शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

पर्यायी ऊर्जानिर्मितीचा विचार हिताचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:17 IST

कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत.

-शिरीष मेढीकच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्या इंधनाचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. इंधनाच्या दरांत सातत्याने वाढ होत असून, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये झालेल्या दरवाढीने महागाईत आणखी तेल ओतले आहे. आजघडीला सर्वत्र वाढत्या इंधनाच्या किमतीवर चर्चा झडत असतानाच आता पर्यायी इंधनाचा विचार, नुसताच विचार नाही तर कृती करण्याची वेळ आली आहे.आपण ऊर्जा प्राप्त करण्यासाठी पेट्रोल, डिझेल, कोळसा व नैसर्गिक वायू वापरत असतो. या चौघांना एकत्रितपणे फोसील इंधन असे म्हणतात. जेवढे फोसील इंधन आपण वापरू तेवढ्या जास्त प्रमाणात कार्बन वायू तयार होतो. कार्बन हा वायू हरित गृह वायू आहे. हा वायू सूर्याकडून आलेली उष्णता पृथ्वीवर येऊ देतो, मात्र रात्री ही वातावरणातील दिवसा शोषलेली उष्णता काही प्रमाणात अडवून ठेवतो व त्यामुळे शोषलेली उष्णता पूर्णपणे पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर पडत नाही. परिणामी पृथ्वीवर जागतिक तापमानवाढ घडून येत आहे. या तापमानवाढीमुळे हवामानात बदल घडत आहेत व हे बदल जीवनास हानिकारक आहेत.तापमानवाढ रोखण्यासाठी मानवाने फोसील इंधनाचा वापर पूर्णपणे थांबविणे आवश्यक आहे. म्हणून सोलार, विंड व समुद्र लाटा यांपासून पुन्हा पुन्हा निर्मित होऊ शकणारी ऊर्जा वापरणे अत्यावश्यक झाले आहे. पृथ्वीचा उगम ४५० कोटी वर्षांपूर्वी झाला व मानवाचा उदय केवळ दीड ते दोन लाख वर्षांपूर्वी झाला आहे. हजारो वैज्ञानिकांनी १९९१ ते २००० या दहा वर्षांत कल्ल३ी१ल्लं३्रङ्मल्लं’ ॠीङ्म२स्रँी१ी इ्रङ्म२स्रँी१ी स्र१ङ्मॅ१ें या संशोधन प्रकल्पात हवामानातील बदल याबाबत काम केले. या संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी आपले निष्कर्ष ॠ’ङ्मुं’ उँंल्लॅी ंल्ल िएं१३ँ र८२३ीे : अ ढ’ंल्ली३ वल्लीि१ ढ१ी२२४१ी या पीडीएफ स्वरूपातील पुस्तकात मांडले आहेत. ते असे मांडत आहेत की मानवाचा निसर्गामधील हस्तक्षेप १९५० पासून एवढा वाढला आहे की ज्या अवस्थेत निसर्ग याआधी लाखो वर्षे अस्तित्वात होता, तो निसर्ग आता अभूतपूर्व व वेगळ्याच व धोकादायक अवस्थेत पोहोचला आहे.२०१५ च्या पॅरिस वसुंधरा परिषदेत नासाचे माजी डायरेक्टर जेम्स हॅनसेन व अन्य हवामान वैज्ञानिक सांगत होते की, विकसित व अविकसित देशांनी अनुक्रमे १० व ५ टक्के कपात दरवर्षी करावी. पण या व आधीच्या वसुंधरा परिषदांनी (१९९२ ची रियो परिषद व २००२ ची जोहान्सबर्ग परिषद) असा निर्णय घेतला नाही. म्हणूनच जेम्स हॅनसेन यांनी या परिषदेचे वर्णन ॅ१ीं३ी२३ ा१ं४ िंँ्रल्ल२३ ँ४ेंल्ल्र३८ असे केले होते. यासंदर्भात प्रमुख बदल वातावरणातील कार्बन डायआॅक्साइडच्या प्रमाणात झाला. वैज्ञानिकांनी दोन्ही ध्रुवांवर पाच-सहा किमी खणून गेल्या चार-पाच लाख वर्षांपूर्वीच्या मिळालेल्या हवेच्या नमुन्यात असे कळले की गेल्या ७० वर्षांचा काळ सोडला तर वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड कधीही २८०-३०० पीपीएमपेक्षा जास्त नव्हता. वातावरण व समुद्राचे पाणी या दोघांत कार्बन शोषून घेतला जात असे तसेच तो कधीही १८० पीपीएमपेक्षा वातावरणात कमी नव्हता. आता वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४१० पीपीएम आहे.हवामान वैज्ञानिकांनी सांगितले आहे की, कार्बनचे वातावरणातील प्रमाण ३५० पेक्षा जास्त असेल तर पृथ्वीवरील तापमान जीवनास हानिकारक असेल. शेतीसाठी केवळ गरम हवामान असणे पुरेसे नाही, तर स्थिर व अंदाज करणे शक्य असणाºया हवामानाची आवश्यकता असते. पण हवामानात तीव्र वेगाने बदल घडून येत आहेत. वाळवंट असणाºया राजस्थानात गेली दोन वर्षे अनेक ठिकाणी अति पाऊस पडून पूर आले. मार्चमध्ये युरोपातील अनेक देशांत व अमेरिका, कॅनडा या देशांत मोठी हिमवादळे आली. जगभर वादळांची तीव्रता व वारंवारता वाढत चालली आहे.(हवामान विषयाचे अभ्यासक)