शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

करी लाभाविण प्रीति

By admin | Updated: December 29, 2016 03:32 IST

विश्वसाहित्याचे एक मोठे भांडार ‘आई’ नावाच्या प्रासादिक दालनाने समृद्ध झाले आहे. ‘आई’ हा वैश्विक साहित्याचा स्फूर्तीस्त्रोत आहे. निर्हेतुक प्रेम, वात्सल्य, मार्दव, जिव्हाळा, धृती

- डॉ. रामचंद्र देखणेविश्वसाहित्याचे एक मोठे भांडार ‘आई’ नावाच्या प्रासादिक दालनाने समृद्ध झाले आहे. ‘आई’ हा वैश्विक साहित्याचा स्फूर्तीस्त्रोत आहे. निर्हेतुक प्रेम, वात्सल्य, मार्दव, जिव्हाळा, धृती, या सद्गुणाने नटलेली ‘आई’ ही एक सात्विक मूर्ती आहे. जगातील सर्व भाषांमध्ये आई या विषयावर विपुल साहित्य निर्मिती झाली आहे व मातृत्वाचा आदर्श उभा राहिला आहे. भारतीय संस्कृतीने देव, आई, आणि गुरू किंवा संत यांच्या ठायी आपला श्रद्धाभाव समर्पित केला आहे आणि मानवी जीवनात त्यांना सर्वोच्च स्थान दिले आहे.प्रेमवात्सल्याचे ज्ञानरुप म्हणजे देव, प्रेमवात्सल्याचे बोधरुप म्हणजे संत किंवा गुरू तर प्रेमवात्सल्याचेच भावरुप म्हणजे आई होय. मराठी साहित्यात महाकाव्यापासून कवितेपर्यंत तत्वज्ञांच्या तत्वचिंतनापासून लहान मुलाने लिहिेलेल्या निबंधापर्यंत, प्रदीर्घ कादंबरीपासून ललित-कथेपर्यंत संतांच्या अभंगवाणीपासून जात्यावरच्या ओवीपर्यंत, पुराणकथांपासून कहाण्यांपर्यंत, सर्व वाङ्मय प्रकारात आईचे दर्शन उदात्तपणे डोकावते आहे. आईचे अंत:करण संतांनी जेवढे जाणले, तेवढे इतर कोणीही जाणले नाही. संत आईच्याच वृत्तीने जनमानसावर वात्सल्यभावाचा नित्य वर्षाव करीत आले. आचार्य अत्र्यांनी ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ या पुस्तकातील आजची आषाढी या चिंतनात्मक लेखात मातृभावाने ओथंबलेल्या संतवाणीचे यथार्थ विवेचन केले आहे. ते म्हणतात ‘देवाची भक्ती आणि आईची प्रीती यात संतांना मुळीच फरक दिसत नाही’. संतांनी आपल्या जीवनात भक्तीरसाला महत्वपूर्ण स्थान दिले पण या भक्तीरसाला त्यांनी वात्सल्यभावाचे स्वरुप दिले आहे. देव भेटावा यापेक्षाही देव समजावा, देव कळावा ही संतांची धारणा आहे. अडाणी माणसांना देवाची ओळख कशी करून द्यायची? माणूस महापंडित झाला म्हणून का तो देवाला ओळखू शकेल? पण आईला कोणीही ओळखतो म्हणून मातेच्याच रुपाने देवाला कल्पून संतांनी त्याला आळविले आहे.देव आणि संत ओळखण्यासाठी आई हेच माध्यम वापरतो आहे. देवांची आणि संतांचे गुणवर्णन करण्यासाठी आईच्या वृत्तीतील सद्गुणांचे दाखले दिले आहेत. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा एक अभंग प्रसिद्ध आहे, ‘लेकुराचे हित। वाहे माऊलीचे चित्त।। ऐशी कळवळ्याची जाती।करी लाभाविण प्रीती।।’आई ही लाभावीण प्रीत करणारी कळवळ्याची जाती आहे. निर्हेतुक प्रेमाची उत्तुंगता म्हणजे आई. संतांनी कधी देवाची कधी संतांची, कधी श्रुतीची तर कधी सद्गुरुंची उपमा आईला देवून तत्वज्ञानाचे सिद्धांत आणि सदाचाराचे प्रबोधन घडविताना ठायीठायी आईचेच दृष्टांत दिले आहेत.