शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

नशीब, अनुवंशिकता आपलं व्यक्तिमत्त्व घडवतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 05:21 IST

श्याम मानवश्याम मानवअत्यंत महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. आपण काय समजतो त्यावर पुढचं सारं अवलंबून आहे. जर व्यक्तिमत्त्व नशिबावर, अनुवंशिकतेवर, जन्मवेळ, राशीनुसार प्राप्त होत असेल तर आपल्या हातात काही उरत नाही. कारण नशीब, अनुवंशिकता, जन्मवेळ आपण बदलवू शकत नाही. याचा अर्थ आपलं व्यक्तिमत्त्व अपरिवर्तनीय आहे. जसं असेल तसं ते स्वीकारणं, ...

श्याम मानवश्याम मानवअत्यंत महत्त्वाचा व कळीचा मुद्दा आहे. आपण काय समजतो त्यावर पुढचं सारं अवलंबून आहे. जर व्यक्तिमत्त्व नशिबावर, अनुवंशिकतेवर, जन्मवेळ, राशीनुसार प्राप्त होत असेल तर आपल्या हातात काही उरत नाही. कारण नशीब, अनुवंशिकता, जन्मवेळ आपण बदलवू शकत नाही. याचा अर्थ आपलं व्यक्तिमत्त्व अपरिवर्तनीय आहे. जसं असेल तसं ते स्वीकारणं, एवढंच आपल्या हातात आहे.वर्षानुवर्षे, शतकानुशतके माणूस असंच मानत आला आहे. कदाचित त्यामुळेच माझ्या तरुणपणी, सत्तरच्या दशकात, आम्हाला व्यक्तिमत्त्व अथवा व्यक्तिमत्त्व बदल हे शब्दही कधी ऐकायला मिळाले नव्हते.गेली ३६ वर्षे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ स्थापन करून चालवतो आहे. त्यामुळे आणि व्यक्तिमत्त्व कार्यशाळेत हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्यामुळे हजारो डॉक्टरांशी संपर्क आला. त्यांनाही व्यक्तिमत्त्व अनुवंशिक असतं असं वाटतं, हे माझ्या तीव्रतेनं लक्षात आलं आहे. त्यांच्या डॉक्टरी विज्ञान शिक्षणातून हेच मत व्यक्त होतं याचीही मला माहिती आहे.‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशा लढाऊ क्षेत्रात मी काम करतो. त्यामुळे सबळ पुराव्यांच्या आणि सखोल विज्ञान अभ्यासाच्या आधारावर मते मांडण्याची सवय झाली आहे.आपलं व्यक्तिमत्त्व (स्वभाव, भावना, विचार करण्याची पद्धती नैतिक मूल्ये) आपण जन्माला आल्यानंतरच या पृथ्वीवरच घडतं. ते नशिबानुसार, राशीनुसार वा अनुवंशिकतेनुसार घडत नाही. हे सत्य, विसाव्या शतकात गवसलेलं वैज्ञानिक सत्य आपण निखळपणे स्वीकारलं पाहिजे.स्त्रीचं अंडबीज आणि पुरुषाच्या शुक्रजंतूचा संयोग होतो. गर्भ आईच्या गर्भाशयात वाढतो. मूल जन्माला येतं. मुलाच्या शरीराची ठेवण, उंची, जाडी, डोळ्यांचा केसांचा शरीराचा रंग, शरीर मेंदू वृद्धीक्षमता, काही (अनुवंशिक) रोग हे अनुवंशिक म्हणजे आईवडिलांच्या जीन्स क्र ायोझोम्समधूनच प्राप्त होतात. याविषयी आजच्या काळात एक टक्काही शंकेला थारा नाही. कदाचित काही प्रश्न पडतील. काळ्या जोडप्याला गोरं मूल कसं होतं? वा ठेंगण्या जोडप्याला उंच मूल कसं होऊ शकतं? काळ्या डोळ्याच्या जोडप्याची मुलं घाऱ्या, निळ्या डोळ्यांची कशी?याचंही उत्तर अनुवंशिकतेमुळे असंच आहे. काळ्या जोडप्याच्या जीन्समध्ये कुठे तरी आईकडून वा वडिलांकडून (काका, मामा, आजोबा, आजी, मावशी) गोरेपणाचा जीन्स आलेला असतो. त्याचप्रमाणे ठेंगण्या जोडप्याबाबत उंचीचा वा डोळ्याचा रंग बदलण्याचा जीन्स आला असतो. म्हणूनच असं घडतं.पण ज्याला आपण व्यक्तिमत्त्व म्हणतो ते मात्र जन्मानंतरच घडायला सुरुवात होते.आधुनिक भाषेत सांगायचं झालं तर आपलं शरीर-मेंदू ही हार्डवेअर निसर्गाच्या कार्यशाळेत तयार होते. पण मेंदूतील सॉफ्टवेअर जन्मत: जवळपास कोरी असते.मूल जन्माला आल्या क्षणापासून ५ इंद्रियांच्या माध्यमातून ते जे जे पाहतं, ऐकतं, अनुभवतं ते ते त्याच्या मेंदूत शिरतं, रेकॉर्ड होतं, प्रोग्राम होतं. पहिल्या पाच वर्षांत या मुलांचा मेंदू एखाद्या उघड्या डब्यासारखा असतो. काय स्वीकारायचं, काय स्वीकारायचं नाही हा अधिकाराच त्यांना नसतो.त्यांच्या आजूबाजूस जे घडतं, जे ते पाहतात त्यामुळे ते त्यांच्या मेंदूत शिरतं. चांगलंही शिरतं, घाण आणि कचराही शिरतो. शिवाय या काळात ते मोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनही प्रोग्राम होतात. पहिल्या ५-६ वर्षांत या कोºया मेंदूत जे प्रोग्राम होतं त्यातून या मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला जातो.म्हणूनच आज जगभरचे बाल मानसशास्त्रज्ञ मुलांवर जागरूकपणे संस्कार करत त्यांचं संगोपन झालं पाहिजे, असं आग्रहानं सांगतात आणि हे संस्कार विधायक आशावादी प्रोत्साहनपरच झाले पाहिजेत असं आवर्जून नमूद करतात.पहिल्या पाच वर्षांत ही मुलं ज्या घरात, शाळेत, परिसरात वाढतात त्यातील साºयाच स्त्री-पुरुष मुलांच्या वागण्या-बोलण्याचा त्यांच्या प्रोग्रामिंगवर परिणाम होतो. घराघरात शिरलेला इडियट बॉक्स टीव्ही हाही मोठ्या प्रमाणावर या मुलांच्या बालमनावर परिणाम करून जातो.साधारणत: ६ व्या वर्षी निसर्ग या उघड्या मेंदूवर झाकण निर्माण करतो. काय स्वीकारायचं, काय नाकारायचं हा अधिकार मुलांना बहाल करतो. पण बाराव्या वर्षापर्यंत, हा अधिकार वापरण्यास समर्थ बनेपर्यंत, या मुलांवर अतिशय काळजीपूर्वक संस्कार करणं गरजेचं असतं. बालसंगोपन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. तो आपण नंतर विस्तारानं समजून घेऊ.६ व्या वर्षानंतर आपण सतत आपल्या मेंदूत विचार करतो, त्यातून आपला मेंदू नित्य प्रोग्राम होतो. तुमच्या माझ्या जीवनात जे भावनोत्कट प्रसंग घडतात (राग, भीती, द्वेष, प्रेम इ.) त्यातूनही आपला मेंदू प्रोग्राम होतो. शिवाय प्रयत्नपूर्वक आपण जे स्वत: शिकतो, स्वत:ला घडवायचा प्रयत्न करतो, जाणीवपूर्वक विचार करतो, त्यातूनही आपण प्रोग्राम होत असतो आणि आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं.थोडक्यात जन्माला आलो त्या वेळी व्यक्तिमत्त्व या अर्थानं आपला मेंदू जवळपास कोरा होता. तेव्हापासून आजच्या या क्षणापर्यंत आपल्या मेंदूत जे प्रोग्राम झालं आहे ते टोटल प्रोग्रामिंग म्हणजेच आपलं व्यक्तिमत्त्व आहे. या टोटल प्रोग्रामिंगमधूनच आपल्या भावना, क्रिया, वर्तणूक, विचार करण्याची प्रक्रिया व नैतिक मूल्ये प्रगट होत असतात. त्यालाच आपलं व्यक्तिमत्त्व असं म्हणतात.हे व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यामध्ये आपला कळत नकळत सहभाग राहिला आहे. आपणच हे व्यक्तिमत्त्व घडवलं आहे. म्हणूनच गरज वाटल्यास आपण या व्यक्तिमत्त्वात बदल घडवू शकतो. अगदी आमूलाग्र बदलसुद्धा घडवू शकतो.गर्भाशयात संस्कार घडवता येतात?व्यक्तिमत्त्व घडवता येतं?आईच्या मन:स्थितीचा गर्भवाढीवर (शारीरिक) परिणाम होतो, ही वस्तुस्थिती आहे. सुदृढ बालक जन्माला येण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. इथवरच हे सत्य आहे. गर्भसंस्कारामुळे मुलांचं व्यक्तिमत्त्व घडतं, घडवता येतं असा दावा जे करतात ते आधुनिक काळातले महाठग आहेत. ही चक्क बुवाबाजी आहे. सामान्यांची फसवणूक आहे.‘‘अरे मला माहीत आहे, टेन्शन घेऊ नये! पण टेन्शन येतं मी काय करू?’’‘‘मला त्या दिवशी इतका राग आला, इतका आला की तो आवरताच आला नाही आणि समोरच्याच्या मुस्कटात मारली.’’‘‘मला माहीत आहे, नियमित अभ्यास करावा, अभ्यासाला बसतोही, पण अभ्यासाचा जाम कंटाळा येतो. मी काय करू?’’असली वाक्यं आपल्यापैकी अनेकांच्या तोंडून सतत बाहेर पडत असतात. त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व, आपला स्वभाव आपल्या नियंत्रणात नाही, असं कळत नकळत आपण ध्वनित करत असतो. शिवाय ‘स्वभावाला औषध नाही’, ‘कळतं पण वळत नाही’ या बालपणापासून आपल्या मेंदूत घट्ट बसलेल्या म्हणी हीच अगतीकता अधोरेखीत करीत असते.खरंच आपलं व्यक्तिमत्त्व, स्वभाव, वर्तणूक, भावना यावर आपलं नियंत्रण नाही, नसतं? आणि आपल्या जीवनामध्ये, करिअरमध्ये यशस्वी होण्यात व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा रोल आहे. हे व्यक्तिमत्त्व घडतं कसं? आपल्या नशिबानं प्राप्त होतं? की अनुवंशिकतेने प्राप्त होतं? अथवा ज्या राशीमध्ये आपण जन्म घेतो त्या स्थळ-वेळेनुसार (राशीनुसार) आपल्याला व्यक्तिमत्त्व प्राप्त होतं?