शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
4
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
5
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
6
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
7
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
8
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
9
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
10
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
11
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
12
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
13
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
14
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
15
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
16
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
17
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
18
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
19
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
20
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!

विवाद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:34 IST

माणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी.

- किशोर पाठकमाणूस कुणीही असो तो चालतो त्याच्यासोबत विवादही चालत असतात. मग तो कोणत्याही क्षेत्रातील का असेना. केवळ राजकारण नाही. ते तर विवाद्य विषयांसाठी कायम असतं. खूपवेळ विरोधक म्हणून काम केले आणि अचानक सत्ताधारी झालं तर होणारी पंचाईत मोठी. विरोधाची सवय एवढी मोठी की आपण स्वकीयाच्या विरोधात हात वरती करतोय हेही कळत नाही. हेच साहित्य, कला, संगीत, क्रीडा, सहकार सर्वच क्षेत्रांना लागू असते. एक चांगली कलाकृती निर्माण करणारे दोन शत्रू निर्र्माण करतो. एक मत्सरी आणि दुसरा क्रांतिकारी. कधी कधी सर्वसामान्य परवडला. तो सरळ हात झटकून मोकळा होतो.म्हणजे आपल्याला कळत नाही बुवा तुमचं हा त्याचा परवलीचा वाक्प्रचार. खरंतर सुटण्याचा प्रकार, परंतु नवीन काय कलाकृती केलीय हे झटून, समजून घेण्याची इच्छा असणारा खरा! तो मूळ विषयाशी भिडण्याचा प्रयत्न करतो. ही झटापट प्रेक्षणीय असते. अर्थात खरा कलाकर ती कलाकृती समजून सांगण्याच्या फंदात पडत नाही. तो करून मोकळा होतो. पण त्याचेही दोन अर्थ होतात. काय माणूस आहे? काय केलं तेच सांगता येत नाही. मग ही कलाकृती तरी त्याची आहे का? हा प्रश्न येतो. खरंतर आपण काढत असलेली प्रत्येक रेषा, रंग, थेंब, आकार, शब्द, अक्षर समजून सांगता यायलाच हवं. आत्ता ही मी तान घेतली, आलाप घेतला, पण तो का? त्याचीही जागा मी का निवडली हे सांगता यायला हवं. हा राग मी याचवेळी का गातो याचं शास्त्र आहे. एखादी कविता आहे त्यातील अमुक एक शब्द मी का वापरला आणि तोच का वापरला याची खूप काहीतरी खूणगाठ म्हणून मनात असते. नव्हे प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत ती असते. एखादा गोलंदाज आपली स्टाईल बदलतो किंवा अमुक एका संघाशी खेळताना तो गोलंदाजीचा प्रकार बदलतो तसे असेल तर प्रत्येकाला ते करण्याचा अधिकार आहे.नाटक फक्त लांबी-रुंदीत नसतं. ते खरंतर उंचीत असतं. खरा दिग्दर्शक नाटकाला व्दिमितीत पहातच नाही. तो त्रिमितीत घुसतो. अवकाशात घुसतो. चौथे परिमाण शोधतो. तो या परिमाणाला भिडला. खरंतर खेटला तो नवीन काही करू शकला. ज्याला हे परिमाण गवसलं तो नक्कीच विवाद्य. कारण तुमचे रूढ संकेतांना दूर करण्याचं धाडस त्याच्यात आहे. तुमच्या हातात असलेल्या शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच साधनांचा वेगळा उपयोग तो करतो, पण त्याचे अर्थ बदलून, उपयोग बदलून. असा विचारवंत कलाकार कायम पुढेच पाहतो. तो आपल्यापुढे चार पावलं असतो. मग शास्त्रज्ञ, विचारवंत साहित्यिक असो. भले तो विवाद्य होत जातो. नव्हे तो विवाद्य नाही झाला तर तो प्रगतिशील, विकासशील लेखक कलाकार होऊच शकत नाही. बघा! फक्त विवाद्य जातीवंत हवा फॅडिस्ट नको!

टॅग्स :newsबातम्या