शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पेरणीच्या तोेंडावर शेतकरी वाऱ्यावर

By admin | Updated: June 4, 2015 05:45 IST

अच्छे दिन’ची भुरळ घालून सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारला या देशात शेती करणारा एक वर्ग आहे, याचा बहुधा विसर

वसंत भोसले -

‘अच्छे दिन’ची भुरळ घालून सत्तेवर आलेल्या केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारला या देशात शेती करणारा एक वर्ग आहे, याचा बहुधा विसर पडलेला दिसतो. ऊस उत्पादक शेतकरी तर दिवसेंदिवस अडचणीतच येत आहे. महाराष्ट्रात गेली आठ-दहा वर्षे ऊसतोडणी हंगामाच्या सुरुवातीला आंदोलन करण्याचा आणि सरकारने नाही-होय म्हणत म्हणत दर जाहीर करण्यासाठी काहीतरी तोडगा काढायचा, असा प्रघातच पडला होता. मात्र, गतवर्षी केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाले. याच आंदोलनाला पाठिंबा देऊन राज्यकर्त्यांवर वारेमाप टीका करणारे भाजपावाले सत्तेवर आले. त्यासाठी भाजपाला शेतकरी संघटनांनीही मदतच केली. एवढेच नव्हे तर निवडणुकीत आघाडी केली; जागा वाटून घेतल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीविरुद्ध जोरदार रान तापविले. शेतकरीवर्गही नाराज झाला होता. मात्र, उसाला कमी-अधिक दर देण्यासाठी सरकार मदत करीत होते.आता उलटाच कारभार होताना अनुभव येतो आहे. शेतकरी संघटनांचाही व्यवहार तसाच आहे. आपणच सत्ताधारी झालो आहोत, काय हवे ते मागा, अशी जणू सांगण्याची वेळ आली, पण देण्यासाठी हातात काय आहे? साखरेचे दर दिवसेंदिवस कोसळत आहेत. ते वाढण्यासाठी काहीच करता येत नाही. कारण याच शेतकरी संघटनांच्या मागण्यांवरून साखर नियंत्रणमुक्त केली. दररोज उत्पादन होणारे साखरेचे पोते थेट बाजारात येत होते. यावर्षी विक्रमी उत्पादन झाले आहे. मागणीपेक्षा जादा साखर असल्याने दर कसे वाढणार? साखरेचे दर २३ ते २४ रुपये किलो असतील, तर ऊसाला १५०० ते १७०० रुपये दर देता येऊ शकतो, असे साखर कारखानदारीचे अर्थकारण सांगते. मात्र, ऊस उत्पादनाचा खर्च आणि साखर उत्पादनाचा कारखान्याचा खर्च कमी झालेला नाही. यावर उपाय म्हणून अतिरिक्त साखरेचा बफरस्टॉक करावा, अशी मागणी आहे. यापूर्वी अनेकवेळा असा प्रयोग करण्यात आला आहे. आता तर पेरणीचा हंगाम सुरू होत आहे. शेतकऱ्यांना नवे पीककर्ज मिळण्यासाठी जुने फेडावे लागणार आहे. जुने कर्ज वेळेत फेडले तर व्याज सवलत मिळते, पण कर्जच फेडलेले नसल्याने नवे कर्जही नाही आणि व्याज सवलतही नाही. बुडत्याचा पाय खोलात अशीच अवस्था शेतकरीवर्गाची झालेली आहे. यावर उपाय काढावा. सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे, पण या सरकारला ना शेतीचे कळते, ना शेतकरीवर्गाचे दु:ख समजते. शेतकरी संघटनांनी एफआरपीनुसार ऊसाला दर द्या, आम्हाला काही सांगू नका, असे टुमणे लावले आहे. तो दर देता येतो का, याचे उत्तर नाही हे शेतकरी संघटनेलाही माहीत आहे. कारखान्यांनी शेवटच्या दोन महिन्यात तोडलेल्या ऊसाला टनाला केवळ १२०० रुपये देण्याची तयारी दर्शविली आहे. म्हणजे शेतकऱ्याला गतवर्षीच्या तुलनेत निम्मेच पैसे मिळणार. त्यातून कर्जे कशी फेडायची, ही अडचणच आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा कळवळा आणून शेतकरी संघटनांच्या आंदोलनात सहभागी होणारे भाजपावाले गप्प का? साखर कारखानदारी बहुसंख्येने विरोधकांच्या नियंत्रणाखाली असल्याने मोडून गेली तर बरेच, अशी भूमिका आहे का? शेतकरी संघटनांनी पाठिंबा दिलेले सरकार सत्तेवर असताना दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनाची भाषा करावी लागते, यातच नव्या सरकारचे एका वर्षातच अपयश नाही का? केंद्रीय नागरी पुरवठामंत्री रामविलास पासवान यांनी साखरेचा साठा केल्याने दर चार-पाच रुपयांनी वाढतील, असे म्हटले आहे. याचा अर्थ साखर खाणाऱ्यांची सरकारला चिंता आहे. ती तयार करणारा शेतकरीवर्ग आणि कारखानदारी यांची अडचण समजून घेण्याची मानसिकता नाही. ज्या भागात ऊसशेती विकसीत झाली आहे, साखर कारखानदारी उभी आहे, ती मोडून टाकायची का? याचा तरी विचार करायला हवा. यापूर्वीचा शेतकरीवर्गाचा कळवळा केवळ राजकीय होता. शेती व शेतकरी यांच्याविषयीचे प्रेम, आस्था खोटीच होती, असे मानायचे का?