शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

संन्याशांनी राजकारणात उतरणे कितपत योग्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 03:11 IST

भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही मानवाला कर्म हे लागलेलेच आहे. त्यापासून त्याची सुटका होणे शक्य नाही. उदाहरणार्थ, एखाद्या संन्याशाला किंवा सर्वसंगपरित्याग केलेल्या व्यक्तीला अन्नासाठी भीक ही मागावीच लागते किंवा उन्हापावसातून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी गवताची का होईना झोपडी करावीच लागते.

- डॉ. भारत झुनझुनवाला(माजी प्राध्यापक आय.आय.एम. बेंगळुरू)भगवद्गीतेच्या शेवटच्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही मानवाला कर्म हे लागलेलेच आहे. त्यापासून त्याची सुटका होणे शक्य नाही. उदाहरणार्थ, एखाद्या संन्याशाला किंवा सर्वसंगपरित्याग केलेल्या व्यक्तीला अन्नासाठी भीक ही मागावीच लागते किंवा उन्हापावसातून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी गवताची का होईना झोपडी करावीच लागते. भगवान कृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला की, तुला युद्ध करायचेच असेल तर ते निर्धाराने कर, उत्साहाने कर आणि युद्धात यश मिळो की अपयश, तू विचलित होऊ नकोस. भगवंतांनी या पद्धतीची शिकवण दिल्यावर अर्जुनाने महाभारत युद्ध लढले ते अत्यंत विरागी वृत्तीने! महात्मा गांधी हे देखील अलीकडच्या काळातील विरागी वृत्तीने राहण्याचे एक उदाहरण आहे.महात्मा गांधींना बाह्य जगात कृतिपर व्हावे लागले पण अंतरंगात मात्र त्यांच्या विरागी वृत्ती ओतप्रोत भरलेली होती. विवाह करूनही ते संन्यस्त जीवन जगले, पण संन्यासी असूनही त्यांनी संन्याशाची भगवी वस्त्रे कधी परिधान केली नाहीत. संत कबीर आणि रामकृष्ण परमहंस हेही उत्तम शिक्षक होते. बाह्य जगात ते वैवाहिक जीवन जगत असले तरी त्यांचे अंतरंग मात्र विरागी वृत्तीने भरलेले होते. गृहस्थी जीवनाची कर्तव्येही ते पालन करीत होते. पण अशातºहेचे अंतर्यामी संन्यस्त जीवन जगणे हे केवळ महान व्यक्तींनाच शक्य आहे आणि त्या महान व्यक्तींमध्ये अर्जुन, कबीर, रामकृष्ण परमहंस आणि महात्मा गांधी यांचा समावेश करावा लागेल. आपणही समाजात काम करीत असताना मोहमायेत गुंतून पडत असतो. आपण एखादे रोपटे आपल्या परसात लावले तरी त्या रोपट्याविषयी आपल्या मनात ममत्व निर्माण होत. धनुर्विद्येत पारंगत झालेल्या व्यक्तीला आपल्या धनुर्विद्येचे प्रात्यक्षिक पाहण्याची स्वाभाविक इच्छा होत असते. निस्संग व्यक्ती जशी मायामोहापासून अलिप्त राहू शकते, ती क्षमता प्राप्त करण्यासाठी सामान्य व्यक्तींनी काय करायला हवे?या प्रश्नाचे उत्तर प्राप्त करण्यासाठी चार आश्रमांची निर्मिती करण्यात आली आहे. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे विद्यार्थी असणे. गृहस्थाश्रम म्हणजे कुटुंबवत्सल असणे. वानप्रस्थाश्रम आणि सरतेशेवटी संन्यासाश्रम, त्यामागे कल्पना अशी असावी की व्यक्तीला त्या त्या आश्रमात त्या त्या आश्रमाची कर्तव्ये पार पाडता यावीत. लहान मूल चेंडू खेळत असते. पण सतत चेंडू खेळून खेळून किंवा बाहुलीशी खेळून त्याला त्याचा कंटाळा येतो. मग त्याला खेळण्याच्या दुकानासमोर जाताना चेंडूचे किंवा बाहुल्यांचे आकर्षण वाटत नाही, त्याचप्रमाणे माणसामध्ये कालांतराने अधिकार, पैसा आणि कुटुंब याबद्दलही वैराग्य निर्माण होते. त्यानंतर त्याने हलके हलके वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रमाकडे वळायचे असते. पण या चार अवस्थांमधून जाण्याचा त्यांना कंटाळा येतो. ते गृहस्थाश्रम आणि वानप्रस्थाश्रम टाळून सरळ संन्यासाश्रमाची वाट पकडतात. त्यामुळेच काही तरुण लोक संन्यासी बनून भगवी वस्त्रे परिधान करून वावरताना दिसतात. अशा तरुण संन्याशांचे कर्मफळाविषयीचे आकर्षण कमी होत नाही. कारण त्यांच्या वृत्ती वैराग्यपूर्ण नसतात! अन्यथा त्यांना संन्यस्तपणाचा देखावा करण्याची गरज पडली नसती. अर्जुन किंवा गांधी हे वृत्तीने विरागी होते पण त्यांचे अंतर्याम कितपत विरागी होते हे सांगणे कठीण आहे. अंतर्यामी ते गुंतलेले असू शकतात किंवा सर्वसंगपरित्याग केलेलेसुद्धा असू शकतात. पण अंतर्यामी अलिप्त झालेली व्यक्ती कृतिप्रवण असू शकते. जसे योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाचे आव्हान स्वीकारले आहे. पण ते स्वीकारताना त्यांनी संन्यस्त वृत्तीची बाह्य प्रतिके, जसे भगवी वस्त्रे, कायम ठेवली आहेत! त्यामुळे ज्या व्यक्ती क्रमाक्रमाने संन्यासाश्रमाकडे वळत असतात, त्यांना योगी आदित्यनाथांचा राजकारणातील वावर पाहून तशीच कृती करण्याचा मोह होऊ शकतो. अशा व्यक्तींनी संन्यस्त वृत्तीचा त्याग करून सरळ बाह्य जगात प्रवेश करणेच योग्य ठरेल.माझा एक मित्र ख्रिश्चन पाद्री होता. त्याने आपले धर्मगुरुपद सोडून दिले आणि तो सर्वोच्च न्यायालयात वकिली करू लागला. मला वाटते त्याने आपल्या कृतीने लोककल्याणाचा योग्य मार्ग स्वीकारला होता! पण हिंदू परंपरेत संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी दिली जात नाही. मला वाटते हिंदू धर्मानेही तेवढे सहिष्णु होऊन संन्याशांना गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी द्यायला हवी!अंतर्यामी संन्यस्त वृत्ती बाळगणारी व्यक्ती जर मुख्यमंत्री झाली तर ती स्थिती अधिक घातक ठरू शकते. ती व्यक्ती भगवी वस्त्रे परिधान करून आपल्या हातात अधिक सत्ता एकवटायला सुरुवात करील आणि तसे करताना ती खड्ड्यात जाईल. वरकरणी भगव्या वस्त्रांच्या पेहरावाने ती व्यक्ती चार आश्रमातून क्रमाक्रमाने प्रवेश करणाऱ्या व्यक्तींसाठी चुकीचा संदेश देत राहील!!

टॅग्स :Politicsराजकारण