शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Editorial: ‘घाशीराम’ आजही ‘कोतवाल’! तोवर कालबाह्य होणार नाही, तोवर मरणार नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 11:43 IST

‘युरोपीयन थिएटरला प्रेरणा देणारे नाटक भारतातून आले आहे’, अशा शब्दांत ‘गार्डियन’ने तेव्हा ‘घाशीराम’चा गौरव केला होता. अर्थातच, या नाटकाला झालेला विरोधही कमी नव्हता.

विजय तेंडुलकरांनी अखेर ही ‘अनैतिहासिक दंतकथा’ असल्याचे जाहीर करून टाकले! पण, प्रत्यक्षात ‘घाशीराम कोतवाल’ नावाचे नाटक हीच नवा इतिहास घडवणारी दंतकथा ठरली. ५० वर्षे उलटली तरी ‘घाशीराम’चे गारूड कायम आहे. ‘घाशीराम’ रंगभूमीवर आले, तेव्हा देश स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा करत होता. इंग्रज गेले, पण त्यांच्याजागी जे आले, त्यांनी कमी भ्रमनिरास केलेला नव्हता. पाकिस्तानचा पराभव भारताने केल्यानंतर बांगलादेश स्वतंत्र होऊन एक वर्ष झाले होते. काही दिवसांनी आणीबाणी लादेपर्यंत मजल जावी, एवढे ‘कोतवाल’ उन्मत्त झाले होते.

सांस्कृतिक भुयारातून शिवसेनेने मुंबईवर मांड ठोकणे सुरू केले होते. अशावेळी ‘घाशीराम कोतवाल’ रंगमंचावर दाखल झाले. नाना फडणवीसांनी जिथे ‘राज्य’ केले, त्या पुण्यात हे नाटक आले. श्रीगणराय नर्तन करू लागले आणि त्या नमनानेच चिरेबंदी वाडे हादरले. आहेत त्या सत्ताधीशांमध्ये प्रेक्षकांना फडणवीस आणि घाशीराम दिसू लागले. उपरोधाने खचाखच भरलेले हे रूपक एवढे जमून आले की, राजकीयच काय, ज्यांची सत्ता सांस्कृतिक आहे, ते सर्वाधिक हादरले! हे नाटक ऐतिहासिक ठरणार, याची खात्री पहिल्या प्रयोगालाच पटली. १६ डिसेंबर १९७२ या दिवशी ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या भरत नाट्य मंदिरात झाला. टोकाचा विरोध आणि तेवढेच प्रचंड कौतुक ‘घाशीराम’ला मिळाले. आशय म्हणून तर हे नाटक चाकोरी मोडणारे होतेच, पण ‘नाटक’ म्हणूनही ते तेवढेच अनवट होते. संगीत, अभिनय, संवाद, दृश्यांची ताकद आणि वेगवेगळ्या प्रकारची प्रकाशयोजना असे सगळे पदर एकत्र गुंफले जात होते. नेपथ्य म्हटले तर काही नाही. पण, सगळ्या कला एकमेकांचा हात धरून रंगमंचावर उभ्या. विजय तेंडुलकरांसारखा नाटककार. संगीत भास्कर चंदावरकर यांचे. कृष्णदेव मुळगुंद यांची नृत्ये आणि दिग्दर्शक जब्बार पटेल. असे रसायन यापूर्वी कधी जमून आले नसेल आणि नंतरही अभावानेच दिसले असेल. लावणी, अभंग, लोकसंगीत, दशावतार, भारूड, तमाशा, कीर्तन, रागदारी -ठुमरी, भूपाळी, असे सारेच. शिवाय नृत्य, गायन, अभिनय, समूहाचे आकृतिबंध हे सगळे यात होते. खरे सांगीतिक नाटक कसे असते, याचा वस्तुपाठ म्हणजे ‘घाशीराम’. पण, ते तेवढेच नव्हते. या नाटकात एकूणच कलात्मक सामर्थ्य होते. अगदी आशयाला विरोध करणारेही या ‘फॉर्म’च्या प्रेमात होते. महाराष्ट्रच काय, देश-विदेशात या नाटकाचे प्रयोग झाले. ‘युरोपीयन थिएटरला प्रेरणा देणारे नाटक भारतातून आले आहे’, अशा शब्दांत ‘गार्डियन’ने तेव्हा ‘घाशीराम’चा गौरव केला होता. अर्थातच, या नाटकाला झालेला विरोधही कमी नव्हता.

पुस्तक असो की नाटक, व्यवस्थेला वेगळ्या विचारांचे नेहमीच भय वाटत असते. रंगमंचावर ‘घाशीराम’चा प्रयोग सादर झाल्यानंतर लगेच नाटकाला विरोध सुरू झाला. त्यामुळे १९ प्रयोगांनंतर ते बंद पडले. पुढे १९७३ मध्ये पुन्हा सुरू झाले. सगळ्या विरोधाला ‘घाशीराम’ पुरून उरले. नवनव्या संचात ते येत राहिले. रूपेरी पडद्यावरही आले. ‘घाशीराम’ आज ५० वर्षांचे होत असताना, काळ अगदी बदललेला आहे. नाटकातला काळ दोनशे वर्षांपूर्वीचा. आज देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो आहे. एकविसाव्या शतकातील माध्यम क्रांतीने जग  खिशात सामावले आहे. ‘घाशीराम’ यूट्यूबवर दिसावे, एवढी माध्यमे बदललेली आहेत. तरीही, ‘घाशीराम’ ताजेच आहे. सत्ताधीशांना पुस्तक आवडले नाही, म्हणून जोवर एका ‘जीआर’ने पुरस्कार परत घेतले जात आहेत, तोवर ‘घाशीराम’ला मरण नाही. बलात्कार आणि खून करणारे सत्तेच्या आशीर्वादाने उजळ माथ्याने मिरवताहेत, तोवर ‘घाशीराम’ कालबाह्य होणार नाही. सत्तेसाठी सोयीच्या संस्कृती सांगितल्या जात आहेत, तोवर ‘घाशीराम’ला मरण नाही.

सत्तेचा बेलगाम, बेमुर्वतखोर वापर आहे, तोवर ‘घाशीराम’ आहे. विजय तेंडुलकर पडद्याआड गेले. चंदावरकर आणि मुळगुंदही गेले. मात्र घाशीराम आहे. उलटपक्षी आज ते अधिकच समकालीन वाटावे, अशा वळणावर आपण आलो आहोत. म्हणूनच, इतिहासातला घाशीराम पुण्यातच ठेचून मारला गेला असला तरी तेंडुलकरांचा- पन्नाशीची उमर गाठलेला ‘घाशीराम’ मात्र जिवंत आहे. ‘घाशीराम कोतवाल’ नावाची अनैतिहासिक दंतकथा अमर आहे. “ऐका होऽऽऽ ऐका, आजपासून घाशीराम सावळदास यास पुण्याचा कोतवाल केला आहे हो ऽऽऽ”, ही दवंडी म्हणूनच आजच्या व्हाॅट्सॲपच्या जमान्यातही तेवढीच हादरवून टाकते आहे!

टॅग्स :Politicsराजकारण