शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर मित्र असावा ऐसा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 03:14 IST

गेल्या दशकामध्ये रुग्ण-डॉक्टर संबंधात खूप मोठे बदल घडून आलेले दिसत आहेत. मुळात वैद्यकीय व्यवसाय हा व्यवहार असला तरी रूढार्थाने चालणा-या व्यवहारांच्या पलीकडचा असा तो भावनिक व्यवहार असतो.

डॉ. अमोल अन्नदातेगेल्या दशकामध्ये रुग्ण-डॉक्टर संबंधात खूप मोठे बदल घडून आलेले दिसत आहेत. मुळात वैद्यकीय व्यवसाय हा व्यवहार असला तरी रूढार्थाने चालणा-या व्यवहारांच्या पलीकडचा असा तो भावनिक व्यवहार असतो. भावनांना फाटा न देता मनाच्या दोरीवर चालताना संतुलनासाठी व्यवहाराची काठी हातात धरून समतोल आयुष्य कसे जगायचे हे आपल्याला चाणक्य नीती शिकवते. त्याचप्रमाणे रुग्ण-डॉक्टर संबंधाचा भावनिक व्यवहार पार पाडून हवे ते पदरात कसे पाडून घ्यायचे हे आपल्याला या स्तंभात दर १५ दिवसांनी कळणार आहे.‘यथा मित्रम् तथा जीवन:यथा वैद्यम तथा निरामया:’असे म्हटले जाते की तुम्हाला चांगले आयुष्य जगण्यासाठी सद्गुणी जोडीदार, संयमी शेजारी आणि एका चांगल्या जीवलग मित्राची गरज असते. यात आजच्या घडीला आणखी एक जोड आवश्यक आहे. ती म्हणजे एका विश्वासार्ह डॉक्टर मित्राची. आपण कधीही संपर्क करू शकतो अशी आपल्या आयुष्यात पहिल्या दहाएक माणसांची यादी तयार असते. अशा माणसांमध्ये एखादा तरी डॉक्टर आहे का हे तपासून पाहा. तुम्हाला असे वाटेल की तुम्ही नेहमी ज्या फॅमिली डॉक्टरकडे जाता तोच तुमचा डॉक्टर-मित्र आहे. पण मी सांगतोय ती ‘डॉक्टर-मित्र’ची संकल्पना ही फॅमिली डॉक्टरपेक्षा थोडी वेगळी आहे. मला जो डॉक्टर-मित्र येथे अभिप्रेत आहे. तो नेहमी तुम्हाला तपासणारा किंवा अगदी तुमच्या गावात राहणारा असावा असेही नाही. तो तुम्हाला मित्रत्वाच्या भावनेतून वैद्यकीय सल्ला देणारा असा जवळचा स्नेही असला पाहिजे. कुटुंबावर किंवा तुमच्यावर मोठ्या वैद्यकीय मदतीची वेळ येईल तेव्हा हा डॉक्टर-मित्र तुमच्या मुख्य सल्लागाराची भूमिका पार पाडेल. मला माझ्या सिरीयस रुग्णांचे उपचार सुरू असताना अथवा दुसºया गावाहून एडमिट असलेल्या बाळाला नेमके काय झाले आहे याची चौकशी करणारे फोन येत असतात. फोन करणारे हे डॉक्टर रुग्णाचे कौटुंबिक मित्र असतात. रोज सुरू असलेल्या उपचारांबद्दल मी स्वत: तर माहिती देत असतो पण या कौटुंबिक मित्राकडून उपचार नीट सुरू असल्याचे रुग्णाच्या नातेवाइकांना कळले की ते आश्वस्थ होतात वा माझ्याबद्दलही त्यांना वेगळा विश्वास निर्माण होतो.आपले उपचार करत असलेल्या डॉक्टरशी असा संवाद घडवून आणायचा असेल तर काही गोष्टी काळजीपूर्वक करणे आवश्यक आहे. डॉक्टर इतर रुग्ण तपासत असताना, राउंड घेत असताना बºयाचदा रुग्ण आपल्या अशा ओळखीच्या डॉक्टरांचा फोन एकदम कानाला लावतात. समोरून कोण बोलते आहे, कशा संदर्भात बोलते आहे हे काहीच लक्षात येत नाही. अशा वेळी उपचार करणाºया डॉक्टरचा त्रागा होतो. त्यामुळे आपल्या डॉक्टर मित्रांचे आपल्या डॉक्टरांशी बोलणे करून द्यायचे असेल तर आधी त्यांची परवानगी घ्या, वेळ घ्या व मगच असा संवाद घडवा.डॉक्टर मित्र असा मिळत नाही. तो जोडावा लागतो, जोपासावा लागतो. मित्र म्हटले की सगळे संदर्भ बदलतात. त्याच्याशी प्रेमपूर्वक संवाद साधणे, कौटुंबिक संबंध जोडणे हे कौशल्य आहे. मग यात त्याच्या वाढदिवसाला आवर्जून त्याला शुभेच्छा देणे, त्याला व्यवसायाच्या माध्यमातून गरज भासल्यास ती करणे अशा अनेक गोष्टी असू शकतात. मी निरीक्षण केले आहे की, अनेक मोठ्या व्यक्तींनीही असा चांगला डॉक्टर-मित्र जोपासला आहे. याचे माझ्या बघण्यातील सर्वोत्तम उदाहरण म्हणजे शरद पवार व माझे गुरुवर्य डॉ. रवी बापट यांची मैत्री. रवी बापट हे पवार कुटुंबाचे फक्त फॅमिली डॉक्टरच नव्हे, तर त्यांचे कौटुंबिक-डॉक्टर-मित्र आहेत. पवार साहेबांच्या प्रत्येक वैद्यकीय उपचारात डॉ. बापटांचा सल्ला हा म्हणून महत्त्वाचा असतो. शरद पवारांच्या राजकीय चातुर्यापेक्षा त्यांनी डॉक्टर मित्राशी जोपासलेला जिव्हाळा शिकण्यासारखा आहे. एवढ्या मोठ्या माणसाला जर डॉक्टर-मित्राची आवश्यकता वाटत असेल तर ती आपल्यालाही नक्कीच आहे.प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती येतात ज्यांचा त्याच्यावर आपोआप हक्क निर्माण होतो. आपल्या वागण्यातून हा हक्क आपण आपल्या डॉक्टर मित्राच्या आयुष्यात निर्माण करू शकतो. आपल्याला वाटेल की डॉक्टर व्यस्त असतात वा त्यांना अशा मित्रांची गरज नसते; पण डॉक्टरही अशा प्रेमळ नात्यांची बेटं शोधत असतात. असे अनेक ‘डॉक्टर-मित्र’ तुमच्या सभोवती आहेत. शोधा म्हणजे सापडेल! 

टॅग्स :doctorडॉक्टर