शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सहिष्णुतेचे आदर्श

By admin | Updated: June 23, 2017 00:01 IST

असहिष्णुतेमुळे देशातील सामाजिक वातावरण गढुळले असल्याची टीका सातत्याने होत आहे. धार्मिक कारणांवरून परस्परांमध्ये तेढ निर्माण होत आहे.

असहिष्णुतेमुळे देशातील सामाजिक वातावरण गढुळले असल्याची टीका सातत्याने होत आहे. धार्मिक कारणांवरून परस्परांमध्ये तेढ निर्माण होत आहे. तथाकथित गोरक्षकांचे हल्ले, अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करीत आहे. परधर्मीयांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करण्याचे, त्यांच्यावर हल्ले करण्याचे प्रमाण आपल्या देशातच नव्हे, तर जगभर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर, धार्मिक सहिष्णुतेची काही उदाहरणे जगातील इतर देशांसह आपल्या देशातही दिसतात. जर्मनीत बर्लिनमध्ये ख्रिश्चन प्रोटेस्टंट पंथीयांच्या सेंट योहान्स चर्चमध्ये चक्क एक मशीद सुरू करण्यात आली आहे. ‘इबान रुश्द गोयेथ’ या नावाने ही मशीद ओळखली जाते. मुस्लिम विचारवंत इबान रुश्द आणि प्रख्यात जर्मन साहित्यिक योहान व्हॉन गोयेथ यांचे संयुक्त नाव या मशिदीला देण्यात आले आहे. अशीच दुसरी आदर्श घटना आहे संयुक्त अरब आमिरातची राजधानी अबूधाबी येथील. येथील महम्मद बिन झायेद मशिदीचे नाव आता मरियम उम्म इसा (मेरी मदर जिझस) असे करण्यात आले आहे. देशातील विविध धर्मांच्या नागरिकांशी सलोख्याचे संबंध असावेत, या हेतूने हा निर्णय घेण्यात आला आहे.सहिष्णुतेचा आदर्श घालून देणारी उदाहरणे जशी परदेशात घडतात, तशीच आपल्या देशातही घडत आहेत. सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. केरळमधील मल्लपुरम येथे असलेल्या १७ मशिदींपैकी एकाच मशिदीतून अजान (प्रार्थना) ध्वनिक्षेपकावरून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वलिया जुमा या मोठ्या मशिदीतून दिवसातून पाच वेळा दिली जाणारी अजान ध्वनिक्षेपकावरून ऐकवली जाईल. अन्य मशिदीत यावेळी नमाज पढताना ध्वनिक्षेपक वापरला जाणार नाही. दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील बरेली येथे विविध ध्वनिक्षेपकांवरून पहाटे दिल्या जाणाऱ्या अजानच्या आवाजासाठी ध्वनिक्षेपक वापरू नये, या मागणीला काही मुस्लिम बांधवांनीही पाठिंबा दिला आहे. धर्मा-धर्मांमध्येच नव्हे, तर एकाच धर्मातील जाती-जातींमध्ये तेढ वाढविणाऱ्या घटना सध्या घडत आहेत. ही आपली परंपरा नाही. आषाढीसाठी पंढरीला गावागावातून दिंड्या निघाल्या आहेत. धर्म-जातीच्या पलीकडे जाऊन विश्वबंधुत्वाचा संदेश देणाऱ्या आपल्या संतपरंपरेचा विसर कुणालाही पडू नये. त्यासाठी सौहार्दाचे दर्शन घडविणारे असे आदर्श दीपस्तंभाप्रमाणे काम करतील.