शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

...अखेर आपली 'योग्यता' तरी काय आहे?

By विजय दर्डा | Updated: January 22, 2024 07:25 IST

प्रजासत्ताक अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी सरकारपेक्षाही जास्त सामान्य नागरिकांचीच आहे, हे आपण सतत का विसरून जातो?

- डाॅ. विजय दर्डा 

मध्य प्रदेशमधील शाजापूर येथे किशोर कान्याल या आयएएस अधिकाऱ्याने ट्रक असोसिएशनच्या बैठकीत एका ट्रक ड्रायव्हरला म्हटले ‘तुझी लायकी तरी काय आहे?’ ही बातमी अलीकडे बरीच व्हायरल झाली. राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी कान्याल यांना तत्काळ जिल्हाधिकारी पदावरून हटवले. माध्यमांनी जेव्हा संबंधित ड्रायव्हरला विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘आमची लायकी काय आहे? हाच तर खरा प्रश्न आहे.’ या घटनेबद्दल वाचताना मला ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर’ पुरस्कार वितरणाचा प्रसंग आठवला. सुप्रसिद्ध चित्रपट कलावंत नाना पाटेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला होता की, ‘आम्हा मतदारांना काही किंमत आहे काय?’

या आठवड्यात आपण ७४वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आपण प्रजासत्ताकाच्या ७५व्या वर्षात म्हणजेच अमृतकाळात  प्रवेश करू. या देशात सामान्य माणसाची लायकी खरोखर काय आहे, हा प्रश्न या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचा आहे... कारण जगाला प्रजासत्ताकाची भेट भारतानेच दिली होती!  साधारणत: २,५०० वर्षांपूर्वी वैशालीच्या लिच्छवी राजांनी प्रजासत्ताकाची व्यवस्था निर्माण केली. संयुक्त राष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिच्छवी गणराज्याची चर्चाही केली होती; परंतु, आपण इतिहासाबद्दल नव्हे तर वर्तमान काळाविषयी बोलत आहोत. सैद्धांतिक दृष्टीने पाहिले तर आपण मतदार सर्वशक्तिमान आहोत.

आपल्याला वाटेल त्याला आपण सत्तेच्या शिखरावर नेऊन बसवतो किंवा नकोसा होईल त्याची सत्ता उखडून टाकतो. आपल्या शक्तीबद्दल कोणतीच शंका नाही; परंतु, प्रश्न आहे तो दोन निवडणुकांच्या मधल्या काळात येणाऱ्या पाच वर्षांत जेव्हा सरकार आपल्या मर्जीने चालत राहते तेव्हाचा! या काळात सामान्य माणसाची किंमत काय असते? कान्याल यांच्याच शब्दात विचारायचे तर ‘लायकी काय असते?’ मला आपल्या देशाच्या व्यवस्थेकडे त्रिमितीय नजरेने पाहण्याची संधी मिळाली आहे. मी एक सामान्य मतदार तर आहेच; शिवाय राजकीय नेताही आहे आणि पत्रकारसुद्धा. त्यामुळे मला जास्त खोलात जाऊन माहितीपर्यंत पोहोचता येते. मी सत्तेबरोबरच व्यवस्थेचीही परीक्षा घेऊ शकतो; आणि गण म्हणजे सामान्य माणसाच्या भूमिकेचे विश्लेषणही करतो.

पहिल्यांदा सामान्य माणसाचा विचार करू. मत देताना तो सर्वांत आधी उमेदवार कुठल्या जातीचा, धर्माचा आणि कुठल्या प्रदेशातला आहे याचा विचार करतो. धर्म, जात आणि प्रदेश जेव्हा देशापेक्षा मोठे होतात तेव्हा ती गंभीर चिंतेची गोष्ट ठरते. अनेक मतदार तात्कालिक आमिषांना बळी पडतात. कोण निवडून आल्याने देशाचे किंवा राज्याचे भले होईल, याचा विचारही असे लोक करत नाहीत. परिणामी, लोकशाहीच्या मंदिरात अनेकदा भंगलेल्या मूर्तीही स्थापित होतात. अशा मूर्ती अत्यंत चलाखीने तंत्र आपलेसे करतात आणि ‘व्यवस्था’ आपल्याला अनुकूल करून घेतात.  सामान्य माणसाचे जगणे सुकर व्हावे, हा सरकारच्या सर्व योजनामागील हेतू असतो हे नक्कीच; परंतु, व्यवस्थेत विसंगती निर्माण होतात तेव्हा त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसालाच भोगावे लागतात. 

मी दोन उदाहरणे देतो. सरकार कोट्यवधी लोकांना मोफत धान्य देते; परंतु, झारखंडमध्ये  केवळ दोन वेळचे अन्न न मिळाल्याने एखादी महिला मृत्युमुखी पडत असेल आणि त्यामागे तिला रेशन कार्ड मिळाले नाही, हे कारण पुढे येत असेल तर अशा स्थितीत आपण काय म्हणाल? ज्या अधिकाऱ्याकडे सर्वांत आधी हे प्रकरण गेले असेल त्याने जर थोडी संवेदनशीलता दाखवली असती तर समृद्धीच्या दिशेने निघालेल्या या देशात ही वेदनादायी मृत्यूची घटना घडली नसती. दुसरी घटना आपल्याला कदाचित आठवत असेल. एका सरकारी इस्पितळात रुग्णवाहिका असूनसुद्धा एका व्यक्तीला ती मिळाली नाही आणि त्याला त्याच्या बायकोचे प्रेत खांद्यावर टाकून गावी न्यावे लागले.  महाराष्ट्राच्या मेळघाटात कुपोषण आणि आजारपणामुळे दरवर्षी शेकडो मुले मृत्युमुखी पडतात. देशात न जाणे असे किती आदिवासी प्रदेश आहेत आणि तिथे काय काय घडत असेल? अशा आणखीही कितीतरी घटना आहेत. प्रश्न असा आहे की, सरपंचापासून जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार किंवा मंत्री इतक्या शक्तिसंपन्न स्थानावर असूनसुद्धा जर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकत नसतील तर त्यांच्याविरुद्ध आपण नागरिक सामूहिकरीत्या आवाज उठवण्याची हिंमत का करू शकत नाही? ही ताकद नागरिकांमध्ये का नाही? 

प्रजासत्ताक  अधिक सुदृढ करण्याची जबाबदारी सरकारपेक्षाही जास्त सामान्य लोकांची आहे हे तर नक्कीच! आपल्या गावात डॉक्टर येत नसेल तर या गैरसोयीविरुद्ध आपण का उभे राहू नये? आपल्या शहरात वाहतुकीची दुरवस्था झाली असेल तर आपण स्वत: आधी वाहतुकीचे नियम पाळून दुसऱ्यांना ते पाळायला का लावू नये?... पण कशाला या भानगडीत पडायचे, असा विचार आपण करतो. जसे चालले आहे तसे चालू द्या, आपले तर ठीक चालले आहे ना..! ‘आपले ठीक चालले आहे’ हा विचारच प्रजासत्ताकाला हळूहळू उद्ध्वस्त करत जातो.माखनलाल चतुर्वेदी यांच्या ओळी मला आठवतात :हाय, राष्ट्र मंदिर में जाकरतुमने पत्थर का प्रभू खोजालगे मांगने जा कर रक्षा औरस्वर्ण-रूपे का बोझा? मैं यहां चला पत्थरों पर चढमेरा दिलबर वहीं मिलेगा फूंक जला दे सोना चांदीतभी क्रांतिका सुमन खिलेगाप्रजासत्ताक दिनाचा शुभेच्छा आधीच देतो.जय हिंद!

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश