शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

देवेंद्रभाऊ हाजीर हो...

By राजा माने | Updated: January 15, 2018 02:15 IST

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती.

आमीर खानच्या ‘पीके’ची समोरच्या व्यक्तीला हस्तांदोलन केले की, त्याच्या मनातील सबकुछ जाणण्याची दिव्यशक्ती इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर ‘यमके’ला (यमके अर्थात आमचा यमगरवाडीचा एमके ऊर्फ मनकवडे) होती. त्याच क्वॉलिफिकेशनवर नारदांनी त्याची इंद्रलोकचा मराठी भूमीतील स्टार रिपोर्टर म्हणून नियुक्ती केली होती. त्याच दिव्यशक्तीचा वापर करून यमकेने भीमा-कोरेगाव प्रकरणाची पाळेमुळे खोदून इंद्रदेवांना आपला रिपोर्ट सादर केला होता. त्यामुळे कालची संक्रांत त्याच्यासाठी आनंदाची ठरली होती. भिडे गुरुजी, एकबोटे, बाळासाहेब आंबेडकर, पुरुषोत्तम खेडेकर, भीमा-कोरेगाव प्रकरणात गप्प राहिलेल्या नीलम गो-हेंपासून ते थेट जाणता राजा, रावसाहेब कसबे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडेसह ‘ढवळ्या-पवळ्यां’ना तिळगुळाच्या वड्या वाटून गावाकडे निघाला होता. एवढ्यात मोबाईलची रिंग सुरू झाली... कुठे शोधिसी रामेश्वर अन् कुठे शोधिसी काशी... नारदांचा फोन होता ! यमकेने जीवावर येऊनच उचलला. तिकडून नारदांनी त्याला निरोप दिला, उद्या इंद्रदरबारी हजर राहा. देवेंद्रभाऊंना इंद्रदेवांनी दरबारात हजर राहण्याचे फर्मान काढलंय ! आता मराठी भूमी शांत झाली असे वाटतानाच इंद्रदेवांनी देवेंद्रभाऊंना का बरे बोलावले? संक्रांत आनंदात गेली आता किंक्रांत कोणते रंग दाखविणार याचा अंदाज बांधत नारदांनी पाठविलेला व्हीव्हीआयपी पास घेऊन इंद्रदरबारात दाखल झाला. यावेळी नारद स्वत:च देवेंद्रभाऊंना घेऊन इंद्रदरबारात हजर होते. ‘देवेंद्रभाऊ हाजीर हो...’ या हाकेनेच दरबार सुरू झाला.इंद्रदेव- बाळ देवेंद्र, एकटेच आलात?नारद- देवा, आपणच केवळ त्यांनाच हाजीर करण्याचा निरोप दिला होता.देवेंद्रभाऊ- जी देवा !इंद्रदेव- बाळ देवेंद्र, काय चाललंय हे मराठी भूमीत? (इंद्रदेवांचा प्रश्न संपताच देवेंद्रभाऊऐवजी यमकेच उत्तर देऊ लागला.)यमके- देवा, मी संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला सादर केला आहे. अनेकांचा डाव बुमरँग ठरला आहे. वेगवेगळ्या जातींचे ध्रुवीकरण, मतांची जातीय गणिते अन् नव्या जाती नेतृत्वाचे बीजरोपण असे अनेक मुद्दे त्यात आहेत...इंद्रदेव- थांब यमके ! मी बाळ देवेंद्रला विचारले आहे. बाळा बोल...देवेंद्रभाऊ- अध्यक्ष महोदय... अध्यक्ष महोदय... माफ करा, मला देवा म्हणायचे होते ! देवा, मी काय करू? एकीकडे रेशीमबाग, दुसरीकडे मोदी दरबार या प्रेशरमुळे माझे वजन आपोआपच घटू लागले आहे. डायटेशियनचे देखील तसेच म्हणणे होते ! पण देवा, मी शांत राहाण्यातच आनंद मानला...इंद्रदेव- मग बुमरँगचा तडाखा कोणाला बसला?देवेंद्रभाऊ- देवा, आपण सगळेच जाणता ! पण मराठी भूमीतील जनतेला मी सलाम करतो. कारण ते कुठल्याही षड्यंत्राला बळी पडले नाहीत. लाखोंचे विश्वविक्रमी मोर्चे काढणाºया मराठा समाजाने जसा समजूतदारपणा दाखविला तसा दलित समाजानेही दाखविला आणि मी सुटलो...इंद्रदेव- बाळ देवेंद्र, आता कोणत्याही बागेचे अथवा जंगलाचे प्रेशर घेणे तुम्हाला परवडणार नाही हे बजावण्यासाठीच येथे पाचारण केले आहे. जे सत्य ते स्वीकारा आणि अ‍ॅक्शन घ्या अन्यथा आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. (एवढेच बोलून देवांनी दरबार विसर्जित केला.)- राजा माने