शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त कर्जासाठी निधी संकलनाचा खर्च महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 06:31 IST

व्याजदर बाह्य संदर्भ दरांशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. रेपो दर कमी केले तरी बँका कर्जावरील व्याजदर कमी करीत नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अनेकदा नाराजी व्यक्त केली होती.

रिझर्व्ह बँकेने ४ एप्रिल २०१९ रोजी जाहीर केलेल्या आपल्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली असून, आता तो ६ टक्के करण्यात आलेला आहे. सदरच्या कपातीला प्रतिसाद म्हणून सर्व बँकांनी कर्जावरील व्याजदरात त्याप्रमाणात कपात करून तो फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

व्याजदर बाह्य संदर्भ दरांशी जोडण्याचे निर्देश दिले आहेत. रेपो दर कमी केले तरी बँका कर्जावरील व्याजदर कमी करीत नसल्यामुळे रिझर्व्ह बँकेने अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळेच गृहकर्ज तसेच वैयक्तिक व लहान उद्योगांना दिल्या जाणाऱ्या कर्जाचे व्याजदर हे बाह्य संदर्भ दरांच्या आधारे निश्चित करावेत व सदरची व्यवस्था १ एप्रिल २०१९ पासून लागू करावी, असे निर्देश रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी, डिसेंबर २०१८ मध्ये बँकांना दिले होते. त्यासाठी रेपो दर तसेच सरकारी रोख्यांवर मिळणारा परतावा आदी पर्याय रिझर्व्ह बँकेने दिले होते. परंतु बहुतांश बँकांना या संदर्भात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन रिझर्व्ह बँकेने सदरचा निर्णय काही दिवस पुढे ढकलला आहे. स्टेट बँकेने मात्र येत्या १ मेपासून ‘रेपो’ दराशी सुसंगत असे ठेवी व कर्जावरील व्याजदर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेपो दराशी संलग्न व्याजदर १ मे २०१९ पासून लागू करण्यात येणाºया व्यवस्थेनुसार स्टेट बँक एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची बचत खाती, अल्पमुदतीची कर्जे, ओव्हर ड्राफ्ट व कॅश क्रेडिट खात्यांवरील व्याजदर हे रेपो दराशी संलग्न ठेवणार आहेत. म्हणजेच रेपो दरामध्ये ज्या प्रमाणात वाढ अथवा घट होईल त्याच प्रमाणात ठेवी व कर्जावरील व्याजदरांमध्ये बदल करण्यात येईल. बचत खात्यावरील व्याजदर ठरविताना स्टेट बँक रेपो दरापेक्षा २.७५ टक्के व्याजदर कमी ठेवेल. सध्या रेपो दर ६ टक्के आहे. याचाच अर्थ ज्या खातेदारांच्या बचत खात्यांमध्ये एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम आहे, त्यांना ३.२५ टक्के दराने तर एक लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम असणाºया बचत खातेदारांना ३.५० टक्के दराने व्याज मिळेल.

सध्या स्टेट बँक एक कोटी रुपयांपर्यंतच्या बचत खात्यांवर ३.५ टक्के दराने तर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम असणाºया बचत खात्यांवर चार टक्के दराने व्याज देते. स्टेट बँकेच्या एकूण बचत खात्यांपैकी जवळपास ३३ टक्के बचत खात्यांतील रक्कम ही एक लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याने कोट्यवधी बचत खातेदारांना या बचत खात्यांचे व्याजदर रेपो दराशी संलग्न करण्यामुळे मोठा आर्थिक फटका बसणार आहे. निधी संकलनाचा खर्च कमी व्हावा म्हणून बचत खाती जास्तीत जास्त उघडावीत यासाठी सर्वच बँका अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत. रिझर्व्ह बँकेचे धोरण मात्र नेमके त्याच्याशी विसंगत आहे.

स्टेट बँक एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची अल्पमुदतीची कर्जे, ओव्हर ड्राफ्ट व कॅश क्रेडिट खात्यांवरील व्याजदर हे रेपो दराशी जोडणार आहेत. सदरचे व्याजदर निश्चित करताना स्टेट बँक रेपो दरापेक्षा २.२५ टक्के दर जास्त आकारेल. सध्या रेपो दर ६ टक्के आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजदर ८.२५ टक्के इतका असेल.बँकांना कर्जावरील व्याजदर निश्चित करताना निधी संकलनासाठी करावा लागणारा खर्च हा सर्वात महत्त्वाचा असतो. प्रत्येक बँकेचा हा खर्च वेगवेगळा असतो. या खर्चात बँकांना करावा लागणारा प्रशासकीय खर्च व नफा म्हणून २ ते ३ टक्के तसेच रिस्क प्रीमियम मिळवून कर्जाचे व्याजदर ठरवावे लागतात. बँकांना रोख राखीव निधीच्या स्वरूपात चार टक्के रक्कम रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवणे बंधनकारक असून, या रकमेवर रिझर्व्ह बँक व्याज देत नाही.बँकांना मुदत ठेवीवरील व्याजदर ठरविताना महागाईचा दर, रोखतेची उपलब्धता, बाजारात इतर गुंतवणूक योजनांवर दिले जाणारे व्याजदर इ. बाबी महत्त्वाच्या असतात. तसेच रेपो दर कमी झाला म्हणजे बँकांचा निधी संकलनाचा खर्च कमी झाला, असे नसते. कारण बँकांच्या बाबतीत मुदत ठेवींची मुदत संपल्याशिवाय व्याजदरामध्ये बदल करता येत नाही. तसेच इतर गुंतवणुकीचे व्याजदर जास्त असले तर मुदत ठेवींवरील व्याजदरात बँकांना कपात करता येत नाही. त्यामुळे बँकांच्या ठेवीवरील तसेच कर्जावरील व्याजदर हे रेपो दर अथवा सरकारी रोख्यांवरील गुंतवणुकीवर मिळणाºया परताव्याच्या आधारे निश्चित करणे अयोग्यच नव्हे तर घातकही आहे.- कांतिलाल तातेड । अर्थतज्ज्ञ