शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मुलींची संख्यावाढ

By admin | Updated: August 8, 2016 04:07 IST

जन्माला येणाऱ्या मुलींचे घटणारे प्रमाण हा देशभरात नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यातही गेली अनेक वर्षे मुलींचे प्रमाण मुलांच्या

जन्माला येणाऱ्या मुलींचे घटणारे प्रमाण हा देशभरात नेहमीच चिंतेचा विषय ठरला आहे. महाराष्ट्रासारख्या सामाजिकदृष्ट्या पुढारलेल्या राज्यातही गेली अनेक वर्षे मुलींचे प्रमाण मुलांच्या तुलनेत कमीच राहिले. सामाजिक समतोल बिघडण्याची स्थिती निर्माण झाली असतानाच नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेक्षणातून शुभवर्तमान समोर आले आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत मुलींची संख्या वाढली आहे. २०१५-१६ च्या या सर्वेक्षणानुसार राज्यात मुलींच्या लिंग गुणोत्तराने एक हजाराचा आकडा ओलांडला आहे. विशेष म्हणजे मुलींचा जन्मदर वाढण्याच्या प्रमाणात वर्धा जिल्ह्याने बाजी मारली आहे. त्या जिल्ह्याच्या शहरी भागात हे गुणोत्तर १२६६ तर ग्रामीण भागात १३७७ वर पोहोचले आहे. पुणे, औरंगाबाद आणि अकोल्यात ही वाढ अनुक्रमे १०६६, १०६७ आणि १०६८ एवढी आहे. नागपूर, भंडारा या शहरांमध्येही मुलींचे गुणोत्तर एक हजारी झाले आहे. मात्र ठाणे, धुळे, जळगाव आणि कोल्हापूर हे जिल्हे मुलींच्या गुणोत्तर वाढीसंदर्भात पिछाडीवरच आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत हे सर्वेक्षण केले जात असते. त्यामुळे ते विश्वासार्ह मानता येईल. यापूर्वी राज्यात हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ९२९ होते. मुलींचे हे वाढते गुणोत्तर म्हणजे समाजाच्या बदलत्या मानसिकतेची चाहूलच आहे. अर्थात हा केवळ प्रारंभ आहे. अजूनही लाखो मुली ‘नकोशी’ म्हणून जन्मापूर्वी गर्भातच संपविल्या जात आहेत. स्त्री-पुरुषांमधील विषमता, पितृसत्ताक पद्धत, स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान आणि ‘मुलांचा हव्यास-मुलींचा तिरस्कार ’ या भावनेतून हे घडत आहे. कुटुंब नियोजनाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या गर्भपात केंद्रांतच स्त्रीगर्भाची सर्वाधिक हत्त्या होत असल्याचे वास्तव उघडकीस आले आहे. शहरातच नव्हे तर खेड्यापाड्यातही हा धंदा जोमात आहे. मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याकडूनच अतिशय क्रूरपणे स्त्रीभ्रूण गर्भातच मारले जात आहेत. मुलींच्या जन्माबाबत लोकांचा संकुचित दृष्टिकोन बदलावा या अनुषंगाने राज्य आणि केंद्र सरकारतर्फे ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सारख्या योजना राबविण्यात येत आहेत. पण या निष्पाप जिवांच्या हत्त्या रोखण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणीही तेवढीच आवश्यक आहे. प्रि-नेटल डायग्नॉस्टिक टेक्निक्स (प्रोहिबिशन आॅफ सेक्स सिलेक्शन) कायदा अधिक कठोर करून गर्भस्थ शिशुंची हत्त्या हा भारतीय दंड संहितेच्या ३०२ कलमान्वये खुनाचा गुन्हा मानला जावा, अशी मागणी केली जात आहे. मुलींच्या गुणोत्तरातील ही सुधारणा आनंददायी असली तरी समाजातून स्त्रीभ्रूण हत्त्या पूर्णपणे थांबतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने मुलींचे भवितव्य सुरक्षित होणार आहे..