शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

दत्ताेपंतांची भिक्षांदेही..

By admin | Updated: June 11, 2014 10:52 IST

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत.

'माझ्या या दोन पोरांना काही तरी द्या हो,’ अशी भिक्षांदेही करीत माजी खासदार, माजी मंत्री, राज्य विधान परिषदेचे माजी सदस्य, अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक शिक्षणसंस्थांचे संचालक-मालक-पालक व महर्षी असलेले माननीय दत्ता मेघे हे सध्या भारतीय जनता पक्षाच्या पुढार्‍यांचे उंबरठे झिजवत आहेत. मागितलेली भिक्षा त्यांनी दडविली नाही. ‘मुलांना द्या’ म्हणजे मुलांना द्या, ‘मुलांना हवे’ म्हणजे मुलांना हवे. गेली चाळीस वर्षे सत्तेची सगळी पदे व त्यावरचे आनंद अनुभवल्यानंतर पंचाहत्तरी उलटलेल्या या मेघ्यांना आता स्वत:साठी काही नको. त्यांचे पोट आणि मन भरले आहे, असे त्यांचे निकटवर्ती सांगतात. (तरीही प. नागपूरची विधानसभेची जागा मिळाली, तर ती लढविण्याचा एक इरादा त्यांचे मन अजून सोडत नाही, असे त्यांच्या निकटवर्तीवर्गाचे म्हणणे आहे.) घरी सारे आहे.  पैसा आहे, गाड्या आहेत, नोकरचाकर आहेत. पण, तरीही सत्तेचे पद नाही. ते द्या आणि त्यांचे कुशलमंगल करा, अशी त्या वृद्ध व तृप्त पित्याची मागणी आहे. भाजपामध्ये बरीच दयाळू माणसे आहेत. ती अशा बाहेरच्यांना सामावून घेण्यासाठी घरातल्यांना जागा रिकामी करायला सांगू शकणारी आहेत. एकट्या नागपुरात त्यांनी काँग्रेसच्या बनवारीलाल पुरोहितांसाठी जागा केली. मग अटल बहादूर सिंग या लोहियावाद्यासाठी केली, राष्ट्रवादीच्या रामदास तडसासाठी केली. आपली माणसे आणखी काही काळ मागे राहतील, तशीही त्यांना मागे राहण्याची सवय आहे. ‘असू आम्ही सुखाने पत्थर पायातील’ ही संघाची कविता त्यांना प्रेरणा देऊन दीर्घ काळ पायातच ठेवू शकणारी आहे. त्यामुळे दत्ताभाऊंना निराश होण्याचे कारण नाही. त्यांच्या दोन पोरांनीही आशा सोडण्याची गरज नाही. संघ परिवार मोठा आहे. तो राजकीय मतभेद पोटात घेतो आणि वैचारिक मतभेदही सांभाळून घेतो. तसे मेघ्यांजवळ वैचारिक म्हणावेसे काही नाहीही. त्यांच्याजवळ जे आहे, ते भाजपाला व त्याच्या पुढार्‍यांना याआधीही चालले आहे व तसे ते पुढेही चालणार आहे. मेघ्यांची खरी अडचण भाजपात नाही. त्या पक्षाच्या दिशेने निघालेल्या त्यांच्या आप्तस्वकीयांच्या लोंढय़ात ती आहे. त्यात त्यांना दिसणारे त्यांचे स्नेही, नातेवाईक, जवळचे व दूरचे असे खूप लोक आहेत. त्यांची गर्दी वाढली, तर आपल्याला आणि आपल्या पोरांना तीत पाय ठेवायला जागा उरेल की नाही, ही त्यांची भ्रांत आहे. राजकारणात वरच्या जागा तशाही थोड्याच असतात. त्या वाढविण्यावरही एक र्मयादा आहे. शिवाय, त्या वाढविण्याचे स्वातंत्र्य आता नागपुरात नाही. ते अहमदाबादेत आहे. त्यामुळे गिरीश गांधी, त्यांचे चिरंजीव निशांत गांधी आणि त्यांच्या मागून येणारे बाकीचे लोंढे दारात पोहोचण्याआधीच जर काही होऊ शकले, तर ते मेघ्यांना हवे आहे. त्यासाठी ते दिल्लीत गेले. संबंधितांना भेटले आणि अश्रूभरल्या डोळ्यांनी ‘काही तरी करा हो,’ असं म्हणून परतले. त्यांच्या आधी आणखीही एका पराभूत वैदर्भीयाने तेथे हजेरी लावली होती. पण, त्यांचे पुढारी सावध. त्यांनी त्याला तत्काळ दोन वर्षांसाठी राज्यसभा देऊ केली आणि त्याचा भाजपाप्रवेश तेवढय़ा काळासाठी रोखला. केंद्रीय नियोजन आयोगावरील एक मराठी सभासद आपला बायोडाटा घेऊन एका दिल्लीकर वजनदाराकडे मेघ्यांच्या उपस्थितीतच हजर झाला. आपला बायोडाटा त्या पुढार्‍यांच्या हाती रीतसर देऊन त्याने त्यांच्या पायांना रीतसर हातही लावला. तो गेला, तेव्हाही मेघे तेथेच होते, असे म्हणतात. असो. मेघे सावध आहेत. त्यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या मार्गात आता आणखी अडसर नको आहेत. सारे असते. पैसा, मान, लोकप्रियता, शिक्षणसंस्था, सलामीसाठी मास्तर-प्राध्यापक, चेलेचपाटे, हाताशी बाळगलेले आणि पोसलेले असे सारेच काही. पण, गाडी साधी असते. तिच्यावर दिवा नसतो अन् तेवढय़ासाठी जीव टाकणारे लोक असतात. प. महाराष्ट्रातले एक असे दिवंगत पुढारी राज्याला ठाऊक आहेत. मरतानाही त्यांच्या तोंडी ‘लाल दिवा, लाल दिवा’ हे शब्द होते, असे म्हणतात. पण, त्यालाच निष्ठा हेही नाव आहे. पवार दिवा देत असतील तर पवार, विलासराव देत असतील तर विलासराव आणि आता गडकरी देणार असतील तर गडकरी. गंमत म्हणजे जो असे काही देईल, ‘त्याच्या पायात आपल्या कातड्याचे जोडे घालायला’ मेघे नेहमीच तयार असतात. त्यांचे असे बरेच कातडे त्या कामी वाया गेल्याची चर्चा जाणकारांत आहे. असो. एवढय़ा भक्तिभावाने आणि श्रद्धाबुद्धीने केलेली कोणतीही तपश्‍चर्या निष्फळ होत नाही. तशी ती मेघ्यांचीही होणार नाही. अखेर दैवते तरी दुसरी कोणती आश्‍वासने देणार असतात.. आणि ती दिली, तरीही ती फुकटच्या शब्दांची असतील. पदे वा दिवे तत्काळ देणारी असणार नाहीत.. नाही का?