शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

हृदयस्पर्शी अंजन

By admin | Updated: November 20, 2015 03:11 IST

‘तुम्हाला माझ्यातर्फे द्वेषाची भेट मिळणार नाही’. वरकरणी अगदी साधे वाटणारे हे वाक्य मंगळवारी अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरले. हे एखाद्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकातील वाक्य नाही

‘तुम्हाला माझ्यातर्फे द्वेषाची भेट मिळणार नाही’. वरकरणी अगदी साधे वाटणारे हे वाक्य मंगळवारी अवघ्या जगात चर्चेचा विषय ठरले. हे एखाद्या ‘बेस्ट सेलर’ पुस्तकातील वाक्य नाही किंवा एखाद्या थोर विचारवंताच्या लेखणीतून अथवा मुखातूनही स्त्रवलेले नाही. हे आहे एका ‘फेसबुक पोस्ट’मधील वाक्य! दररोज अशा अब्जावधी ‘फेसबुक पोस्ट’ लिहिल्या जात असतात. मग त्यापैकीच एका ‘फेसबुक पोस्ट’मधील या साध्यासुध्या वाक्यात असे काय दडले आहे, की मंगळवारी सकाळी सकाळी ते ६० हजारपेक्षाही जास्त वेळा ‘शेअर’ केले जावे? त्यामागचे कारण हे आहे, की हे वाक्य पॅरिसवरील नृशंस दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या एका तरुणीच्या शोकमग्न पतीने, आईविना पोरक्या झालेल्या अवघ्या १७ महिन्यांच्या तान्हुल्याच्या बापाने, दहशतवाद्यांना उद्देशून लिहिलेले वाक्य आहे. पत्नीवर जीवापाड प्रेम करणाऱ्या, तिला ‘लव्ह आॅफ माय लाईफ’ संबोधणाऱ्या अ‍ँटवन लिरिसच्या विदीर्ण मन:स्थितीची कुणीही सहृदयी सहज कल्पना करू शकतो. अशा वेळी सर्वसाधारणत: मनात उफाळून येतो, तो हल्लेखोरांविषयी पराकोटीचा द्वेष, सुडाची भावना! परंतु १२ वर्षांपूर्वी हेलन मुयलच्या प्रेमात आकंठ बुडून, तिला जीवनसंगिनी बनविलेल्या अ‍ँटवनच्या मनात अशी कोणतीही भावना उफाळून आली नाही. त्याने हल्लेखोरांना द्वेषाच्याही लायकीचे समजले नाही. अ‍ँटवन हा नभोवाणी पत्रकार आहे. हल्लीच्या नभोवाणी स्थानकांवरील कार्यक्रम म्हणजे शब्दांचा अक्षरश: धबधबाच असतो. अ‍ँटवनने मात्र त्याची ‘फेसबुक पोस्ट’अत्यंत मोजक्या आणि अत्यंत परिणामकारक शब्दात लिहिली आहे. अत्यंत हृदयस्पर्शी अशी ही ‘फेसबुक पोस्ट’ मुळातून वाचण्यासारखी आहे. हल्लेखोरांना मृत आत्मे संबोधून, अ‍ँटवनने म्हटले आहे, ‘ज्याच्यासाठी तुम्ही आंधळेपणाने लोकांचे जीव घेता, त्या परमेश्वरानेच त्याच्या कल्पनेतून आम्हाला साकारले असेल, तर माझ्या प्रिय पत्नीच्या देहात शिरलेल्या प्रत्येक गोळीने परमेश्वराच्या हृदयाला आणखी एक खोल जखम केली असेल’. दहशतवाद्यांसाठी द्वेषाची भावना जोपासण्यास नकार देताना अ‍ँटवनने म्हटले आहे, ‘मी तुम्हाला माझ्या द्वेषाची भेट देणार नाही. तुम्ही ती भेट मागत आहात; पण मी रागापोटी तुमचा द्वेष केल्यास, तुमच्यात आणि माझ्यात फरक तो कोणता उरला? मी भ्यावे, माझ्याच देशवासीयांकडे अविश्वासाच्या नजरेने बघावे, सुरक्षिततेसाठी माझ्या स्वातंत्र्याचा त्याग करावा, अशी तुमची इच्छा आहे; पण तुम्ही हरला आहात’. अ‍ँटवनने ही पोस्ट लिहिली आयएसआयएसच्या दहशतवाद्यांना उद्देशून; पण आमच्या देशात असहिष्णुतेचे वातावरण पसरविणाऱ्यांसाठीही ते झणझणीत अंजन आहे.