शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

सरकारी कर्मचाऱ्यांनो, पेन्शनची गरज तुम्हाला की कष्टकऱ्यांना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 09:12 IST

सरकारी कर्मचारी म्हणतात, आम्ही देशसेवा करतो. असंघटित क्षेत्रातले शेतकरी- कामगारसुद्धा देशसेवाच करतात. मग त्यांनाही वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन का नको?

- डॉ. विकास महात्मे (माजी खासदार, ख्यातनाम नेत्रतज्ज्ञ)

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हवी आहे. इतकी वर्षे सरकारी नोकरी  केली, देशवासीयांची म्हणजेच देशसेवा केली म्हणून ही पेन्शन मिळावी, असे त्यांचे म्हणणे आहे. या हिशेबाने शेतात काम करणारा शेतकरी, शेतमजूर, जो सर्वांचा अन्नदाता आहे; तो करतो ती देशसेवा नव्हे काय? मग त्यालाही वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन मिळायला पाहिजे. असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार, चहा टपरी चालविणाऱ्यांपासूनचे छोटे  दुकानदार हेसुद्धा देशसेवाच तर करतात. त्यांनाही वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन का नको?

साठाव्या वर्षी निवृत्त झाले, तरी नंतर एखादी नोकरी सहज करू शकतात, करतातही.. साठ वर्षे रोज दहा- बारा तास अंगमेहनत केलेल्या शेतकरी- शेतमजुराला तेही शक्य नसते,  तरीही परिस्थितीमुळे त्यांना शेतात राबावे लागते; मग पेन्शनचे हक्कदार सरकारी कर्मचारी आहेत की राबराब राबणारे शेतकरी- कामगार?  अशा असंघटित क्षेत्रातील शेतकरी- कामगारांना पेन्शनबाबत प्राथमिकता देणे जास्त अगत्याचे आहे. म्हणजे ‘एकच मिशन, सर्वांना पेन्शन’ हा नारा असायला हवा. 

माझ्या  मित्राकडे नितीन नावाचा एक मुलगा कामाला आहे. नितीनचे आजोबा  शिक्षक होते. वयाच्या  ५८ व्या वर्षी निवृत्त झाले. त्यावेळी त्यांचा पगार होता  ६,००० रुपये. हे आजोबा  ९० वर्षांचे असताना पेन्शन मिळायची  २५ हजार रुपये. दुर्दैवाने खासगी कंपनीत काम करणाऱ्या त्यांच्या नातवाला आज  पगार मिळतो  साडे बारा हजार रुपये. म्हणजे काही काम न करणाऱ्या ९० वर्षांच्या व्यक्तीला २५ हजार आणि काम करणाऱ्या तरुणाला केवळ साडेबारा हजार. हे व्यवहार्य वाटते का, असा असमतोल आपल्याला हवा आहे का? जुनी पेन्शन योजना लागू करून आपण युवा पिढीचे हक्क हिरावून घेतोय का याचा विचार होणे गरजेचे आहे. 

महाराष्ट्राचे बजेट आहे चार लाख पाच हजार कोटी  रुपयांचे. यातील जवळपास एक लाख ५५ हजार कोटी  रुपये सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये जातात. म्हणजे दाेन टक्के लाेकांसाठी १.५५ लाख कोटी. उरलेले दाेन लाख ४५ हजार काेटी ९८ टक्के लोकांसाठी. सरकारचा खर्च कर्मचाऱ्यांवर आधीच जास्त होतो, याचा बोजा आणखी वाढवायचा आहे का? समाजकल्याणाच्या योजनांना  पैसे कमी पडले तरीही पेन्शनसाठी पैसे मात्र द्यावेच लागतील. हे खरेच योग्य आहे का? 

छत्तीसगडमध्ये जुनी पेन्शन योजना लागू झाली. केवळ व्होट बँकेवर नजर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. विचार करा, १९९०- ९१ मध्ये पेन्शनसाठी  केंद्र सरकारचा खर्च होता ३,२७२ कोटी; आणि २०२० मध्ये होता १,९०,८३६ कोटी; म्हणजे ५८ पटीने अधिक! तरुण पिढीचे भविष्य उद्ध्वस्त करणारा हा निर्णय आहे. राजस्थानमध्येही तीच परिस्थिती आहे. 

माझे एक परिचित आहेत, त्यांनी २२ वर्षे केंद्र सरकारी कर्मचारी म्हणून काम केले. त्यांना पेन्शन मिळते. त्यांच्या व पत्नीच्या वयात १० वर्षांचा फरक आहे. ते म्हणाले, माझ्यानंतर माझ्या पत्नीला पेन्शन मिळेल आणि त्यानंतर मुलालासुद्धा पेन्शन मिळेल. मला प्रश्न पडला, मुलालासुद्धा लाभ का? ते म्हणाले, मुलगा दिव्यांग असल्याने अवलंबून आहे. त्यामुळे तो जिवंत असेपर्यंत त्यालासुद्धा पेन्शन मिळेल. म्हणजे या गृहस्थांनी नोकरी केली २२ वर्षे; आणि पेन्शन घेईल ६० वर्षांसाठी! हे सगळे कोणाच्या  पैशातून ?- तर करदात्यांच्या. करदाता म्हणजे केवळ आयकरदाता नाही, तर वस्तू खरेदी करणारे सर्वच आहेत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी, असा हट्ट असेल, तर बाकीच्या लोकांचे  काय? याचाही विचार व्हावा.

टॅग्स :Pensionनिवृत्ती वेतन