शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अविरत सेवा देणाऱ्या भाषा अनुवादाचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 05:35 IST

जगातील विविध भाषांतून थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेलं ‘केल्याने भाषांतर’ हे त्रैमासिक गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत ...

जगातील विविध भाषांतून थेट मराठीत भाषांतरित केलेल्या साहित्याला वाहिलेलं ‘केल्याने भाषांतर’ हे त्रैमासिक गेल्या वीस वर्षांपासून नियमितपणे प्रकाशित होत आहे. पुण्यातील ‘कलासक्त’ या संस्थेतर्फे याची सुरुवात संस्थापक संपादक कै. विद्यासागर महाजन यांनी चार सहकाऱ्यांबरोबर केली. दुर्दैवाने २००९ मध्ये त्यांचे आणि विवेकानंद फडके यांचे २०१४ मध्ये निधन झाले. सुरुवातीपासून संपादनाचे काम करणाºया सुनंदा महाजन आणि अनघा भट या आज तितक्याच निष्ठेने व भाषांतरविषयीच्या तळमळीने हे त्रैमासिक नेटाने चालवीत आहेत.

‘केल्याने भाषांतर’मध्ये जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी, स्पॅनिश, पोलीश, इटालियन इ. विविध परकीय भाषांमधून थेट मराठी भाषेत साहित्य भाषांतरित स्वरूपात सादर होत असते. यात मुख्यत्त्वे कथा, कविता या छोट्या आकारातील साहित्याला स्थान असते. भाषांतरित पुस्तकांचे परीक्षण, भाषांतरित साहित्य वाचताना त्याला पूरक ठरतील, असे त्या-त्या समाजाची, सांस्कृतिक, ऐतिहासिक वैशिष्ट्ये उलगडून दाखविणारे लेख, सदरे, तसेच मराठी शैली संपादनासाठी परकीय भाषेची पार्श्वभूमी नसणाºया एका संपादकाचे मार्गदर्शन या बाबी इथे महत्त्वाच्या ठरतात. ‘केल्याने भाषांतर’ने आणखी एक कटाक्षाने पाळलेली गोष्ट म्हणजे परदेशी लेखकांचे, स्थळांचे, विशेष नामांचे इंग्रजीत रूढ झालेले उच्चार न वापरता, त्याऐवजी मूळ भाषेतील उच्चारांचा उपयोग करायचा. म्हणजे जर्मन लेखक गटे नव्हे, तर ग्योथे, टॉल्स्टॉय नव्हे, तर तलस्तोय. रुळलेले नसतील, तर मूळचे- फ्रांकफुर्ट, पेटर हे उच्चार रुळवायचे.

‘‘‘केल्याने भाषांतर’ सुरू करण्यामागे आमची अंत:प्रेरणा हीच होती की, आपण आत्मसात केलेल्या एका परकीय भाषेतील उत्तमोत्तम साहित्य ज्या मराठी वाचकांना ते मूळ भाषेत वाचता येत नसेल, त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे. तसे करताना परकीय भाषेतील साहित्यातून व्यक्त होणार एखादा विचार, एखादा नवा साहित्यप्रकार, एखादी नवी कल्पना मराठीत यावी, त्यातून मराठी भाषेच्या अर्थाच्या, शब्दसंपत्तीच्या, विचारांच्या मांडणीच्या कक्षा रुंदावाव्या आणि त्याद्वारे जिच्या मूळच्या आधारामुळे आपण एक नवीन भाषा शिकलो, त्या मातृभाषेच्या तिजोरीत जमेल तशी, जमेल तेवढी भर घालावी. खरे तर हे सारे करण्याची ताकदही मातृभाषाच देते आणि लागणारी रसदही तीच पुरवते,’’ असे संपादक म्हणतात. कलासक्त या संस्थेच्या माध्यमातून ‘केल्याने भाषांतर’ने भाषांतरविषयक मोठी कामगिरी केली आहे. समकालीन जागतिक कथा हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेला त्यांचा कथासंग्रह असो, मराठी- रशियन-जर्मन हा त्रैभाषिक शब्दकोश असो, विद्यासागर महाजन, सुनंदा महाजननघा भट यांनी भाषांतरित केलेली अनेक पुस्तके असोत, आगामी ग्रंथ भाषांतरांच्या योजना असोत, हे सारे पाहिल्यानंतर विदेशी भाषेतले कसदार साहित्य यापुढेही मराठीत आणण्याचे काम मोठ्या ताकदीने होत राहील, यात शंका वाटत नाही.

वी नीड यू सोसायटी ही ठाण्यातील एक अग्रमान्य सामाजिक संस्था असून, तिचे घणसोली, इंदिरानगर, तुर्भे येथे निम्नस्तरातील बालकांसाठी, १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण-प्रशिक्षणाचं काम निष्ठेने सुरू आहे. आज वी नीड यू सोसायटीतर्फे प्रतिवर्षी वैचारिक, सामाजिक, तसेच वाङ्मयीन क्षेत्रात एक वसा घेऊन तळमळीने चालविण्यात येणाºया नियतकालिकास एक लक्ष रुपये आणि स्मृतिचिन्हासह प्रबोधन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या मनाच्या मानल्या गेलेल्या प्रबोधन पुरस्कारासाठी या वर्षी ‘केल्याने भाषांतर’ या त्रैमासिकाची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराने संपादकांना आपल्या आगामी योजना पूर्ण करण्यास नक्कीच बळ मिळेल. या निमित्ताने आज अत्यंत महत्त्वाच्या ठरलेल्या अनुवाद क्षेत्राचाच हा गौरव म्हणता येईल.- डॉ अजित मगदूम । अभ्यासक