शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

पाळणाघर कायदा हवाच

By admin | Updated: June 13, 2017 05:13 IST

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही

आधुनिक युगातील स्त्रियांना आईपणाची निसर्गदत्त जबाबदारी पाळताना, नोकरी, व्यवसाय आदी महत्त्वाच्या जबाबदाऱ्याही आता पाळाव्या लागतात. पती-पत्नी दोघांनाही नोकरी-व्यवसायासाठी बाहेर पडावे लागल्याने त्यांना आपल्या मुला-मुलीला सांभाळण्यासाठी पाळणाघराची मदत घ्यावी लागते. मूल अगदी लहान असेल, तर पाळणाघरात त्याला ठेवून जाणे महिलांसाठी फारच गैरसोयीचे ठरते. त्यांचा शारीरिक, मानसिक ताण त्यांच्यावर येतो. अशा महिलांचे प्रमाण मोठे असल्याने खासगी, सरकारी किंवा कोणत्याही संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या व्यावसायिक संकुलात पाचशेपेक्षा जास्त महिला काम करीत असल्यास तेथे स्वतंत्र पाळणाघर चालविणे बंधनकारक करावे, अशी शिफारस राज्य महिला आयोगाने केली आहे. राज्य शासनाने महिलांना दिलासा देण्यासाठी पाळणाघरविषयक कायदा करावा, अशी मागणीही आयोगाने केली आहे. खरे तर विशिष्ट महिला कर्मचारी संख्या असली तर पाळणाघर हवेच, असे नियम आहेत. पण त्यांचे अस्तित्व फक्त कागदोपत्रीच असल्याने यासंबंधी थेट कायदाच करावा, असा प्रस्ताव राज्य महिला आयोगाने केला आहे. काही पाळणाघरांत बालकांची हेळसांड होते, काही ठिकाणी तर त्यांना अमानुष मारहाण होत असल्याचे प्रकार काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासन, स्वयंसेवी संस्था आणि खासगी व्यक्तींमार्फत चालविण्यात येत असलेली पाळणाघरांसाठी स्वतंत्र कायदा, तसेच कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण विभागाने नुकताच घेतला होता. पण अद्याप त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. या पार्श्वभूमीवर महिला आयोगाने पाळणाघरांसंबंधीचा अहवाल मुख्यमंत्री-राज्यपालांना दिला आहे. मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत शासकीय आस्थापनांतच जिथे पाळणाघरांची सोय नाही, तेथे खासगी क्षेत्रातील याविषयीची उपेक्षा काय वर्णावी?