शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

लगीनघाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 02:53 IST

मराठवाड्यातील वातावरण दोन्ही अर्थांनी तापले आहे. एक तर तपमानाने ४२ अंशाचा आकडा ओलांडला आणि लग्नाचेही बार उडत आहेत.

मराठवाड्यातील वातावरण दोन्ही अर्थांनी तापले आहे. एक तर तपमानाने ४२ अंशाचा आकडा ओलांडला आणि लग्नाचेही बार उडत आहेत. दुष्काळी मराठवाड्यात सारेच पक्ष सामूहिक विवाहाचा बार उडवताना दिसत आहेत. कोणाचा वेल मांडवावर जात असेल तर आडकाठी आणू नये अशी ग्रामीण भागात लोकांची धारणा असते. त्यामुळे हे सामूहिक विवाह सोहळे यशस्वी होताना दिसत आहेत.परवा शिवसेनेचा विवाह सोहळा उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत औरंगाबादेत पार पडला, तर रविवारी बीड आणि जालना येथे भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत बार उडवला. यात काँग्रेसही मागे नाही. १ मे रोजी आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये आणखी एक सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला आहे. या सर्व घडामोडींवरून येत्या दोन-पाच वर्षांत राजकीय पक्षांनी असे सोहळे आयोजित करण्याचा पायंडाच पडला तर नवल नाही. आपापली ‘मतपेटी’ सुरक्षित करण्याचा हा मार्ग राजकीय पक्षांनी अनुसरला. आजवर सामूहिक विवाह हा समाजातील चुकीच्या प्रथांना तिलांजली देऊन कमीत कमी खर्चात असे सोहळे पार पाडण्याचा आदर्श मार्ग समजला जात होता. आजही अनेक समाजांमध्ये असे विवाह होतात; पण ही राजकीय लगीनघाई या वर्षी लक्ष वेधून घेत आहे. दोन दिवसांच्या तीन सोहळ्यांमध्ये विहिणींचे रुसवे-फुगवे दिसले नाहीत; पण राजकीय रुसव्या-फुगव्यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. बीडजवळ पालवण येथे आमदार विनायक मेटेंच्या सामूहिक विवाहाला ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते, कोणाचीही हजेरी नव्हती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर भाजपातील ही दुफळी उघडपणे दिसत होती. बीड भाजपामधील पंकजा मुंडे-पालवे विरुद्ध विनायक मेटे यांच्यातील गटबाजीचे दर्शन झाले आणि ते अपेक्षित होते. कारण या दोघांमधून विस्तव जात नाही, अशी परिस्थिती आहे. किमान मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमाला तोंड देखले का होईना भाजपाचे नेते, कार्यकर्ते येतील असा अंदाज होता, पण तो चुकला.इकडे जालन्यात मात्र खासदार रावसाहेब दानवेंनी आपली पकड दाखवून दिली. जालन्याच्या सोहळ्यालाही मुख्यमंत्री होते; पण औरंगाबादमधील नेतेमंडळीसुद्धा हजर होती. त्यामुळे हा सोहळा दणकेबाज झाला असेच म्हणावे लागेल. यातून दानवेंनी आपले शक्तिप्रदर्शन दाखवून दिले. त्यापेक्षा मतदारसंघात उभे केलेले कार्यकर्त्यांचे जाळे आणि कार्यक्रमातील नियोजन दिसले. पक्षाच्या दृष्टीने हा विवाह सोहळा ‘मतपेटी’ मजबूत करणारा ठरला.औरंगाबादेत शनिवारी शिवसेनेने सोहळा घेतला. पक्षांतर्गत विरोधकांच्या कारवायांमुळे अगोदरच त्रस्त झालेले खासदार चंद्रकांत खैरे यांची अवस्था वधूपित्यासारखी होती. २६ जानेवारी २०१५ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन आणि विकास मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम यांनी उघडपणे खैरेविरोधी भूमिका घेतल्यानंतर ते सातत्याने अडचणीत आहेत. कामात अडथळे उभे करण्याचे काम शिवसेनेतून होत असताना खैरेंनी एकहाती हा सोहळा यशस्वी करून दाखविला. या कामात त्यांना संघटनेतून साथ नव्हतीच; पण सेनेची महिला आघाडी भक्कमपणे खैरेंच्या मागे उभी राहिली. कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमुळे खैरे विरोधकांना सोहळ्यात हजेरी लावावी लागली. बीडप्रमाणे येथे गटबाजीचे दर्शन झाले नाही, ही शिवसेनेची जमेची बाजू. भाजपा स्वत:ला शिस्तबद्ध पक्ष म्हणवून घेतो; पण खुद्द मुख्यमंत्र्यांच्या समोर गटबाजीचे झालेले प्रदर्शन हे पक्षातील असंतोष दर्शविते.यापाठोपाठ आता सिल्लोडचे काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आयोजित केलेल्या सोहळ्याकडे लक्ष लागले आहे. सत्ताधाऱ्यांच्या लगीनघाईत काँग्रेस किती बाजी मारते, हे पाहणे मनोरंजक ठरेल.- सुधीर महाजन