शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

आभामंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:07 IST

प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.

प्रा. डॉ. संदीप ताटेवार|पदार्थविज्ञानाच्या शास्त्रानुसार प्रत्येक पदार्थ आपल्यापासून शक्ती परावर्तित करीत असतो. वैश्विक शक्तीसुद्धा आपल्यामध्ये अंतर्भूत असते. त्यामुळे प्रत्येक पदार्थाभोवती एक शक्तीचे प्रकाशित वलय निर्माण होत असते.प्रकाशाचे वलय प्रत्येक माणसाभोवती निर्माण होत असते, यालाच आभामंडळ, प्रभावमंडळ किंवा औरा असे म्हटल्या जाते. आभामंडळचा उल्लेख शास्त्र पुराणातही केल्या गेला आहे. आपले आभामंडळ आपल्यासोबत २४ तास असते. आपले आभामंडळ हे विविध रंगांनी व त्याच्या प्रखरतेने, आकाराने बनले असते व त्याची जाडीसुद्धा कमी जास्त असते. संत महात्मा यांच्या आभामंडळची जाडी काही किलोमीटर व साधारण माणसाच्या आभामंडळची जाडी काही इंचापर्यंत असू शकते. प्रत्येक माणसाच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक व भावनिक अवस्थेनुसार आभामंडळ बदलत असते. आपल्या या चार अवस्था जेवढ्या पवित्र होत जातात तेवढ्या प्रमाणात आपले आभामंडळ चांगले होत जात असते. आभामंडळ म्हणजे आपल्याभोवती निर्माण झालेले एक सुरक्षा कवच होय कारण जेवढे आपले आभामंडळ चांगले व जास्त जाडीचे तेवढा आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव कमी प्रमाणात पडत असतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत जात असते. आपल्या आभामंडळाचा फोटो कीर्लीयान फोटोग्राफीद्वारे घेता येऊ शकतो.आजकाल तर साध्या फोटोवरून सुद्धा आधुनिक स्वॉफ्टवेअरद्वारे आभामंडळचा फोटो घेता येतो. जेव्हा आपण आजारी, दु:खी, निराश, हिंसक, क्रोधी, मत्सरी, नकारात्मक असतो त्यावेळेस आपले आभामंडळ चांगले नसते. मात्र जेव्हा आपण आनंदी, उत्साही, सकारात्मक, प्रेमळ, आध्यात्मिक असतो तेव्हा त्यामध्ये शक्तीचा प्रवाह सुरळीत आढळतो व आभामंडळ चांगले होते.आभामंडळाच्या फोटोच्या अभ्यासावरून आपली शक्ती शरीराच्या कोणत्या अवयवात खंडित झालेली आहे व भविष्यात आपल्याला होणाऱ्या आजाराचे निदान करता येते. रेकी या उपचार पद्धतीत आभामंडळ शुद्ध करून उपचार केला जातो .प्राणायाम, ध्यानधारणा, सत्संग, योग अभ्यास यासारख्या उपायांनी आपली आध्यात्मिक शक्ती वाढवून आपले आभामंडळ चांगले करता येते. म्हणूनच आपल्या व्यावहारिक जीवनात अध्यात्माला अनन्य साधारण महत्त्व आहे.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक