शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांबद्दल असहिष्णुता बाळगू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 01:22 IST

वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो

वाघासह सर्व वन्यप्राणी, पक्षी हे अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक आहेत. माणसाचे जीवन हे त्यांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. वन्यप्राण्यांबद्दल जनमानसात प्रेम आणि जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने १ ते ७ आॅक्टोबर हा वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत असतो. यानिमित्त राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांच्याशी सविता देव हरकरे यांनी केलेली बातचीत.वन्यजीव सप्ताह हा केवळ उत्सव न राहता वन्यजीव संवर्धनात जास्तीतजास्त लोकांचा सहभाग वाढणे आवश्यक नाही का?वन्यजीव संवर्धनात लोकांचे योगदान महत्त्वाचे आहे. वन्यप्राणी म्हटले की केवळ वनविभागाची जबाबदारी असा बहुदा समज करून घेतला जातो. तो चुकीचा आहे. वन्यप्राणी ही फक्त वनविभागाची नाही तर देशाची संपत्ती आहे. परंतु अलीकडे वन्यप्राण्यांप्रती लोकांची असहिष्णुता वाढत चालली आहे. हे योग्य नाही. त्यांना धोका मानू नये. आपली संस्कृती मिळूनमिसळून प्रेमाने राहण्याची आहे. याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे. प्राण्यांना सांभाळणारा देश म्हणून आपली ख्याती आहे.वाढता मानव-वन्यजीव संघर्ष कसा कमी करणार? नरभक्षक वाघांच्या बंदोबस्ताचे काय?हा संघर्ष वर्षोनुवर्षे चालत आला आहे. त्यावर नियंत्रणासाठी वन्यजीव विभागाकडून अल्पमुदतीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याचे परिणामही समोर आले आहेत. काही वर्षांपूर्वी मानव-वन्यजीव संघर्षात वर्षाला ५० लोक मृत्युमुखी पडत असत आता हा आकडा २५-३० वर आला आहे. महाराष्टÑात आणि प्रामुख्याने विदर्भात जंगल आणि शेती एकत्रित असल्याने खरी अडचण येते. वाघ गुराढोरांच्या आकर्षणाने शेतात येतात. कारण हरणं आणि सांबरांपेक्षा त्यांची शिकार सोपी असते. मात्र माणसाला मारण्याचा त्यांचा उद्देश नसतो. अलीकडच्या काळात हल्ल्याच्या ज्या घटना घडल्या त्यातील वाघही नरभक्षक नाहीत. अशाप्रसंगी संयमाची गरज असते. तेव्हा टोकाची भूमिका कुणी घेऊ नये.जंगल कमी आणि वाघ वाढल्याने त्यांचे स्थलांतरण करणार हे खरे आहे काय?वन्यजीव व्यवस्थापनातील यशामुळे आपल्या येथे मागील चार वर्षात वाघांची संख्या दुप्पट म्हणजे १०४ वरून २१० झाली आहे. त्यांच्या अधिवासासाठी जंगले कमी पडतात. त्यामुळे व्याघ्र व्यवस्थापनांतर्गत त्यांच्या स्थलांतरणाचा (ट्रान्सलोकेशन) विचार सुरू आहे. परंतु ही एक शास्रोक्त आणि प्रदीर्घ प्रक्रिया आहे. कुठल्याही वाघाला कुठेही सोडता येत नाही. संपूर्ण अध्ययनाअंतीच त्याबाबत निर्णय घेतला जाईल.विकास प्रकल्पांमुळे जंगलांचा ºहास होत आहे. मग वाघांचे अधिवास कसे सुरक्षित राहणार?मानवी विकासाच्या दृष्टीने आवश्यक प्रकल्पांमध्ये थोडाबहुत समझोता करावा लागत असला तरी जंगल व त्याच्या बाहेरचे क्षेत्र तसेच कॉरिडोर व्यवस्थापन आदींच्या माध्यमाने वन्यप्राण्यांच्या हालचाली थांबू नयेत याची पूर्ण काळजी घेतली जाते.वन्यजीव संवर्धनापेक्षा पर्यटनालाच अधिक महत्त्व दिल्या जात आहे काय?वन पर्यटन हे वन्यजीव व्यवस्थापनाचे अस्त्र आहे. लोकांना जंगलात फिरता आले प्राण्यांचा सहवास लाभला की त्यांच्याबद्दल प्रेम आणि जागरूकता निर्माण होईल आणि प्राण्यांच्या शिकारी कमी होतील. शिवाय पर्यटनात योग्य संतुलन राखण्यात आले आहे.