शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

ड्यूटी संपल्यावर बॉसचा फोनही घेऊ नका..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 06:45 IST

अनेकांची याबाबत नकारघंटाच असेल. बरेच जण तर म्हणतील, न करून सांगतो कोणाला? कोरोना काळानंतर तर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं गेलं

तुम्ही कुठे, कुठल्या कंपनीत काम करता?.. जिथे कुठे तुम्ही काम करीत असाल, तिथे कामाच्या किमान तासांचं बंधन तुम्हाला असेलच; पण त्याशिवाय रोज किती तास तुम्ही अतिरिक्त काम करता? सुटीच्या दिवशीही तुम्हाला काम करावं लागतं का? आणि बॉसचे फोन किंवा ई-मेल? त्यांना उत्तरं देणं, कामाचा अहवाल देणं, घरून काही कामं करणं, फोनवरून काही गोष्टी मॅनेज करणं.. अशा अनंत गोष्टी. ‘ड्यूटी’च्या व्यतिरिक्त रोज किती अतिरिक्त वेळ त्यासाठी तुम्हाला द्यावा लागतो? गरजेच्या वेळी, हव्या तेव्हा सुट्या तरी घेता येतात का? घरच्यांना, कुटुंबीयांना पुरेसा वेळ देता येतो का?.. 

अनेकांची याबाबत नकारघंटाच असेल. बरेच जण तर म्हणतील, न करून सांगतो कोणाला? कोरोना काळानंतर तर अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं गेलं. आता त्यांचं अतिरिक्त कामही आम्हाला करावं लागतं. नाही केलं, परफॉर्मन्स नाही दाखवला, तर आम्हाला घरी पाठविण्याची भीती! पण, थांबा, जगात अनेक देश असे आहेत, जिथे जेवढा पगार, तेवढंच काम किंवा ठरलेल्या वेळेपेक्षा अतिरिक्त काम करण्याची सक्ती तुम्हाला कोणीच करू शकत नाही. अगदी तुमचा बॉसही नाही. त्यानं जर तसं केलं तर त्याला जेलची हवा खावी लागू शकते आणि मोठा आर्थिक दंडही आकारला जाऊ शकतो. जगात किमान वीस देश असे आहेत, जिथे यासंदर्भात कायदाच करण्यात आलेला आहे. या यादीत ताजं नाव आहे ऑस्ट्रेलियाचं. ऑस्ट्रेलियाच्या संसदेत येत्या काही दिवसांत नवं विधेयक मांडलं जाईल आणि नवा कायदा अस्तित्वात येईल. हे विधेयक संमत होणारच, कारण विरोधकांनीही या विधेयकाला आधीच पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर झाल्यानंतर लवकरच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. त्यानंतर कर्मचाऱ्यांच्या संबंधात कंपन्या, कमर्चाऱ्यांचे बॉस यांना आपली मनमानी करता येणार नाही. 

आपली ड्यूटी संपल्यानंतर किंवा ड्यूटीच्या आधी, सुटीच्या दिवशीही अनेकदा कर्मचाऱ्यांना आपल्या बॉसची कामं ऐकावी लागतात, त्याचा फोन तातडीनं घ्यावा लागतो; पण आता या नव्या कायद्यानुसार कामाच्या वेळेनंतर बॉसचं काम ऐकणं तर जाऊ द्या, बॉसचा फोन अटेंड करणंही कर्मचाऱ्यांना बंधनकारक नाही. माझा फोन तू का घेतला नाही, म्हणून बॉस कर्मचाऱ्याची खरडपट्टी काढू शकत नाही. एवढंच नाही, आता ड्यूटी संपल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचं काम बॉसला, कर्मचाऱ्यांना करवून घेता येणार नाही. एखाद्या अधिकाऱ्यानं ड्युटी संपल्यानंतरही एखाद्या कर्मचाऱ्यावर काम करण्यासाठी दबाव आणला, त्यासाठी त्याला बाध्य केलं, तर अशा अधिकाऱ्यांना आपल्या अशा कृतीचं उत्तर तर द्यावं लागेलच; पण याबद्दल त्यांना कोर्टातही खेचलं जाऊ शकतं आणि तगडा आर्थिक दंडही भरावा लागू शकतो. नव्या कायद्यानुसार आता कोणत्याही बॉसला आपल्या कर्मचाऱ्याला विनाकारण फोनही करता येणार नाही. एखाद्या ई-मेलला रिप्लाय करणं किंवा एखादी डॉक्युमेंट फाइल अपडेट करणं, अशा साध्या-साध्या गोष्टीही आता बॉस आपल्या हाताखालच्या व्यक्तीला सांगू शकणार नाही. कर्मचाऱ्यानं या बॉसविरुद्ध तक्रार केली तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. बॉसवरचे आरोप सिद्ध झाले तर त्याला दंडापोटी मोठा भुर्दंड तर भरावा लागू शकतोच; पण खुद्द बॉसचीच नोकरीही जाऊ शकते. 

ऑस्ट्रेलियातील सामाजिक कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी होती की, ऑस्ट्रेलियातील वर्किंग कल्चर सुधारलं जावं; तसंच ‘बॉस कल्चर’मध्ये सुधार करून वर्क आणि लाइफ यांच्यातला बॅलन्स साधला जावा. ही मागणी मान्य करताना ऑस्ट्रेलियाचे रोजगार मंत्री टोनी बर्की यांनी हे विधेयक तयार केलं असून, लवकरच ते संसदेत मांडलं जाईल. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ॲन्थनी अल्बानीज यांचं म्हणणं आहे, कायदा झाल्यानंतर देशातील सगळ्याच कंपन्या आणि सरकारी विभागांना त्याचं पालन करावं लागेल. कोणतीही कंपनी, मालक आपल्या कर्मचाऱ्यांना दिवसभराचा किंवा दिवसातल्या २४ तासांचा पगार देत नाही, तर ते त्यांच्याकडून तेवढं कामही करवून घेऊ शकत नाहीत. याच विधेयकाला आता ‘राइट टू डिस्कनेक्ट’ही म्हटलं जात आहे.

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाjobनोकरीEmployeeकर्मचारी