पल्या भोवताली हॅकर्स आणि हॅकिंगची चर्चा सतत सुरू असते. बोर्डच्या माध्यमातून सारे जग उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी आपण सिनेमात पाहतो, तसेच त्याच माध्यमाचा उपयोग करून जगाला वाचविण्यातही येते. ते अनुक्रमे ब्लॅक-हॅट हॅकर्स आणि व्हाईट-हॅट हॅकर्स म्हणून ओळखले जातात. त्यासाठी शॉर्टकटचा वापर अत्यंत चतुराईने करण्यात येतो. व्यवसायातही ग्रोथ हॅकर्स अस्तित्वात असतात, तसेच सोशल मीडियातही आपले दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी लाइफ-हॅक-टिप्स पुरविल्या जातात. कोणतीही नवीन कल्पना उद्योग जगताकडून जशी लगेच स्वीकारण्यात येते. त्याचप्रमाणे, ती निरर्थक ठरण्याचीही शक्यता असते.
एखाद्या यंत्रणेच्या अंतर्गत भागात प्रवेश करून नव्या उद्दिष्टांनी ती यंत्रणा बाधित करण्याचा हेतू हॅकिंगच्या मागे असतो. त्या यंत्रणेत हॅकिंगच्या माध्यमातून नवीन कल्पना घुसविल्या जातात. हॅकिंगला तोंड देणे आपल्याला शक्य होत नाही. कारण यंत्रणेतील ब्लॅक बॉक्सच्या प्रक्रियांना ते बाधित करीत असते. त्यामुळे ज्या हेतूंसाठी ती यंत्रणा तयार करण्यात येते, त्यात बिघाड घडवून वेगळेच काहीतरी करण्यास ते यंत्रणेला बाध्य करीत असते. हॅकिंगचा वापर यंत्रणेतील प्रक्रिया अगदी उलट करण्यासाठी होत असतो. आपल्याला काय साध्य करायचे आहे, या हेतूने आपण कामास आरंभ करतो, पण मग हॅकिंगमुळे मार्गभ्रष्ट होतो.
आपल्याला होणारे रोग हाही हॅकिंगचा सुसंस्कृत प्रकार असतो. स्वत:चे हेतू साध्य करण्यासाठी जंतूंच्या माध्यमातून आपल्या शरीरात विषारी घटकांचे प्रत्यारोपण करण्यात येते. त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांसाठी औषधे हा तोडगा असतो. इम्युनोथेरपीच्या माध्यमातून आपल्यातील इम्युन सीस्टिम कार्यान्वित झाल्याने हाताळण्यास कठीण असलेल्या रोगांना हाताळणे सोपे जाते. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यासाठी हॅकरच्या मानसिकतेचा उपयोग केला जात आहे. मलेरियाच्या जंतूंचे वहन करू न शकणाºया डासांच्या नव्या जाती तयार करण्यात येत आहेत. मलेरिया नियंत्रित करण्याचा हा आणखी एक प्रकार आहे. जाहिरातबाजी हासुद्धा हॅकिंगचा एक सर्वमान्य प्रकार आहे. जाहिरात ही वरकरणी दृश्य स्वरूपात असते, पण तिचे परिणाम अदृश्य रूपात जाणवत असतात. जाहिरातींमुळे आपल्या वागणुकीलासुद्धा आपल्या नकळत वळण प्राप्त होत असते. मीडियामार्फतदेखील आपले हॅकिंग सुरू असते. खोट्या बातम्यांच्या माध्यमातून जगाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनात फरक पाडण्यात येतो. आपल्याला न जाणवता हा परिणाम होत असतो.प्रश्नांना तोंड देण्याची आपली पद्धत उघड उघड असते, पण मिळणाºया माहितीच्या बळावर उघड दिसणाºया गोष्टींवर आपण हल्ला करतो. इतरांना शिक्षित करून शत्रूला पराभूत करतो, पण तसे करताना आपण स्वत:लाच धोक्यात घालीत असतो. कधी-कधी प्रश्न सोडविण्यासाठी आपण बुद्धीचा वापर करतो, तसेच अधिक पैसेही खर्च करतो. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हॅकिंगतर्फे प्रत्येक साधनाचा वापर केला जातो.