शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

दंगल-मंगल

By admin | Updated: March 14, 2015 00:45 IST

शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड.

विजयराज बोधनकर,शुभ आणि मंगल. अशुभ आणि दंगल. मंगल नेहमीच सद्गुणी तर दंगल नेहमी तमोगुणी. दंगल-मंगल हे दोन्ही गुण येतात कुठून? जसं बीज तसं झाड. जशी माणसं तसा गाव. जसा विचार तसा प्रचार. जशी माय-बाप तशी मुलं. जेवढं शिक्षण तेवढीच नोकरी. जेवढे कष्ट तेवढेच यश स्पष्ट. अशीच एक सत्यकथा अनुभवलेल्या आईबापाची. नवराबायको जेमतेम शिकलेले. नवरा दारूडा. बायको जगाच्या दृष्टीने भरकटलेली. तीन मुलं, एक मुलगी इतका त्यांचा परिवार. मोठा मुलगा दहावी नापास. बाकीचे दोघे जेमतेम. मुलगी आठवी नापास. काय करायचं शिकून ! हा आईबापाचा मंत्र. पोरंही तशीच झाली. चलो धंदा करो पैसा लाओ! म्हणून मोठा मुलगा बापाचा धंदा सांभाळू लागला. बापाचा धंदा लायटर दुरुस्त करून देण्याचा. तेवढ्यावर घर चालायचं. हळूहळू पुढची दोन मुले मोठी झाली. दिशा नसल्यामुळे उनाड होत गेली. एकाने लोकांचा पैसा गोळा करून दाम दुप्पटचा धंदा चालू केला. चांगले वीस लाख जमवून पोबारा केला. काही दिवसातच पोलिसांनी पकडला. जेलात घातला. कसाबसा पाच वर्षांनी सुटला. सुटल्यावर घेणेकऱ्यांनी मनसोक्त तुडवला. शेवटी मुलगा वाया गेला. तिसराही मुलगा तसाच निघाला. कुणालातरी मारून यायचा. रोज माणसं घरावर यायची. मग न्यायनिवाडे! मुलगी आईवर गेली. कुणातरी मुलाबरोबर पळून जाणार होती म्हणून बापाने जातीच्या मुलाशी पटकन लग्न करून दिले. पण मुलगी वर्षभरात घरी परतली. दारुडा मुलगा रोज मारतो म्हणून घटस्फोट झाला. सर्वात मोठा मुलगा दारूच्या व्यसनापायी मेला. त्याची बायको विधवा झाली. या छोट्याशा गोष्टीतून एकच उलगडा होतो तो म्हणजे... मुलांच्या आयुष्याचे मार्ग आईवडीलच बदलवितात. त्यांना अज्ञानी ठेवतात. मग सारेच आयुष्यभर दु:खाचा जेल •भोगतात. म्हणूनच जेव्हा बालगणेशाला पृथ्वी प्रदक्षिणा घालावयास सांगितले तेव्हा त्याने चक्क शिव-पार्वतीला प्रदक्षिणा घातल्या. ही पुराणातली गोष्ट ज्या आई-बापांना उमगली त्यांचं भलं झालं. देव, नियती कुणाचंही वाईट करीत नसते. माणूस जे ठरवतो ते घडतं. कुणाला जगवायचं असेल तर माणूस त्याला जगवितो. कुणाला मारायचं ठरवलं तर त्याला तो मारतो. देवळात जाऊनही जे पालक देवासारखे वागत नाहीत त्यांच्या घरात नाश करणारे सर्वनाशीच जन्म घेतात. मातृदेवो-पितृदेवो भव: या मंत्राचा जागर जिथे असतो तिथे घराचंच देऊळ बनतं. जशी जिजाबाई तसे शिवराय. जसा चाणक्य तसाच चंद्रगुप्त. आईवडील हेच पहिलं विद्यालय जन्मभराच्या विद्येचं. उच्च शिक्षणानेच माणूस मोठा होतो असं नसून उत्तम संस्काराने माणूस मोठाच बनतो हे मात्र सत्य.