शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गड-किल्ल्यांची अवघड वाट

By admin | Updated: January 18, 2017 00:52 IST

राजे, संस्थाने खालसा झाली, युद्धनीती बदलली. आधुनिक काळात उपयुक्तता संपल्याने किल्ल्यांची दुर्दशा झाली.

राजे, संस्थाने खालसा झाली, युद्धनीती बदलली. आधुनिक काळात उपयुक्तता संपल्याने किल्ल्यांची दुर्दशा झाली. याला जबाबदार आपणच आहोत.तब्बल दोन हजार वर्षांचा वारसा असणारे मराठवाड्यातील किल्ले कात टाकणार आहेत. राज्य पुरातत्व खात्याने परंडा, औसा आणि धारूर येथील किल्ल्यांसाठी १३ कोटी रुपयांचा निधी देऊन एकदाची सुरुवात केली आणि वेताळवाडी अजेंड्यावर घेतला. किल्ले म्हटल्यानंतर ते सह्याद्रीतीलच असा एक समज जनमानसासह सरकारमध्येही आहे; पण त्या पलीकडे मराठवाडा, खांदेश, विदर्भात किल्ले आहेत याचा विसर सरकारला पडला तर ठीक, पण त्या त्या भागातील लोकांनाही पडलेला दिसतो. सह्याद्रीतील किल्ले हे शिवरायांच्या आणि मावळ्यांच्या पराक्रमांमुळे आजही राष्ट्रतेजाचे स्फुल्लिंग राहिलेत म्हणून जनमानसात त्यांच्या विषयी आदरभाव, कुतूहल कायम आहे. मराठवाड्यातील किल्ल्यांच्या वाट्याला हे भाग्य आले नाही आणि निजामशााहीच्या अस्तानंतर ते अडगळीत पडले.मराठवाड्यात बेलाग गड नसले तरी काही ठिकाणे अवघड जरूर आहेत. एकूण पंधरा किल्ल्यांपैकी काही भुईकोट तर काही निमडोंगरी आहेत. गिरी दुर्ग आहेत तसे अंतूरसारखे वनदुर्गही आहेत. उदगीरचा भुईकोट किल्ला असला तरी १७६० मध्ये सदाशिवराव भाऊंनी पानिपतची मोहीम येथूनच सुरू केली होती. खर्ड्याच्या मराठे-निजाम यांच्या लढाईचे ऐतिहासिक महत्त्व आहे. सवाई माधवरावांनी ती खुद्द लढली होती. नळदुर्गचा किल्ला ११४ बुरजांचा आणि ११५ एकरवर त्याचा प्रचंड विस्तार. मजबूत दरवाजा आजही टिकून आहे. बहामनी, विजापूरच्या आदिलशाहीकडून निजामाकडे आला आणि १९४८ च्या पोलीस अ‍ॅक्शननंतर तो सरकारकडे जमा झाला. आजही नळदुर्गची नवलाई कायम आहे. औरंगाबादजवळच्या देवगिरीची कथाही तशीच. यादवांपासून ते मोगल, पेशवे, निजाम अशी राजधानी पाहात आजही तो देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण आहे. कमी उंचीचा असला तरी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधणीमुळे तो साडेसहाशे वर्षे बेलाग होता. ‘दौलताबादचे देवगिरी दशगुणी उंच असे देखोन संतुष्ट जाले...’ अशी सभासद बखरीबद्दल नोंद आहे. शिवाजी महाराजांविषयीचा उल्लेख आहे. औरंगाबाद-खांदेशच्या सीमेवर विस्मृतीत केलेले पाच किल्ले आहेत. यात नागापूर जवळचा अंतूर, नागदजवळ लांझा, नायगावजवळचा सुतोंडा, जंजाळ्यानजीकचा वैशागड किंवा विसागड आणि हळदा-सोयगावजवळचा वेताळवाडी, फुलंब्रीजवळचा लहुगड हा दुर्लक्षिलेला. अशा किल्ल्यांचे सामरीक महत्त्व होते. सरकारचेही दुर्लक्ष झाले. एकूणच इतिहासाविषयी अनास्था आणि अंधश्रद्धेचा पगडा यामुळे मराठवाड्यातील या किल्ल्यांमध्ये गुप्तधन शोधण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करून इमारती, तटांची वासलात लावली. ज्या भागात, गावाजवळ ते आहेत तेथील लोकांनासुद्धा या ऐतिहासिक वारशाचे महत्त्व उमजले नाही. पडझडीमुळे किल्ल्यांवर झाड-झडोरा वाढला आणि ते गुरं चरण्याची ठिकाणं बनले. पुरातत्व खाते नावालाच. त्यामुळे दगड, शिल्प, शिलालेखांची चोरी झाली. नेण्यासारख्या सगळ्या वस्तू चोरीला गेल्या, या चोऱ्या दिवसाढवळ्या राजीखुशीने झाल्या आणि त्याचा बोभाटाही झाला नाही. परवाच उद्धव ठाकरेंनी गड-किल्ले पुरातत्व खात्याच्या जोखडातून सोडवा, अशी मागणी केली. समजा ते खाजगी विकासकाकडे काही वर्षांच्या करारावर दिले तर काय होईल. आजवरचा अनुभव पाहाता विकासक त्याची डागडुजी करील. व्यापारी दृष्टीने त्यांचा वापर होईल आणि जे सहकारी साखर कारखान्यांचे झाले तेच किल्ल्यांचे होईल. ती कोणाची तरी खाजगी मालमत्ता होईल. यापेक्षा जनतेमध्ये इतिहासाविषयी आवड निर्माण करून अशा वास्तंूबद्दल अभिमान जागृत केला तर त्या त्या परिसरातील लोक त्याची निगा राखतील. नाही तरी सरकारने हळूहळू सर्व सेवा आऊटसोर्स करणे सुरू केले आहे. सरकारला सत्तेशिवाय कोणतेच लोककल्याणकारी काम नको आहे. गड, किल्ले शाबूत ठेवणे हे त्या त्या प्रदेशाची जबाबदारी आहे आणि आपण ती ओळखली पाहिजे. कारण दुर्गम गडांची वाट ही अवघड असते.- सुधीर महाजन