शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

थोरले काका म्हणाले, ‘एक व्हा!’

By सचिन जवळकोटे | Updated: June 7, 2018 06:34 IST

थोरले काका बारामतीकरांनी तमाम विरोधकांना ‘एक व्हाऽऽ’ चा नारा देताच सारे नेते खडबडून जागे झाले. ज्यांची सारी जिंदगानी पार्टी तोडण्या-फोडण्यातच गेली, ते ‘एकीची भाषा’ करताहेत, हे पाहून अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी वाढल्या.

थोरले काका बारामतीकरांनी तमाम विरोधकांना ‘एक व्हाऽऽ’ चा नारा देताच सारे नेते खडबडून जागे झाले. ज्यांची सारी जिंदगानी पार्टी तोडण्या-फोडण्यातच गेली, ते ‘एकीची भाषा’ करताहेत, हे पाहून अनेकांच्या गुपचूप भेटीगाठी वाढल्या. गुफ्तगू सुरू झालं.जळगावचे गिरीशभाऊही छगनरावांना भेटले. दोघांच्या भेटीत म्हणे झिजलेल्या मफलराचा अन् वाढलेल्या दाढीचा विषय निघाला. ‘बारामतीच्या धाकट्या दादांची नजर लागल्यानंच माझे स्ट्रॉँग आर्म वीक झाले,’ असं म्हणे छगनरावांनी तळतळून सांगितलं. मात्र, त्यांच्या भूतकाळाशी देणं-घेणं नसलेल्या ‘कमळ’वाल्यांना फक्त स्वत:च्याच भविष्याची काळजी असावी. ‘धनुष्यबाणापेक्षा कमळाशी जवळीक कशी फायद्याची ठरू शकते,’ हे गिरीशभाऊंनी पटवून दिलं. काकांनी दिलेल्या ‘एकी’चा सल्ला आठवून छगनरावांनीही मान हलविली.दुसरीकडं विनोदभाऊही ‘कृष्णकुंज’वर ‘राज’ना भेटले. नेहमीच्या ठसक्यात ‘राज’नी विचारलं, ‘आता ही कुठली तुमची नवी नाटकं?’ तेव्हा विनोदभाऊ हसत उत्तरले, ‘खऱ्याखुºया नाट्य संमेलनाचं निमंत्रण द्यायला आलोय, कारण नाटकात तुमचा हात आम्हीही धरू शकत नाही. तुम्ही त्यात भलतेच माहीर ना.’ तेव्हा आपण सारेच नौटंकी करण्यात ‘एक’ आहोत, याचा साक्षात्कार उपस्थितांना झाला.तिसरीकडं अमितभाईही ‘मातोश्री’वर उद्धोंना भेटले. त्यांना पाहून उद्धो गरजले, ‘खामोशऽऽ’ आता आमची मुस्कटदाबी सहन करण्यापलीकडं गेलीय.’ अमितभाई गोंधळले. त्यांनी आपल्या सहकाºयाला विचारलं, ‘येटले सू?’ सहकाºयानं कानात सांगितलं, ‘एकीकडं तोंडात कारल्याची भाजी कोंबायची अन् दुसरीकडं विचारायचं, मिठाई खाणार का? यालाच म्हणतात मुस्कटदाबी.’ हे ऐकताच अमितभाई गालातल्या गालात (दाढीतल्या दाढीत) हसले. त्यांनी दिलखुलासपणे उद्धोंना विचारलं, ‘फापडा अने जलबी खासो से?’... हे ऐकताच ‘मातोश्री’वर ठामपणे ‘एक’मत झालं की जखमेवर मीठ चोळण्यासाठीच भाई आलेत.‘काकांचा सल्ला मानत इतर नेते एक होताहेत, मग आपल्या पक्षातील नेते कधी एकत्र येणार,’ असा भाबडा प्रश्न एका ‘घड्याळ’वाल्या कार्यकर्त्याला पडला. सोलापुरात विजयदादा अन् बबनदादा असो. कोल्हापुरात मुन्ना अन् मुश्रीफ असो. साताºयात थोरले अन् धाकटे राजे असो. या साºयांचीच तोंडं नेहमी दोन दिशेला. तेव्हा या कार्यकर्त्यानं घाबरत घाबरत साताºयात थोरले राजेंना विचारलं, ‘महाराज... तुम्ही अन् धाकटे दादा कधी एकत्र होणार?’ तेव्हा कॉलर उडवत राजे गरजले, ‘अगोदर काका अन् दादा तर खरंखुरं एक होऊ देत.’ कार्यकर्ता गपगुमानं बाहेर.इकडं ‘हात’वाल्यांच्या भवनातही अनेक नेतेमंडळी कधी नव्हे ती एकत्र आलेली. अनेक तास त्यांच्यात गहन चर्चा रंगलेली. खलबतं झडू लागलेली. अनेकांच्या हातात शब्दकोश अन् डिक्शनरी. कुणी मोबाईलवर गूगल ओपन करून बसलंय तर कुणी फोनवरून मराठी प्राध्यापकांशी संवाद साधतोय. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ही सारी मंडळी याच कामात व्यस्त राहिली; परंतु शेवटपर्यंत काही त्यांना या प्रश्नाचं उत्तर सापडलंच नाही, ‘एक होणं म्हणजे काय?’ कारण आयुष्यभर एकमेकांच्या विरोधात भांडून भांडून ही मंडळी म्हणे ‘एकी’ची प्रक्रियाच विसरून गेलेली.(तिरकस)

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार