शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

स्वातंत्र्य नव्हे स्वैराचार!

By admin | Updated: February 9, 2015 01:38 IST

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो

स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामध्ये असणाऱ्या सीमारेषेचा विसर पडला की माणूस बेभान होत जातो. त्यासाठी त्याला संयमाचा, तारतम्याचा आणि नीतिमत्तेचा बांध आवश्यक असतो. अन्यथा सामाजिक -सांस्कृतिक सभ्यतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागते. 'एआयबी-नॉकआऊट द रोस्ट' या नावाचा एक शो मुंबईत नुकताच सादर झाला. 'चला अश्लीलता सुरू करू या' या शब्दांतच करण जोहरने त्याची घोषणा केली होती. त्यासाठी हजारो महागडी तिकिटे खरेदी करून हजेरी लावली. त्यात दीपिका पादुकोन, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट या अभिनेत्रींसह महिलावर्गाची उपस्थितीही लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ 'अश्लील, बिनधास्त आणि अवमानकारक' तसेच '१८ वर्षांवरील प्रौढांसाठीच' अशा टॅगखाली उघडपणे दिसू लागले, लक्षावधी लोकांनी ते पाहिले, असंख्यांंच्या मोबाइलवर व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पोहोचले. मानवी गुुप्तांगाचा उघडपणे विनोदाच्या नावाखाली होणारा उल्लेख आणि त्यात वापरले गेलेले आक्षेपार्ह आणि असांस्कृतिक शब्द लक्षात आल्यानंतर त्यावर सार्वत्रिक टीका होऊ लागली. हा व्हिडीओ इंटरनेटवरून काढून टाकला तरी अजूनही लाखो लोकांच्या मोबाइलमधून तो फिरतोच आहे. करण जोहरवर गुन्हाही दाखल झाला. जो काही अश्लाघ्य कार्यक्रम केला जातो तो मुळातच पाश्चात्त्यांच्या एका कार्यक्रमावरून कॉपी केलेला असा आहे. सभ्य आणि सुसंस्कृत समाजात कुणीही बोलणार नाही अशा अश्लील वाक्यांवर जर अभिनेत्रीही हसून दाद देत असतील, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर हे असे अंधानुकरण होऊन सभ्यतेलाच काळिमा फासणारा अश्लीलतेचा नंगानाच उघड होणार असेल, आणि त्याला कुणीच काही बोलणार नसेल तर यापुढील काळात अशाच कार्यक्रमांची चलती येऊ शकेल. मराठी नाटकांमध्येही जशी 'फक्त प्रौढांसाठी' हे लेबल लावून फक्त कंबरेखालचे विनोद करण्यातच आनंद मानणारे तथाकथित 'कलाकार' आणि 'आंबटशौकीन' रसिक वाढताहेत तसेच अश्लीलतेचा उघडपणे प्रसार व उच्चार करणाऱ्या कार्यक्रमांचेही होऊ शकेल. समाजाला जर किमान सभ्यतेची, सुसंस्कृततेची व नीतिमत्तेची चौकट आपण ठेवली नाही तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हा उघड स्वैराचार असाच सुरू राहील. म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, काळ सोकावतो आहे.