शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 04:07 IST

संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.

- डॉ. जितेंद्र आव्हाड(आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस)संघ आपल्या स्वयंसेवकांचे लष्कर उभारणार ते पाकिस्तान आणि चीनशी लढण्यासाठी नको आहे. ती त्यांच्यात धमकच नाही. ते हवे आहे येथील व्यवस्था उलथवायला. त्यासाठी ओबीसी समाजाला धर्माची गोळी दिली आहे.लष्कराला सहा महिने लागतील, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीन दिवसात सेना उभारू शकतो, असे विधान संघाचे मुख्य मोहन भागवत यांनी केले. मुळात लष्करी प्रशिक्षण ही काही चेष्टा नव्हे. सियाचीनच्या बर्फात उणे ५५ अंशाच्या थंडीत किंवा कच्छच्या रणात ५५ अंशाच्या उन्हात पहारा करणे शाखेत जाऊन लाठ्याकाठ्या फिरवण्याइतकी सोपी गोष्ट नाही. एक लिटर पाण्यात अख्खा दिवस काढायचा किंवा प्रसंगी साप मारून खायचा हे गुळ पोळी खाणाºया किंवा वरण भातावर साजूक तुपाची धार असल्याशिवाय घशाखाली घास न उतरणाºयांना जमेल का हा एखाद्या विनोदी नाटकाचा विषय होऊ शकतो. पण रोज आपल्या प्राणांची आहुती देणाºया जवानांपेक्षा आपले स्वयंसेवक जास्त चांगले आहेत हे म्हणणाºया भागवतांना कुणाची उपमा देऊ या?शौर्याची किंवा बलिदानाची काहीही परंपरा नसलेला संघ जेव्हा अशी भाषा करतो, तेव्हा त्याचा अर्थ काय? १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तानचे तीन रणगाडे हातबॉम्ब टाकून उद्ध्वस्त करणारा परमवीर अब्दुल हमीद, कारगिलचे शेवटचे शिखर सर करून तिरंगा फडकवताना आपल्या रेडिओवर खाली आपल्या कमांडरला ह्यह्यरकफ हए अफए अळ ळऌए ळडढह्णह्ण हा संदेश पाठवणारा कॅप्टन सचिन निंबाळकर किंवा २६/११ च्या हल्ल्यामध्ये मारला गेलेला कमांडो दलाचा मेजर संदीप उन्नीकृष्णन असे किती शूर सैनिक संघाच्या मुशीत तयार झाले? घरी आई आजारी असते किंवा गरोदर पत्नी असते, या सगळ्यांची पर्वा न करता सीमेवर आपले प्राण देण्यासाठी तयार असलेले किती शिपाईगडी संघाच्या शाखेत तयार झाले? केवळ त्यांच्या मृत्यूचे भांडवल करून गलिच्छ राजकारण खेळणाºया संघाने आपापली पोरं मात्र इंग्लंड, अमेरिकेत स्थायिक करून घेतली. म्हणजे मरणार आम्ही आणि तोरा मिरवणार हे. हे घृणास्पद काम मात्र संघाने १९२५ सालापासून चोख बजावले.इतिहासाचा विद्यार्थी म्हणून मला हिटलरचा काळ आठवतो. आपला उजवा हात हेन्रीच हिमलर याच्या पुढाकाराने त्याने एस.एस. ही संघटना नाझी पक्षाच्या अंतर्गत तयार केली. जर्मनीचं ‘‘वांशिक शुद्धीकरण’’ करण्यासाठी स्थापना झालेली ही संघटना फक्त हिटलरशी बांधिलकी मानत होती. तिला लष्करी दर्जा देण्यात आला. हिटलरच्या सर्व राजकीय विरोधकांना संपवायचं काम तिच्याकडे होतं.आर.एस.एस. ही एस.एस.च्या मार्गाने निघालेली संघटना आहे हे भागवत यांच्या विधानातून स्पष्ट होत आहे. अल्पसंख्यांक आणि दलित यांच्यावर आज बेधडक होणारे अत्याचार हा त्याचा सराव आहे. अन्यथा स्वत:ला सांस्कृतिक संघटना म्हणवणाºया संघाला समांतर लष्कर निर्माण करण्याची गरज का भासावी? तरुण पिढीला माहीत नसेल, संघाच्या विचारसरणीनुसार चालणाºया ज्या संघटना भारतात आहेत त्यात भोसला मिलिटरी स्कूल ही एक आहे. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांनी तिची स्थापना केली. एकेकाळी काँग्रेसमध्ये टिळकांचे कट्टर समर्थक असलेले मुंजे कडवे हिंदुत्ववादी होते.संघाला इथे स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेली लोकशाही, घटना आणि तिरंगा कधीच मान्य नव्हता. आपले मुख्यालय असलेल्या रेशीमबागेवर तिरंगा फडकवणाºया दोन तरुणांवर संघाने ११ वर्षे खटला चालवला. फाळणी होऊनही जो मुस्लीम समाज या भारताला आपलं मानून इथे राहिला त्याला ते आपला मानायला तयार नाहीत.भागवतांच्या सारवासारवीला आता काही अर्थ नाही. एस.एस.चा भारतीय अवतार हा आर.एस.एस. असणार हे आता उघड आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ