शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

पाऊस पडू दे, धनधान्य पिकू दे, चांगला भाव मिळू दे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 00:01 IST

पाऊस चांगला पडला की शेतमालाचे उत्पादन अमाप होते. पण बाजारभाव मात्र कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकऱ्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. उत्पन्न वाढले तर कुटुंब जगवण्यासाठीची वर्षभराची अन्नाची गरज भागते एवढेच.

बाळासाहेब बोचरे|

वैशाख वणव्यात दारोदार फिरणारे गुबुगुबु नंदीवाले असोत की गावोगावच्या यात्रांमधील भाकणूक असो, आगामी वर्षात पाऊस कसा असेल याबाबत भाबड्या बळीराजाची उत्सुकता ताणलेली असते. भारतीय हवामान खात्याचे अंदाज असोत वा भाकणूक किंवा नंदीवाले यांनी पाऊस चांगला पडेल असे भाकीत केले की त्याच आनंदात शेतकरी वैशाखाच्या झळा सहन करतो. पाऊस चांगला पडला तर शेतमालाचे उत्पादन अमाप होते. मात्र बाजारभाव कोसळतात. त्यामुळे पाऊस पडला काय अन् नाही काय शेतकºयांच्या आयुष्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. यंदा मान्सून ९६ ते १०४ टक्के बरसणार आणि शेती उत्पादनात ०.९ टक्के वाढ होणार हे अनुमान देशासाठी भलेही सुखद असेल पण शेतकºयांसाठी सुखद असेलच असे म्हणता येणार नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ झाली. पण शेतकºयांच्या हाती काय पडले याचा विचार करण्याची गरज आहे. सरकारने हमी भाव जाहीर केले पण खुद्द सरकारलाच हमी भावाने शेतमाल खरेदी करणे जिकिरीचे झाले आहे. तूर खरेदी बंद केली. खरेदी केलेली तूर गोदामात पडून आहे. आता हरभरा खरेदी सुरू आहे. साखरेचे भाव कोसळत आहेत. दुधाचे भाव पाण्यापेक्षा कमी आहेत.अन्नधान्य ही वाढत्या लोकसंख्येची वाढती गरज असताना लोकसंख्येची गती अािण अन्नधान्य उत्पादनाची गती यात फार मोठी तफावत आहे. २७५ दशलक्ष टन अन्नधान्याची निर्मिती करणाºया आपल्या देशाला येत्या ३० वर्षात किमान ३० दशलक्ष टनाची वाढ करावी लागणार आहे. हे केवळ आणि केवळ आपल्या बळीराजाच्याच हातात आहे. देशाच्या गरजेच्या प्रमाणात उत्पादन कमी असले तरी अन्नधान्याच्या किमती का वाढत नाहीत आणि श्ोतकºयाला योग्य भाव का मिळत नाही हे गणित शेतकºयांना कधीच कळू शकले नाही. हवामान खात्याचे अंदाज, प्रत्यक्ष पडणारा पाऊस, अन्नधान्य उत्पानाचा अंदाज आणि प्रत्यक्ष झालेले उत्पादन आणि त्याला मिळणारा भाव याचा सरकारला कधी मेळच बसलेला नाही. अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला की भाव गगनाला भिडतात. सर्वसामान्यांची ओरड होते. म्हणून अन्नधान्याची आयात केली जाते. यात शेतकºयांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे शेतकºयाची तरुण मुले शेतीमध्ये काम करण्याऐवजी कारखान्यात नोकरी शोधत आहेत. वास्तविक शेतीमध्येच प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता आहे. शेतमजूर म्हणून जगण्याऐवजी शेतकरी म्हणून जगण्यासाठी तरुण वर्ग तयार आहे. पण वर्षभर राबल्यानंतर हातात काहीच शिल्लक राहणार नसेल तर अशा तरुण शेतकºयांच्या पदरी वैफल्याशिवाय काहीच पडत नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने २७५ दशलक्ष टन शेतमालाचे उत्पादन होईल असा अंदाज होता. यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन २७७ दशलक्ष टन उत्पादन होईल असा अंदाज आहे. तेव्हा आजच सरकारने या उत्पादनाचे काय करायचे याची तजवीज केली पाहिजे. वाढत्या उत्पादनाचा वरचेवर आढावा घेऊन पाऊस आणि वाढलेल्या उत्पादनाचा शेतकºयांना कसा फायदा होईल ते पहावे. शिवाय सलग दोन वर्षे चांगला झालेला पाऊस साठवून ठेवला तर पुढची काही वर्षे दुष्काळाच्या झळा कमी होण्यास मतदगार होतात हेही लक्षात घेऊन पाणी जिरवण्याची व साठवण्याची मोहीम गतिमान केली पाहिजे.

टॅग्स :Farmerशेतकरी