शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

दिल्ली जात्यात, तर महाराष्ट्र सुपात

By admin | Updated: November 9, 2016 01:55 IST

वाऱ्याच्या दिशेत फरक पडल्याने दिल्लीकरांंची ‘गॅस चेंबर’मधून थोडी सुटका झाली असली, तरी हा केवळ तात्कालिक दिलासा आहे

वाऱ्याच्या दिशेत फरक पडल्याने दिल्लीकरांंची ‘गॅस चेंबर’मधून थोडी सुटका झाली असली, तरी हा केवळ तात्कालिक दिलासा आहे. मूळ समस्या तशीच आहे आणि जोपर्यंत तिला मूलभूतरीत्या हात घालण्याचा ठोस निर्णय होऊन तो ठामपणे अंमलात आणला जात नाही, तोपर्यंत दिल्लीतील नागरिकांंच्या नशिबी हे ‘गॅस चेंबर’मध्ये राहणे अटळ बनले आहे. दिल्लीला भेडसावणारी प्रदूषणाची समस्या काल-आजची नाही. पूर्वापारपासून ती कलाकलाने तीव्र बनत गेली आहे. त्यात भर पडली आहे, ती जागतिक स्तरावरील हवामन बदलाच्या प्रक्रियेची. त्याला जोड मिळत गेली, ती देशातील उत्सवप्रियतेची व चंगळवादी वृत्तीची. गेला आठवडाभर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाचे प्रमाण धोक्याच्या पातळीच्या किमान पाच पट वाढले होते. त्यातही काही प्रदूषणकारी घटकांची मर्यादा धोक्याच्या पातळीच्या सोळा पटीने जास्त वाढली होती. त्यामागचे कारण होते, दिवाळीत उडवण्यात आलेल्या फटाक्यांचे आणि उत्सवानिमित्त रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या रहदारीचे. चेहऱ्यावर ‘मास्क’ घातल्याविना रस्त्यावर १० मिनिटे चालल्यास दिवसात २० सिगरेटी ओढल्यामुळे होणाऱ्या अपायाएवढी फुफ्फुसाची हानी होण्याची पाळी दिल्लीकरांवर आली. त्यामुळे शाळांना सुटी जाहीर करावी लागली. रस्त्यावरील धूळ कमी होण्यासाठी वारंवार पाणी मारण्याची मोहीम दिल्ली सरकारला हाती घ्यावी लागली. अर्थात गेली काही वर्षे दिल्लीत हे वारंवार घडत आले आहे. यंदा परिस्थिती हाताबाहेर गेली एवढाच काय तो फरक. मात्र गेल्या पंधरवड्याने दाखवून दिले आहे की, तातडीने उपाय अंमलात आणले नाहीत, तर दिल्लीत राहणे अशक्य बनणार आहे आणि ज्यांना या शहरात राहणे आवश्यकच आहे, त्यांना श्वसनाचे आजार टाळता येणार नाहीत. अशा विकाराने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या येत्या काही वर्षांत किमान २० ते २५ हजारांच्या घरात जाईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. म्हणूनच गरज आहे, ती तातडीच्या उपाययोजनेची व या उपयांच्या कठोर अंमलबजावणीची. दिल्लीच्या व केंद्राच्या सरकारला याची जाणीव नाही, असे नाही. उदाहरणार्थ, सध्या हवामान बदलाबाबत जागतिक स्तरावरील परिषद मोराक्को या देशातील मराकेश येथे ७ नोव्हेंबरपासून सुरू आहे. हवामान बदलाचे जे संकट जगावर आले आहे, ते निवारण्यासाठी निसर्गाच्या चक्राला बाधा न आणता व प्रदूषण होणार नाही, अशी उपाययोजना केली जाईल, अशा रीतीने विकासाचे प्रतिमान (मॉडेल) जगातील सर्व देशांनी अंमलात आणायला हवे, अशी भूमिका भारतातर्फे या परिषदेत मांडली जाणार आहे. हवेचे प्रदूषण करणाऱ्या घटकांच्या उत्सर्जनाचे प्रमाण आपण किती कमी करू शकतो, याची प्रत्येक देशाने ग्वाही द्यावी, असे जागतिक स्तरावरच्या परिषदेत ठरले होते. त्याप्रमाणे भारतानेही ग्वाही दिली आहे. त्याला धरूनच मराकेश येथील परिषदेत भारत ही भूमिका मांडणार आहे. मात्र ही भूमिका भारतात प्रत्यक्षात आणायची असेल, तर देशातील जनतेच्या जीवनपद्धतीत मोठा बदल घडवून आणणे भाग आहे. याचा अर्थ घड्याळाचे काटे उलटे फिरवणे, असा होत नाही. आधुनिकता नाकारायचीही अजिबात गरज नाही. मुद्दा आहे, तो ‘गरज’ व ‘हव्यास’ यांतील सीमारेषा ओळखून ती न ओलांडू देण्याचा. दिल्लीतील भीषण प्रदूषणाला मुख्यत: जबाबदार आहे, ते वाहने सोडत असलेला धूर. उत्तर भारतातून देशाच्या पश्चिम, दक्षिण व पूर्वेकडे जाणारी बहुसंख्य मालवाहतूक दिल्लीमार्गे होते. शिवाय दिल्लीत ३० लाख दुचाकी वाहने आहेत आणि त्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. इतकी दुचाकी वाहने वा मोटारी रस्त्यावर येतात; कारण दिल्लीत कार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. आता ‘मेट्रो’ रेल्वे आली आहे. पण ती चहूबाजूंनी अवाढव्य पसरलेल्या दिल्लीत सर्व ठिकाणी प्रवाशांना पोहोचवू शकत नाही. त्यामुळे बसगाड्या हाच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य आधारस्तंभ आहे. या व्यवस्थेची दुरवस्था कित्येक दशकांपासूनची असली तरी ती आहे, तशीच ठेवण्यात आर्थिक व राजकीय हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे दिल्लीत वा केंद्रात सरकार कोणाचेही असले, तरी ही व्यवस्था गेली किमान चार दशके तशीच चालू राहिली आहे. दिल्लीत एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचण्यासाठी स्वत:चे दुचाकी वाहन असणे, ही नागरिकांची गरज बनली आहे. हा बदल सहज करता येऊ शकतो. त्याचबरोबर ‘प्रतिष्ठा’ म्हणून मोठी महागडी वाहने घेण्याची चंगळवादी प्रवृत्तीही रोखावी लागेल. थोडक्यात सरकार व समाज या दोघांनीही एकत्र येऊन समन्वयाने व सहमतीने जीवनपद्धतीत सुयोग्य बदल करण्याची गरज आहे. हे केवळ दिल्ली पुरतेच असता कामा नये. हवामान बदलाचा धोका व त्यामुळे वाढते प्रदूषण यांचा फटका मुंबई, पणे, नाशिक, चंद्रपूर व महाराष्ट्रातील इतर शहरांनाही कसा बसत आहे, याची ताजी आकडेवारीही प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे दिल्लीकर आज जात्यात असले, तरी महाराष्ट्रातील नागरिक सुपात आहेत, याचेही भान बाळगण्याची नितांत जरूरी आहे.