शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

थोरले काका अन् देवेंद्रांच्या खुर्चीमागे नारद मुनी

By सचिन जवळकोटे | Updated: June 10, 2021 08:34 IST

एकमेकींशी कट्टी घेतलेल्या रंभा-उर्वशीला समजावायला नारद मुनी गेले न् म्हणाले, ऐका बारामतीकर न नागपूरकर काय- काय बोलले ते!

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)

इंद्र दरबारात गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू होती. काही नर्तिकांमध्ये रुसवेफुगवे झाले होते. रंभा-उर्वशीला बऱ्याच वेळा समजून सांगूनही त्या दोघी एकमेकींशी बोलायला बिलकुल तयार नव्हत्या. ही बाब कानावर गेली, तेव्हा इंद्र महाराजांनी आदेश दिला, ‘जर भूतलावर बारामतीकर अन् नागपूरकर एकमेकांशी बोलू शकत असतील, तर या दोघींना काय अडचण?’ हे ऐकून दचकलेल्या दोघींनी झटक्यात मौन सोडले.एकमेकींकडे बघून दिलखुलास हसल्या. मग मात्र, त्यांनी नारद मुनींकडे गळ घातली, ‘पण मुनी, थोरले काका अन् देवेंद्र नेमकं काय काय बोलले, हे आम्हालाही सांगा ना.’ - मग काय... मुनींनी हळूच वीणा झंकारत त्या दोघांमधला मधुर संवाद स्टार्ट टू एंड ऐकवला, तो असा...

देवेंद्र : तुमच्या तब्येतीला शुभेच्छा द्यायला आलो होतो.काका : तुमच्या शुभेच्छा तर दीड वर्षापूर्वीच पावसाळ्यात मिळाल्या, म्हणून तर साताऱ्यात चिंब भिजूनही मी ठणठणीत राहिलो, सरकारही खणखणीत आलं.देवेंद्र (लगेच विषय बदलत) : पण तुम्हाला मानसिक त्रास खूप होतो म्हणे अलीकडं वर्षभरापासून. तुमच्याकडं रिमोट एकच; पण टीव्ही खूप झालेत ना. कुणा कुणावर कंट्रोल ठेवणार तुम्ही?काका (अगदी सहजपणे) : त्यात काय विशेष? कुणाचा आवाज कधी बारीक करायचा, याची बटनं आहेत माझ्याकडं. घ्याऽऽ पाणी घ्याऽऽ. देवेंद्र (ग्लास उचलत) : पण तुमचे ते ‘संजयराव’ सरकारच्या तोंडचं पाणी पळवताहेत म्हणे. खेडमध्ये येऊन तुमच्या दादांनाही त्यांनी दम दिलाय!काका : पाहुण्यांच्या धाकानं घरातलं लेकरू शांत बसत असेल, तर काय प्रॉब्लेम म्हटलं? तुम्हाला पाहुण्यांचा राग येतोय की, लेकराची काळजी वाटतेय? घ्या... चहा घ्या ऽऽ. 

देवेंद्र (कपात दूध ओतत) : नाथाभाऊंसारखी मंडळी सांभाळणंही तुमच्यासाठी थोडं अवघडच की... कधी दुधात मिठाचा खडा पडेल, सांगता येत नाही.काका (गालातल्या गालात हसत) : नारायण मालवणकरांसारख्यांनाही आम्ही पूर्वी सहजपणे हँडल केलंय. उलट तुम्ही जळगावला जाऊन या. किती शांत झालेत ते... बघून याच.देवेंद्र (कपात हळूच चमच्यानं ढवळत) : पण ‘वडेट्टीवार’सारखी मंडळी कधी शांत होणार? सीएम नेमकं कोण, तेच समजत नसेल तुम्हालाही.काका (शांतपणे रोखून बघत) : आमच्या दादांना भेटलात की नाही? चक्कर मारून या त्यांच्याकडं.देवेंद्र (गरमागरम चहाचा सावधपणे घोट घेत) : नको. नको. एकदा दूधानं तोंड पोळलं की, माणूस ताकसुद्धा फुंकून पितो.काका (मिश्कीलपणे) : तेव्हा मला विश्वासात घेतलं असतं, तर कदाचित दूधच काय... मलई अन् पनीरही मिळालं असतं की तुम्हा दोघांना. घाई नडली तुमची.

देवेंद्र (रिकामा कप खाली ठेवून हळूच कोपऱ्यातल्या ड्राॅवरकडे बघत ) : होय. चूक कळली आम्हाला. आम्ही तुमची भरलेली किटलीच घ्यायला हवी होती. दादांचा रिकामा कप हुडकत बसलो उगाच.काका (नोकर ट्रे घेऊन गेल्यानंतर) : आता तरी कुठं वेळ निघून गेलीय? मी तेव्हाही दिल्लीत भेटून आलो होतोच की तुमच्या अमितभाईंना... पण त्यांनीच इंटरेस्ट दाखवला नाही, मग मी तरी काय करणार?देवेंद्र (अस्वस्थपणे रुमालानं तोंड पुसत) : त्यांनी इंटरेस्ट सत्तेत दाखवला नव्हता की मी सीएम होण्यात? काका (झटकन विषय बदलत) : बाकी काय.. बडीशेप घ्या. खास गुजरातहून आणलीय. मध्यंतरी अहमदाबादला गेलो होतो ना, तेव्हा घेतली.देवेंद्र (पुन्हा जुन्या विषयाचा धागा पकडून) : तुम्ही तर म्हणत होता की, अजूनही वेळ गेलेली नाही. मग सांगा कधी? आपल्या संवादाचं दळणवळण ठेवूया व्यवस्थित. (एवढ्यात सुप्रियाताई काकांना मोबाइल आणून देतात.)

ताई : दिल्लीच्या मिनिस्ट्रीमधून कॉल आलाय. नितीनभाऊ बोलणार आहेत.देवेंद्र (पटकन उठत) : चलाऽऽ येतो मी. तुमच्या तब्येतीला अन् तुमच्या सरकारला शुभेच्छाऽऽ. नारदांनी सांगितलेला जस्साच्या तसा संवाद ऐकल्यानंतर अप्सरेनं विचारलं; ‘पण मुनी, पुढं काहीच न बोलता नागपूरकर का निघून गेले? नव्या समीकरणाची चाचपणी करण्याची चांगली संधी मिळाली होती की त्यांना.’ गालातल्या गालात हसत नारद उत्तरले, ‘आता नवा राजकीय जुगाड केवळ ‘ताईं’साठीच होऊ शकतो, हे  त्या कॉलवरून कळतं ना... म्हणूनच गुजराती बडीशेप न खाता ते परत पावली फिरले. नारायणऽऽ नारायणऽऽ.’       

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारण