शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

हा विकास की भकास आराखडा

By admin | Updated: March 29, 2015 23:02 IST

कोणत्याही शहराचा डीपी प्लॅन म्हणजे शहर विकास आराखडा. शहरात राहणाऱ्यांच्या सोयी, गरजा लक्षात घेऊन तो केला जाणे अपेक्षित असते.

अतुल कुलकर्णी -कोणत्याही शहराचा डीपी प्लॅन म्हणजे शहर विकास आराखडा. शहरात राहणाऱ्यांच्या सोयी, गरजा लक्षात घेऊन तो केला जाणे अपेक्षित असते. ज्या शहराचा आराखडा बनवला जातो ते शहर पुढच्या वीस- पंचवीस वर्षांनी कसे दिसेल याचे ते चित्र असते. मात्र ज्यांच्यासाठी असे आराखडे बनतात, त्यांना विश्वासात घेतले जाते का? त्यासाठी जनजागृती केली जाते का? आराखडे बनवताना कोणाच्या भविष्याचा विचार होतो? - हे सगळे प्रश्न सध्या ऐरणीवर आले आहेत ते मुंबईच्या विकास आराखड्यामुळे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हा विकास आराखडा केला. वर्षानुवर्षे पालिकेवर सत्ता असणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुखांनी तो चुलीत घालण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांच्याच पक्षाच्या महापौरापासून एकाही पदाधिकाऱ्याने यात चांगले काय, वाईट काय हे जाहीरपणे सांगण्याचा प्रयत्न केला नाही. तीनचारशे पानाचा हा आराखडा, ज्यात असंख्य नकाशे आहेत तो नागरिकांनी वाचून आपले मत ६० दिवसांच्या आत द्यायचे आहे. त्यावरून सध्या प्रचंड वाद सुरू झाला आहे. मुंबई जगातल्या दोन चार शहरांपैकी एक असे शहर आहे, ज्या शहराच्या मध्यवर्ती भागात निसर्गाने तयार केलेले राष्ट्रीय उद्यान आहे. मात्र आरे कॉलनी आणि आणि राष्ट्रीय उद्यानाला नव्या विकास आराखड्याने मूठमाती देण्याचे ठरवल्याने सगळा वाद सुरू झाला. न्यूयॉर्कला सेंटर पार्क आहे. ७८८ एकरात ते पसरलेले आहे. २८ शिवाजी पार्क सामावू शकतील एवढा त्याचा आकार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवई ते घोडबंदर असे १०४ चौ. किमी. एवढ्या प्रचंड जागेत आहे. ३० सेंट्रल पार्क बसतील एवढा त्याचा आकार आहे. त्यांचे सेंट्रल पार्क न्यूयॉर्कच्या पर्यटनात, विकासात भर टाकत असताना, आपले नॅशनल पार्क बिल्डरांच्या झोळ्या भरत आहे. मुंबईसारखे शहर भविष्यात कसे असेल याचा विचार करताना शहराला एफएसआय किती वाढवून द्यायचा याचा विचार कधी होणार आहे का? नव्या आराखड्याने सहा ते आठ एफएसआय देण्याचे ठरवले आहे. रस्ते आहे तेवढेच आहेत, सांडपाणी, पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन आहे तेवढीच आहे, फक्त शहराची उंची वाढल्याने लोक वाढतील, पण त्याचा ताण आहे त्या व्यवस्था झेलण्यास तयार आहेत का? याचा कसलाही विचार या आराखड्यात नाही. ब्रिमस्टोवॅडसारखा प्रकल्प केंद्राने हजार बाराशे कोटी रुपये देऊन सात आठ वर्षे झाली तरीही पूर्ण झालेला नाही. २० वर्षांनंतर पडणारी पाण्याची गरज भागवण्याचे कोणतेही नियोजन नाही. केवळ बिल्डरधार्जिणे आराखडे आखण्याने हे शहर एकेदिवशी काळाच्या उदरात असे काही गडप होऊन जाईल की ते फक्त गोष्टीपुरतेच उरेल...! पण याचा कसलाही विचार ना अधिकाऱ्यांकडे आहे ना राज्यकर्त्यांकडे. शनिवारी राज ठाकरे यांनी पुढाकार घेत आमिर खान, जावेद अख्तर, सलमान खान, रितेश देशमुख यांसह मराठी- हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर, संपादक, विचारवंत यांना एकत्र आणले. त्यात बोलताना आमिर खानने मांडलेला मुद्दा बोलका आहे. विकास आराखड्याने शहर बदलणार असेल तर शासनाने त्याचे ठिकठिकाणी सादरीकरण करायला हवे. आम्हाला तांत्रिक गोष्टी कळत नाहीत, पण त्या समजावून सांगण्याची जबाबदारी शासनाची आहे. जे आमिर खानला कळते ते शासनाला का कळत नाही? केवळ इंटरनेटवर आराखडा टाकल्याने किंवा त्याच्या प्रती दिल्याने तो कसा समजणार? आज जगभरातून येणारे पर्यटक मुंबईचा वापर केवळ प्लॅटफॉर्मसारखा करतात. विमानतळावर उतरून गोवा, राजस्थान, मध्य प्रदेशात निघून जातात. इथे राहणाऱ्यांना चांगल्या सोयी मिळत नाहीत. या परदेशी पाहुण्यांचे दुखणे कोण दूर करणार? या शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता कसलाही विचार त्यात नाही. इंग्रजांनी बांधून ठेवलेले सीएसटी स्टेशन अजून टिकून आहे आणि आम्ही उभारलेली स्टेशनं का बकाल दिसतात असा सवाल राज ठाकरेंनी केला तर त्यात गैर काय? त्याच इंग्रजांनी बांधलेल्या एका इमारतीत बीएमसीचे कार्यालय आहे. जे ठरलेल्या किमतीपेक्षा कमी पैशात झाले आहे. जेथे बसून या शहराची पुरती वाट लावणारा आराखडा येत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा.