शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पदवीच्या तावडीत!

By admin | Updated: June 24, 2015 00:41 IST

संकटे आली की, ती एकटी-दुकटी येत नाही, त्यांची मालिकाच सुरू होते, असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय अलीकडच्या काळात सत्तेच्या राजकारणात असलेल्यांना सतत येत असतो.

संकटे आली की, ती एकटी-दुकटी येत नाही, त्यांची मालिकाच सुरू होते, असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय अलीकडच्या काळात सत्तेच्या राजकारणात असलेल्यांना सतत येत असतो. ही संकटे जशी राजकारणातील प्रतिस्पर्धी कोसळवत राहतात, तसेच पक्षातील गटबाजीमुळेही विरोधकांना अशी रसद पुरवली जाते किंवा एखाद्या नेत्याचे पक्षातील प्रतिस्पर्धीही प्रसारमाध्यमांपर्यंत अशी प्रकरणे पोहोचवत असतात. त्यात आजकाल भर पडली आहे, ती कॉर्पोरेट क्षेत्रातील गटातटांच्या राजकारणात निर्माण झालेल्या हितसंबंधाची. त्यामुळे कोणते प्रकरण कधी निघेल आणि त्यामागे कोणाचा हात असेल, हे सांगणे अशक्य बनत चालले आहे. भाजपा याच संकटाच्या मालिकेत सध्या अडकत चालला आहे. तिकडे दिल्लीत मोदी सरकारला ‘ललितगेट’ भेडसावत आहे, तर आता इकडे मुंबईत फडणवीस सरकारचे शिक्षणमंत्री विनोद तावडे ‘बोगस पदवी’च्या प्रकरणात अडकले असल्याचा आरोप होत आहे. ‘माझी पदवी ज्या ज्ञानेश्वर विद्यापीठाची आहे, ते सरकारमान्य नाही, पण पदवी खरी आहे’, असा खुलासा तावडे यांनी केला आहे. तो खरा नसेल, असे मानण्याचे काहीच कारण नाही. कोणत्या संस्थेत दाखल होऊन काय शिकायचे, हे स्वातंत्र्य आपल्या राज्यघटनेने देशातील नागरिकांना दिलेलेच आहे. ते तावडे यांनी उपभोगले, तर कोणाचा आक्षेप असण्याचे काहीच कारण नाही. पण हा खुलासा करीत असतानाच तावडे यांनी हेही सांगून टाकले आहे की, २००२ साली न्यायालयाने या विद्यापीठाचा अभ्यासक्रम रद्द करण्याचा आदेश दिला होता. मुळात ज्ञानेश्वरांच्या नावाने चालविली जाणारी ही संस्था हे ‘विद्यापीठ’ नाही. कोणत्याही संस्थेला ‘विद्यापीठ’ म्हणवून घेण्याची सोय कायद्यात नाही. तसेच कोणत्याही संस्थेला ‘पदवी’ देण्याची सोयही कायद्यात नाही. हे ‘विद्यापीठ’ जेव्हा स्थापन झाले, तेव्हा देशात ‘अभिमत विद्यापीठा’संबंधीचा कायदा झाला नव्हता, फक्त त्याचा विचार सुरू झाला होता. नंतर तो कायदा झाला. त्याखाली देशातील अनेक शिक्षण संस्थांना ‘अभिमत विद्यापीठा’चा दर्जाही मिळाला. त्यांनी दिलेल्या पदव्या सरकारमान्य आहेत, पण हे ‘ज्ञानेश्वर विद्यापीठ’ त्यात नव्हते आणि आजही नाही. अशा परिस्थितीत ‘निवडणुकीच्या वेळेस सादर कराव्या लागणाऱ्या विवरणपत्रातही मी ज्ञानेश्वर विद्यापीठातून पदवी घेतली, असा स्पष्ट उल्लेख केला आहे, कोणतीही लपवाछपवी केलेली नाही’, हा तावडे यांचा दावा नैतिकदृष्ट्या योग्य ठरू शकतो. पण ज्या संस्थेला पदवी देण्याचा अधिकारच नाही, तेथून घेतलेल्या शिक्षणाच्या प्रमाणपत्राला पदवी ठरवून तावडे यांनी तसा उल्लेख कसा काय विवरणपत्रात केला, असा प्रश्न कायद्याच्या तांत्रिक भाषेत बसवून विचारला जाणारच नाही, असे नाही. अर्थात न्यायालय तो ग्राह्य धरील, असंही नाही. पण या प्रकरणामुळे भाजपा विरोधकांच्या हातात कोलीत पडले आहे, हे निश्चित आणि तसे ते पडू शकले आहे, त्याचे कारण आपल्या शिक्षणव्यवस्थेत ‘पदवी’ला देण्यात आलेले अनावश्यक महत्त्व. पदवीधर होणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात आली आहे. त्यामुळे अनुभवजन्य प्रशिक्षणापेक्षा पदवीपर्यंतच्या सैद्धांतिक शिक्षणाला अतोनात महत्त्व प्राप्त होत गेलेले आहे. परिणामी बॅँकांत कारकून म्हणून काम करण्यासाठीही पदवीची अनावश्यक अट घातली गेली. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांना बसणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा ओघ विविध पदवी अभ्यासक्रमांकडे चालू राहिला आहे. विज्ञान, कला वा वाणिज्य अभ्यासक्रमांची पदवी मिळवून लाखो विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात आणि नोकऱ्या मिळविण्यासाठी वणवण फिरत असतात. पदवी व नोकरीची ही घालण्यात आलेली सांगड तोडणे हे शिक्षणव्यवस्थेत आमूलाग्र मूलभूत सुधारणा करण्याचे पहिले ठोस पाऊल आहे. पदवीला अशी अनावश्यक प्रतिष्ठा मिळवून देण्यात आली असल्याने राजकारणातही उच्चशिक्षित लोक यायला हवेत. आजकालचा अर्थव्यवहार हा गुंतागुंतीचा आहे, ते समजून घेणारा मंत्री अथवा खासदार वा आमदार हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असते. पण ही अपेक्षा अनाठायीच नाही, तर गैरही आहे. मंत्री अथवा आमदार वा खासदार होणाऱ्याला सारासार बुद्धी, सर्वसामान्य समज, संवेदनशीलता, सहनशक्ती व संयम असण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधी उच्चशिक्षित किंवा अगदी पदवीधारक नसला, तरीही हे गुण त्याच्याकडे असल्यास तो तज्ज्ञांकडून माहिती घेऊन त्याआधारे आपली मते तयार करू शकतो. असा आमदार वा खासदार मंत्री झाल्यास त्याच्या दिमतीला सनदी अधिकारी व तज्ज्ञांची फौजच असते. महाराष्ट्राच्या विकासात मोठा वाटा असलेल्या पूर्वीच्या राजकीय नेत्यांपैकी अनेक पदवीधर नव्हते. पण कर्तृत्वात ते तसूभरही कमी नव्हते. मात्र पदवीला दिली गेलेली ही अनावश्यक प्रतिष्ठा मोडून काढण्यात आलेली नसल्यानेच बोगस पदव्या मिळवून देण्याची दुकाने ‘शिक्षण संस्थां’च्या पाट्या लावून देशात जागोजागी निघाली आहेत. उत्तर भारतात तर हे प्रकार सर्रास चालत असतात. अशाच एका पदव्यांच्या दुकानातून कायद्याची पदवी घेतल्यामुळे दिल्लीच्या ‘आप’ सरकारातील कायदामंत्री तोमर अडचणीत आले व त्यांना आपले पद गमवावे लागले. पदवीच्या या माहात्म्यामुळेच महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री पदवीच्या तावडीत सापडले आहेत. या अनुभवातून धडा घेऊन, शिक्षणमंत्री म्हणून धडाक्याचे काम करून दाखवण्याची ईर्षा असलेल्या तावडे यांनी ‘चमकोगिरी’च्या आहारी न जाता शिक्षणव्यवस्थेत मूलभूत बदल घडवून आणण्याच्या दिशेने काही पावले टाकल्यास, या प्रकरणातून राजकारणापलीकडे काही हाती लागले, असे म्हणता येईल.