली जाईल. मग AI च्या विश्वातील ही नवी झेप आपल्याला नेमकी कुठे घेऊन जाणार  आहे? AI मुळे आपला समाज कसा बदलणार आहे? या प्रश्नांची उत्तरे सोपी नाहीत! त्यासाठी काही काळ जावा लागेल.

बहुधा आता मनुष्यप्राण्यालाच आपल्या क्षमतेच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे.  नेहमीची, चाकोरीतली, ठरलेली कामे आहेत, ती  मशीनला करूदे!  आता माणूस म्हणून आपल्याला असे काही नवनिर्माण करावे लागेल, ज्याचा आवाका केवळ मानवी बुद्धीलाच पेलता येऊ शकेल!sadhna99@hotmail.com

टॅग्स :technologyतंत्रज्ञान