शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

प्रत्येक घरात ‘अर्जुन’ जन्माला यावा

By admin | Updated: January 10, 2016 02:58 IST

कठीण असतं स्वत:ची समजूत काढणं. म्हणजे स्वत:च्या मनासारखं जगणं याला स्वत:ची समजूत काढणं, असं जर आपण म्हणत असू तर घोळ आहे. दुसऱ्याला काय हवं आहे हा विचार करत

- पराग कुलकर्णीकठीण असतं स्वत:ची समजूत काढणं. म्हणजे स्वत:च्या मनासारखं जगणं याला स्वत:ची समजूत काढणं, असं जर आपण म्हणत असू तर घोळ आहे. दुसऱ्याला काय हवं आहे हा विचार करत स्वत:मध्ये बदल घडवणं, याला स्वत:ला समजावणं असं म्हणतात. असं निदान मलातरी वाटतं. आपल्या आयुष्याचा अधिक वेळ दुसरा आपल्याबद्दल काय विचार करतो हा विचार करण्यात जातो. आपण मात्र समोरच्याचा विचार करून वागत नाही; आणि वागलो तरी त्याला त्याची जाणीव करून द्यायची एकही संधी सोडत नाही. बघा विचार करून.नाही म्हणायला शीक.. नाही म्हणायला शीक.. सकाळी शेजारच्या काकूंचा आवाज कानावर पडला आणि खडबडून जाग आली. माफ करा ‘काकू’ नाही. ‘काकू’ हा शब्द पुण्यासारख्या थोर संस्कृतीतून नाहीसा होताना दिसतोय तर मुंबई आणि इतर महानगरांचं काय विचारता. असो, वीणा आपल्या मुलावर म्हणजेच अर्जुनवर रागावत होती. ‘नाही म्हणायला शीक..’ म्हणून त्याची समजूत काढत होती. आता आली का पंचाईत! स्वत:मधला बदल घडवून आणायला या वर्षी ‘नाही’ हा शब्द खोडून काढायचा मनसुबा असताना हा ‘नाही’ ‘नाही’ ‘नाही’चा गोळीबार कुणावर आणि का होतोय हे ऐकून मी जखमी झालो. काय कारण असावं एका आईनं आपल्या मुलावर ‘नाही बोलायला शीक’ म्हणून संस्कार करण्याचं. व्यसन? पैसा? महागडा शौक? माफ करा पण ‘नाही’. दहावीनंतर तिच्या मुलाला सैन्याची वाट धरायची होती. त्यांचा चार-पाच मित्रांचा ग्रुप होता. त्यांनी एकत्रितपणे हा निर्णय घेतला होता. ‘मी माझ्या मित्रांना नाही म्हणणार नाही. मलाही सैन्यात जायचं आहे.’ अर्जुनचा हा निर्धार त्याची आई खोडून काढत होती. का? पठाणकोटमध्ये जे जवान शहीद झाले त्यांच्या परिवाराचे फोटो बघून? की दिवाळी, दसऱ्याच्या दिवशी आपला मुलगा घरात नसेल म्हणून ?कशी गंमत आहे बघा. हो! गंमतच म्हणीन मी. इतकी वर्षे अशा घटना घडत आहेत. जवान शहीद होत आहेत. त्या वेळी ती बातमी वाचताना आपली काय प्रतिक्रिया असते? वाईट वाटतं. राज्यकर्त्यांचा राग येतो. ‘एकदाच काय तो निकाल लावून टाका’ म्हणून ट्रेनमध्ये, चहाच्या टपरीपासून ते मोठमोठ्या आॅफिसात वातानुकूलित खोलीत चर्चा होते. पण ज्या दिवशी स्वत:च्या घरात सैनिक जन्माला येतो तेव्हा काय? त्या वेळी एक शब्द अगदी सहज आपल्या तोंडून निघून जातो.. ‘सिक्युरिटी नाही रे तिकडे’. आजकाल ब्रह्मज्ञानाचा दृष्टांत झाल्याप्रमाणे प्रत्येकाच्या तोंडी ‘सिक्युरिटी’ हा शब्द आहे. म्हणजे ज्यासाठी खऱ्या अर्थाने सीमेवरचा सैनिक जागतो त्या ‘सिक्युरिटी’ या शब्दाला आपण घाबरतो.कारगिलच्या वेळेची ही घटना आहे. मी एकटा मनालीला गेलो होतो. मला त्या वातारणाचा अनुभव घ्यायचा होता. मनालीच्या बायपास रोडवरून २७ मिलिटरी ट्रक एकामागून एक विशिष्ट गतीने जाताना मी बघितले. प्रत्येक ट्रकच्या आत आपले जवान होते. दिल्ली स्टेशन तर मिलिटरीच्या पोषाखांनी उजळून गेले होते. असे वाटत होते आत्ताच वसंत ऋतू इथे स्टेशनवर मुक्कामाला उतरला आहे. सगळं हिरवंगार! डेहराडुनला जाणाऱ्या एका ट्रेनमध्ये शिरणारा एक-एक सैनिक पहाडासारखा वाटत होता. अभिमानाने आणि गर्वाने छाती फुगून आली होती. त्याच ट्रेनमध्ये बसणारा हवाईदलाचा एक अधिकारी फलाटावर आपल्या मुलाची समजूत काढत होता. वीणाचा मुलगा अर्जुन याच्याच वयाचा होता तो मुलगा. मी लांब उभा होतो. काय समजावत असतील ते वडील आपल्या मुलाला? ‘मी परत आलो तर येईन’? की ‘मी नक्कीच परत येईन.’ काही अंतरावर त्या अधिकाऱ्याची पत्नी उभी होती आणि कौतुकाने दोघांना बघत होती. कौतुकाने बघत होती की आपल्या मुलाला ‘नाही’ म्हणायला कसं शिकवायचं याचा विचार करत होती? उघड्या मालगाडीत, रणगाड्याच्या तोफेवर हिरवा जाड कपडा घालून त्याच्या खाली स्टोव्हवर अन्न शिजवणारे जवान बघितले आणि थक्क झालो. त्यांची गाडी सीमेवर जात होती आणि मी शहराकडे धावत होतो. आपण ‘कर’ भरतो ते देशाच्या सीमेचे रक्षण करायला हा विचार बरोबर; पण ‘कर’ भरतो म्हणजे आपल्या घरात सैनिक जन्माला येऊ नये याची ही फी भरतो. हा विचार कितपत योग्य आहे? देश जसा नागरिकांमुळे घडतो तसा सैनिकही घराघरांतून घडवावा लागतो. परत आपण कुठे अडकतो? सुरुवात माझ्यापासून नाही शेजारच्या घरातून व्हायला हवी. मला खात्री आहे की, दिल्ली स्टेशनवरच्या त्या अधिकाऱ्याची पत्नी ज्या सकारात्मक विचारांनी आपल्या नवऱ्याला आणि मुलाला बघत होती, तितक्याच सकारात्मक दृष्टीने आज विश्वाचा निर्माताही त्याने निर्माण केलेल्या जगाकडे बघत नसेल. तिच्या विचारात आणि त्या अधिकाऱ्याच्या समजावण्यात जर ‘नाही’ असता तर आपण ते युद्ध जिंकलो असतो? बदलायला हवं.. स्वत:ला आणि आपल्या विचारांना. उद्या पठाणकोटसारखी घुसखोरी आपल्या घरात घडली तर आपण काय करणार? सोसायटीच्या ‘सिक्युरिटी’ला कामावरून कमी करणार? आणि आणखीन चार सीसीटीव्ही कॅमेरे लावणार? हे सगळं नंतर होईल हो. त्याआधी शत्रूचा विरोध तर करायला हवा. आणि त्यासाठी प्रत्येक घरात ‘अर्जुन’ हवा. तो घरातही हवा आणि घरातून सीमेवरही जायला हवा. त्यासाठी स्वत:कडच्या ‘सकारात्मक’ हत्यारांनी बुरसट विचार व तो ‘सिक्युरिटी’ नावाचा असुर कापून काढायला हवा. देशासाठी प्राण त्यागलेल्या प्रत्येक जवानासाठी हीच खरी नवीन वर्षाची भेट असेल. भेटच म्हणायला हवी. ‘श्रद्धांजली’ त्यांना वाहिली जाते ज्याचं अस्तित्व नाहीसं होतं. देशासाठी प्राण त्यागलेला प्रत्येक जवान आज आपल्या श्वासात जिवंत आहे. कारण त्याच्यामुळे आपला श्वास ‘श्वास’ म्हणून जिवंत आहे. म्हणून प्रत्येक श्वासात ‘सकारात्मकता’ हवी. त्या ‘सकारात्मक’ विचारातून ‘माझ्या’ घरात सैनिक जन्माला यायला हवा!

(डोंबिवली फास्ट, गैर, पोर बाजार, सांगतो ऐका, असे अनेक सुपरहिट चित्रपट आणि लागी तुझसे लगन, इस देस ना आना लाडो, लक्ष, देवयानी, पोलीस फाईल्स, युनिट ९, या सुखांनो या, यासारख्या हिंदी-मराठी मालिकांचे लेखन परागने केले आहे. )