शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अराजकाची इच्छा

By admin | Updated: January 5, 2016 23:52 IST

महाभारतातील द्रोपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी अत्यंत संतप्त झालेल्या भीमाने बहुधा पुनर्जन्म घेतला असावा आणि तो राजधानी दिल्लीचा पोलीस आयुक्त बनला असावा कारण त्याचे नावदेखील भीमसेन

महाभारतातील द्रोपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी अत्यंत संतप्त झालेल्या भीमाने बहुधा पुनर्जन्म घेतला असावा आणि तो राजधानी दिल्लीचा पोलीस आयुक्त बनला असावा कारण त्याचे नावदेखील भीमसेन बस्सी असेच आहे. महिलांवरील वाढत्या अत्त्याचाराच्या गुन्ह्यांना आळा बसावा म्हणून महिलांनीच त्यांच्या आत्म संरक्षणासाठी सज्ज राहिले पाहिजे असे वक्तव्य करुन हे गृहस्थ मध्यंतरी वादळात सापडले होते. आता त्यांनी त्या वक्तव्यावरही मात केली आहे. आपण तेव्हां जे बोललो त्याचा विपर्यास केला गेला ही नेहमीचीच सबब पुढे करुन आपण महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची किती घृणा करतो हे सांगताना, राज्यघटना आणि सरकार आपल्याला परवानगी देणार असेल तर अशा गुन्हेगारांना आपण जागच्या जागी गोळ्या घालून ठार मारु (शूट अ‍ॅट साईट) अशी मागणीच त्यांनी केली आहे. देशात आणि खरे तर कोणत्याही सुसंस्कृत समाजात कायद्याचे राज्य असते आणि कायदाच सर्वपरी मानला जातो. हा कायदा कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरुन गुन्हेगार मानीत नसतो. जोवर संबंधितावरील आरोप निर्विवादपणे सिद्ध होत नाही आणि तो गुन्हेगार ठरत नाही तोवर त्याला शिक्षा होत नाही व शिक्षा करण्याचा अधिकारही केवळ न्यायालयांकडेच सुरक्षित असतो. हा अधिकार पोलिसांना देणे म्हणजे ‘पोलीस राज’ला आणि म्हणूनच अराजकाला निमंत्रण देणे ठरत असते. बस्सी यांची इच्छा बहुधा तशीच असावी असे दिसते. महिलांवरील अत्याचाराच्या विषयाची चर्चा देशात अधिक गांभीर्याने सुरु झाली ती दिल्लीतीलच सामूहिक बलात्काराच्या घृणास्पद प्रकारामुळे. पण त्या घटनेतील तेव्हां बाल असलेल्या आणि एव्हाना प्रौढ झालेल्या गुन्हेगाराला जनतेचा प्रचंड दबाव असतानाही तुरुंगात डांबले गेले नाही व एका स्वयंसेवी संस्थेच्या ताब्यात दिले गेले, ही बाब बस्सी यांना ठाऊक असायला हरकत नाही. त्याचबरोबर हेही तितकेच खरे की, बस्सी सर्वाधिकारी असते तर त्यांनी या गुन्हेगारालाही यमसदनीच धाडले असते. पण बस्सी तिथेच थांबले असेही नाही. केवळ परमेश्वरी कृपा म्हणूनच दिल्ली पोलीस केन्द्राच्या अखत्यारित असून राज्य सरकारच्या नाही असे विधान करुन त्यांनी निश्चितच मर्यादाभंग केला आहे. केन्द्र सरकारला दिल्लीत कोणतेही अनैसर्गिक स्वारस्य नाही पण केजरीवाल सरकारला मात्र ते जरुर आहे असे जाहीर विधान एका सरकारी नोकराने करणे म्हणजे केजरीवाल यांचा केन्द्र सरकारवर जो आक्षेपवजा आरोप आहे त्याला बळकटी प्राप्त करुन देणेच आहे. दिल्लीतील नोकरशाही भाजपाची ‘बी टीम’ असल्याचे केजरीवालांचे मत आहे.