शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

देर भी, अंधेर भी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2016 02:09 IST

सहसा असे होत नाही. एखाद्या गंभीर खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणाला तरी तो अमान्य असतो तर दुसऱ्याला हमखास मान्य असतो. पण खटल्याशी संबंधित सर्वच घटक न्यायालयाच्या निर्णयापायी

सहसा असे होत नाही. एखाद्या गंभीर खटल्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कोणाला तरी तो अमान्य असतो तर दुसऱ्याला हमखास मान्य असतो. पण खटल्याशी संबंधित सर्वच घटक न्यायालयाच्या निर्णयापायी नाराज होण्याचा आगळा प्रकार घडला आहे. सुमारे चौदा वर्षांपूर्वी गुजरातेत झालेल्या भीषण जातीय दंगलीच्या संबंधातील एका महत्वाच्या खटल्याचा जो निवाडा अहमदाबाद येथील विशेष न्यायालयाचे न्या.पी.बी.देसाई यांनी जाहीर केला आहे त्या निवाड्यावर फिर्यादी, फिर्यादीचा वकील आणि जिने तपास करुन खटला दाखल केला त्या विशेष तपासी यंत्रणेचे प्रमुख अशा तिघांनी असमाधान व्यक्त केले आहे. ज्या आरोपींना न्यायालयाने दोषी मानले आहे तेदेखील त्यांच्यावर ‘अन्याय’ झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त करणारच आहेत. २००२ साली झालेल्या दंगलीतील सर्वाधिक अमानुष प्रकार म्हणजे अहमदाबाद शहरातील गुलबर्ग सोसायटी येथे दंगेखोरांनी केलेल्या हल्ल्यात झालेली तब्बल ६९ लोकांची निर्घृण हत्त्या. मृतांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन खासदार एहसान जाफरी यांचादेखील समावेश होता. आपल्या पतीच्या हत्त्येप्रकरणी योग्य तो तपास करुन दोषींना कठोर शिक्षा केली जावी यासाठी जाफरी यांच्या पत्नी झाकीया यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याचा परिणाम म्हणून मग सात वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश जारी करुन स्वत:च्या देखरेखीखाली विशेष तपासी यंत्रणेच्या मार्फत तपासाला सुरुवात केली. तो पूर्ण होऊन एकूण ६६ जणांविरुद्ध विशेष न्यायालयात जो खटला दाखल झाला त्याचाच निकाल आता जाहीर झाला आहे. न्यायालयाने २४ आरोपींना दोषी मानले, तर ३६ जणांची निर्दोष मुक्तता केली. ज्या २४ जणांना दोषी मानले आहे त्यातील १३जणांवर मनुष्यहत्त्येचे कलम सिद्ध झाल्याने त्यांना कदाचित मृत्यूदंड वा आजन्म कारावास होऊ शकतो. शिक्षेची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे. तथापि खुद्द झाकीया जाफरी यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून न्याय अर्धवट झाला असल्याचे म्हटले आहे. विशेष तपासी पथकाने आपले काम चोखपणे बजावले नाही असा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांचे वकील एस.एम.व्होरा यांनी त्यांच्या अशिलाइतकी कठोर प्रतिक्रिया व्यक्त केली नसली आणि निकालाने आपण समाधानी असल्याचे म्हटले असले तरी ज्यांना न्यायालयाने दोषी मानले आहे त्यांना कठोरतम शिक्षा करण्याची विनंती आपण करणार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी विशेष तपासी पथकाचे प्रमुख आणि केन्द्रीय गुप्तचर विभागाचे माजी संचालक आर.के.राघवन यांनी मोठ्या प्रमाणात आरोपींना निर्दोष जाहीर करण्यावर नापसंती व्यक्त केली आहे. आपण अगदी व्यवस्थित तपास केला आणि गुलबर्गवरील हल्ला हा सुनियोजित कटाचा भाग असल्याचे सिद्ध करणारे पुरावे सादर केले पण तरीही न्यायालयाने कटाची शक्यता फेटाळून लावून दंगेखोर जमावाची ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असल्याचे म्हटले असल्याने या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याबाबत विचार करीत असल्याचेही म्हटले आहे. थोडक्यात आणखी दीर्घकाळ हे प्रकरण रेंगाळणार असून त्याचे वर्णन ‘देर भी और अंधेर भी’ असेच करावे लागेल..