शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

डिजिटल इंडियाची हवाहवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 05:05 IST

सामान्य माणसासाठी ही डिजिटल इंडिया समस्या झाली. ग्रामीण भागातील बँकांबाबत तर बोलायलाच नको. सर्व्हर बंद ही कायमची गोष्ट.

सामान्य माणसासाठी ही डिजिटल इंडिया समस्या झाली. ग्रामीण भागातील बँकांबाबत तर बोलायलाच नको. सर्व्हर बंद ही कायमची गोष्ट. त्यामुळे बँकेचे कामकाज चालू हा ‘सोनियाचा दिन’ समजला जातो. दुसरा प्रश्न सेवा केंद्रांचा. जातीचे प्रमाणपत्र, सात-बारा, रहिवासी प्रमाणपत्र ही सोय सर्वांसाठी केली असली तरी ती गैरसोयच झाली आहे. अशा एक ना अनेक कहाण्या. यात माझा भारत कुठे ?तंत्रज्ञानाच्या कितीही बाता मारल्या तरी ‘हम नही सुधरनेवाले’! तंत्रज्ञान स्वीकारणे जेवढे सोपे तेवढे ते व्यवहारात कायम ठेवणे अवघड. कारण त्यासाठी शिस्त लागते. प्रसंग साधाच पण तंत्रज्ञानाची काळजी न घेतल्याने हजारो ज्येष्ठ नागरिकांना किती मनस्ताप सोसावा लागला त्याचे हे विदारक उदाहरणच म्हणता येईल. दर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत निवृत्त कर्मचाºयांच्या बँक खात्यांमध्ये त्यांचे निवृत्तीवेतन जमा केले जाते. निवृत्त कर्मचाºयांना ते वेळेवर मिळावे यासाठी काळजी घेतली जाते. प्रत्येक विभागात ‘लीड बँक’ वेगळी असल्याने हा सारा कारभार त्या बँकेमार्फत चालतो. फक्त जिल्हा कोषागाराला ती ठराविक रक्कम जमा करावी लागते. या महिन्याच्या पहिले चार दिवस औरंगाबाद, परभणी, नांदेड या जिल्ह्यांमध्ये स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखांमध्ये निवृत्तीवेतनधारकांची गर्दी होती आणि पहिला आठवडा ती अपेक्षित असते; पण रोज गर्दी वाढत होती. हे वृद्ध खातेदार रांगा करून वाट पाहत होते आणि कोषागारातून खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे उत्तर त्यांना रोज मिळत असे. एकट्या औरंगाबाद शहरात ३३ हजार निवृत्त कर्मचाºयांचा हा प्रश्न होता. उपचार, औषधे आणि महिन्याचा खर्च यासाठी हे सर्वच निवृत्त वेतनावर अवलंबून; पण कोषागाराने अजून पैसे जमा का केले नाही असे बँकेनेही विचारले नाही. ज्यावेळी ‘लोकमत’ने हा प्रश्न उचलला त्यावेळी जाग आली आणि कोषागारातून पैसे कधीच जमा झाले आहेत; पण हैदराबादस्थित बँकेचा मुख्य सर्व्हर नादुरुस्त असल्याने ते खातेदारांच्या खात्यात जमा झाले नाहीत. हे ज्यावेळी उलगडले त्याक्षणी बँकेचे अधिकारी खडबडून जागे झाले; पण सर्व्हर चार दिवस बंद होता याचा कुणालाही पत्ता नव्हता. पुढे यंत्रणा हलली. प्रश्न सुटले; पण वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना मनस्ताप आणि हेलपाटे झाले त्याचे काय?प्रश्न तंत्रज्ञानाचा आणि ओघानेच जसे जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी या अर्थाने ‘डिजिटल इंडिया’चा जयघोष केला जातो त्याचा आहे. कॅशलेस सोसायटी हा सुद्धा याचाच भाग आहे आणि त्याचा मनस्ताप आपण सोसत आहोत. एटीएम सेवा २४ तास उपलब्ध असण्यासाठी आहे; पण सलग दोन दिवस सुट्या आल्या तर देशभरातील एटीएममध्ये होणारा खडखडाट नवा नाही. म्हणजेच तंत्रज्ञानाचा स्वीकार हा नागरिकांना विनाकष्टाची सेवा मिळावी यासाठी केला असला तरी पैसे काढण्यासाठी एटीएमच्या चपला घासाव्या लागतात. हे काही प्रश्न आहेत. दुसरा प्रश्न वाढत्या सायबर गुन्ह्यांचा. तंत्रज्ञान वापरात आणण्यापूर्वी त्यासाठी समाजात तंत्रज्ञान साक्षरता रुजवावी लागते; पण तो लोकशिक्षणाचा भाग आपल्याकडे अधुराच सोडला गेला. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होताना दिसते. म्हणजे असे अनुभव गाठीशी घेत शिका आणि तंत्रज्ञान स्वीकारा, असे तर सरकारला वाटत नाही ना? तर अशा एका संक्रमणातून आपण जात आहोत; पण ही संक्रमणावस्था कधी संपणार? हे सरकारही सांगत नाही. याचाच अर्थ डिजिटल इंडियाची उभारणी करताना असे फटके आपल्याला सोसावे लागणार.