शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

हे सरत्या वर्षा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 01:27 IST

 तू निघालास म्हटल्यानंतर दिलासा वाटतो आहे आज! शंकेची पाल घेऊनच आला होतास तू!

प्रिय २०२०, तुला काळाच्या पटावरील बॅडपॅच समजावं की, समस्त मानव जातीला पडलेलं दु:स्वप्न? यापैकी काहीही म्हटलं तरी तुला फारसा फरक पडणार नाही. तुला जसं वागायचं होतं, तसा वागलास; जे रंग दाखवायचे होते ते दाखवलेस. त्याचे भोग आम्ही भोगतोच आहोत.  तू निघालास म्हटल्यानंतर दिलासा वाटतो आहे आज! शंकेची पाल घेऊनच आला होतास तू!

चीनमध्ये काही तरी घडतंय, अशी कुणकुण तुझ्या आगमनासोबतच लागली होती; पण तुझ्या आगमनाच्या आनंदात आम्ही तिकडं दुर्लक्ष केलं. नव्या वर्षाचं आगमन सुखाची चाहूल देतं. पण इथं भलतंच झालं. खरंतर अशा अनेक संकटांचा सामना आमच्या पूर्वजांनी अगोदरच केला होता आणि आता तर आम्ही अत्याधुनिक साधन सामुग्रीनं सज्ज होतो; पण तरीही तू मात्र आमच्या भ्रमाचा भोपळा फोडलास. अखिल मानव जात किती क:पदार्थ आहे, हे दाखवण्याचा तुझा प्रयत्न होता. तू माणसाला माणसापासून तोडलेस, नाती विसकटून टाकलीस.

गावगाडा उद्‌ध्वस्त केलास. व्यापार, उदीम बसवलास. जणू काही जगरहाटीच थांबवण्याचा प्रयत्न केलास. जगभर स्मशानशांतता पसरवण्याचा प्रयत्न केलास. माणसांना घरात कोंडलं. चेहऱ्याला मास्क लागले. मृतदेहाचे खच पडले. दवाखाने भरून गेले. लॉकडाऊनच्या रूपानं तर संपूर्ण जगानं स्मशानशांततेचा अनुभव घेतला. गावावर मरणकळा उतरली. एक भयाण, भेसूर वातावरण निर्माण झालं. प्रत्येक जण क्षणाक्षणाला कणकणानं मरत होता.  आज हा गेला, उद्या आपण तर नाही, ही धडकी प्रत्येकाच्या मनात होती. जिवंत असताना मरणाचा अनुभव देणारा तू. जगभर तू अक्षरश: तांडव घातलंस. वर्षभरात ना तू कुठले सण साजरे करू दिलेस, ना जल्लोशाची मोकळीक दिलीस. मुलीची पाठवणी आणि सुनेचं स्वागत हे आयुष्यातील परमोच्च आनंदाचे क्षण; पण तुझ्या कृष्णछायेत भीतीच्या सावटाखाली तेही गुदमरले.  ना दिवाळी-दसरा ना नाताळ, सारी मरणकळा.. एवढी तुझी दहशत!

‘अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी जगदीशा’ असं म्हणणारे आम्ही जिवाच्या आकांतानं पाय रेटत हजारो मैल दूर गावाच्या ओढीनं धावत निघालो. त्यात किती जीवांची फरफट झाली. रेल्वे रुळावर रक्ताळलेला भाकरीचा चंद्र पाहून आमची नजर शून्यवत झाली; पण तुला दया आली नाही. सगळं आसमंत उद्‌ध्वस्त होत होतं. अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर होताना उघड्या डोळ्यांनी दिसत होता. तुझ्याशी दोन हात करण्याची जिगीषा जिवंत ठेवत असताना तू मात्र जगभर भस्मासुरासारखा उच्छाद मांडला होतास. मार्कंडेय पुराणातील रक्तबीज असुराशी तुझं साम्य आहे, हे सरत्या वर्षा! या असुरानं कठोर तपश्चर्येच्या जोरावर ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं.  वर मिळताच रक्तबीज असुर शक्तिमान बनला आणि त्यानं पृथ्वीवर उच्छाद मांडला. लढाईत जखमी होताच जमिनीवर पडणाऱ्या त्याच्या रक्ताच्या थेंबांतून नवा रक्तबीज जन्माला येत असुरांची संख्या वाढत होती. त्याच्या अत्याचारानं सर्व देव भयभीत झाले  आणि  त्यांनी देवीकडे प्रार्थना केली. देवीनं आपल्या जिभेचा आकार वाढवत रक्तबीजाशी युद्ध केलं आणि त्याच्या रक्ताचा प्रत्येक थेंब जिभेवर झेलला. अशा रीतीनं रक्तबीज असुराचा अंत झाला.  

तुझ्या खांद्यावर बसून आलेला कोरोना हा रक्तबीजच तर होता ! त्याच्या नाशासाठी लसीचं अस्र शोधलं आहे. त्याचा अंत जवळ आला आहे.  या पृथ्वीवरचा मानवाचा लाखो वर्षांचा इतिहास हा संघर्षाचा आहे. अशा हजारो संकटांशी दोन हात करणं हे आमच्या पेशी-पेशींमध्ये भिनलेलं आहे.  कोरोना आमच्या पेशीवर हल्ला करीत असला, तरी प्रसंगी आमची प्रत्येक पेशी सैनिक बनते, हे तुला माहीत नव्हतं!  त्याचा सामना करण्यासाठी आम्ही एकजूट केली. गावोगाव तटबंदी उभारली. दिसताक्षणी त्याला अटकाव करण्याची मोहीम उघडली.  अक्षरश: प्रत्येक जण कोरोना योद्ध्याच्या भूमिकेत शिरला.

एका अर्थानं तुझे आभारही मानायला हवेत, हे सरत्या वर्षा!  तू आमच्या अहंपणाचा फुगा फोडलास, आमच्या कुटुंबाची आम्हालाच नव्यानं ओळख करून दिलीस. कुटुंब नावाची मोठी शक्ती आपल्यामागं असते याची अनुभूती दिलीस. पैशाची किंमत कळली. त्याचवेळी पैसा सर्वस्व नाही, हेही तू पटवून दिलंस. कमी पैशात आनंद मिळतो हे शिकवलंस. आयुष्याचे सगळे रंग अनुभवले. आरोग्याची महती समजली. माणूसपण गवसलं आणि तुझ्यासारख्या राक्षसांबरोबर लढण्यासाठी हत्तीचं बळ दिलंस. आणखी काय पाहिजे? हे सरत्या वर्षा, तू निघाला आहेस आता, तर मुकाट निघ आणि काळाच्या कृष्णविवरात गडप हो! जाताना जरा काळजी घे. नवेकोरे वर्ष दारात  उभे आहे, त्याच्यावर तुझी सावली नको!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या