शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

आपण सारे भोजनभाऊ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:02 IST

माझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते!

- नंदकिशोर पाटीलमाझ्या राशीला मिष्टान्नयोग आहे, हे मागच्या रविवार पुरवणीतील भविष्य वाचल्यापासून गेला आठवडाभर मला काय खाऊ आणि काय नको असं झालं आहे. वर्तमानपत्रात राशी भविष्य लिहिणारे खरोखरच मनकवडे असले पाहिजेत. आपल्या मनातील नेमकी गोष्ट त्यांना आपोआप कळते! कधीमधी मुखभंग होतो म्हणा. पण ते भविष्य आपल्यासाठी नव्हते, अशी समजूत करून त्याकडे दुर्लक्ष करायचे अन् न चुकता दुसऱ्या दिवशीच्या पेपरातील राशी भविष्यावर चोरटी नजर मारून घ्यायची! आपण कितीही विवेकवादी वगैरे असलो तरी राशी भविष्याच्या कॉलमवर आपली नजर न चुकता पडते म्हणजे पडतेच...आता एका राशीचे अनेकजण असतात. त्यामुळे सगळेच भविष्य तंतोतंत तुम्हाला लागू होईल असे नाही. विशेषत: ‘आज धनलाभ होईल, कुणीतरी तुमच्या प्रेमात पडेल, वरिष्ठांची मर्जी राहील, वेतनवाढ मिळेल, पत्नीकडून गोड बातमी मिळेल’ या सारख्या भविष्यवार्ता तर तद्दन अफवा असतात हे मी आजवरच्या अनुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो. पण ‘निष्कारण पैसे खर्च होतील, घरात आदळआपट होईल, वरिष्ठांची बोलणी खावी लागतील, अनाहूत पाहुणे येतील’, यासारखे भविष्य मात्र तंतोतंत खरे ठरते! त्यामुळं किमान सावधगिरी म्हणून तरी ते वाचलं पाहिजे. पण अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा या अशा राशीभविष्यावर खूप डोळा होता. लोकांची मानसिक फसवणूक करणारा हा कॉलम एकतर बंद करा, अथवा ‘हे सगळं खोटं आहे!’ अशी तळटीप टाका असा त्यांचा संपादकांकडे आग्रह असायचा. पण अशी तळटीप राशीभविष्याखाली टाकली तर बातम्या आणि लेखांच्या खालीही ती टाका, असा आग्रह वाचक धरतील!! हा संपादकांचा बिनतोड युक्तिवाद ऐकल्यानंतर डॉक्टरांनी तो आग्रह सोडला म्हणतात...असो, तर मुद्दा होता मिष्टान्नयोग! गेले आठ दिवस मी सोसायटीतील, आॅफिसातील प्रत्येकाकडे अगदी आशाळभूत नजरेने पाहतो आहे. पण मिष्टान्न सोडा साधा चहा देखील कुणी विचारलेला नाही. माझा हा मिष्टान्नशोध सुरू असतानाच माझ्या वाचनात आले की, एका राजकीय पक्षाने ‘समरसता भोज’ आयोजित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. माझ्या तोंडाला अक्षरश: पाणी सुटले. मी तडक जाऊन त्या पक्षाचे कार्यालय गाठले. तिथे गेल्यानंतर मला सांगण्यात आले की, तुम्ही आमच्या खासदारांना अथवा एखाद्या मंत्र्यांना भेटा. भित्यापाठी ब्रह्मराक्षस तसे भुक्यापाठी परब्रह्म...म्हणून चिकाटी न सोडता मी प्रथम एका खासदारांना गाठले. ‘तुमच्या समरसता भोजमध्ये मला भोजन हवंय’ असं सांगितल्यानंतर त्यांनी माझ्यापुढे अटींचा एक कागद सरकवला.‘समरसता भोजसाठी चांदीचे ताट, बसायला पाट, बिसलेरी पाणी आणि हॉटेलचे टिफीन आणावे लागेल!’ यादी वाचून मी तिथून सटकलो. मग मंत्री महोदयांकडे गेलो. तर त्यांनी पहिला प्रश्न केला, ‘तुम्ही दलित आहात?’ मी म्हणालो, ‘जातीनं नाही. पण पेशाने दीन आहे!’ बहुदा माझ्या उत्तराचा त्यांना अर्थबोध झाला नसावा म्हणून त्यांनी अगदी आस्थेवाईकपणे विचारलं, ‘मग तुम्हाला गटई कामगारांच्या योजनेचा लाभ हवाय का?’ (पत्रकार अन् गटई कामगार? व्वा!!) मंत्र्यांच्या उत्तराने माझी भूक पळाली!

टॅग्स :Politicsराजकारणfoodअन्नnewsबातम्या