शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: इथे ओशाळली माणुसकी...

By किरण अग्रवाल | Updated: May 27, 2021 07:58 IST

Coronavirus News: ​​​​​​​आपत्तीलाही संधी मानून तिचा लाभ उचलू पाहणारे जेव्हा आढळून येतात, तेव्हा संवेदनशील मनाच्या लोकांचे हळहळणे स्वाभाविक असते, यातही व्यावसायिकतेतील पै पैशाच्या लाभापलीकडे जाऊन जेव्हा कुणाकडून निर्मम अगर संवेदनहीनतेचा प्रत्यय घडविणारे वर्तन घडून येते, तेव्हा चीड वा संताप आल्याखेरीज राहात नाही.

- किरण अग्रवालआपत्तीलाही संधी मानून तिचा लाभ उचलू पाहणारे जेव्हा आढळून येतात, तेव्हा संवेदनशील मनाच्या लोकांचे हळहळणे स्वाभाविक असते, यातही व्यावसायिकतेतील पै पैशाच्या लाभापलीकडे जाऊन जेव्हा कुणाकडून निर्मम अगर संवेदनहीनतेचा प्रत्यय घडविणारे वर्तन घडून येते, तेव्हा चीड वा संताप आल्याखेरीज राहात नाही. मृताच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या अशा प्रकरणात खरंतर संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे, परंतु तेही धड होत नसल्याचाच अधिकतर अनुभव येतो. सद्यस्थितीतील कोरोनाच्या संकटात अशीच काही उदाहरणे पुढे आल्याने समाजमन अस्वस्थ होणे क्रमप्राप्त ठरून गेले आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरू पाहात असल्याचे दिलासादायक वर्तमान आहे. देशातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट वाढून ८९.२६ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे तर पॉझिटिव्हिटी दरही ९.५४ टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत असून, मृत्यूदरही १.१४ टक्‍क्‍यांपर्यंत घटला आहे. चेन्नईमधील गणित विज्ञान संस्थेतील संशोधक सितभ्र सिन्हा यांनी केलेल्या संशोधनानुसार या महामारीशी संबंधित ‘आर’ संकेतांक प्रथमच ०.८२ एवढ्या नीच्चांकी पातळीवर पोहोचला आहे, ज्यातून कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे संकेत मिळतात. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जागोजागी लागू करावे लागलेले कडक निर्बंध हळूहळू काही प्रमाणात शिथील केले जात आहेत. अर्थात कोरोना गेलेला नाहीच, मात्र तो आटोक्यात येत असल्याचे संकेत पाहता, ‘फीलगुड’ म्हणता यावे, अशी स्थिती आहे. जनमानसातील भीतीचे वातावरण ओसरायला यामुळे मदत व्हावी, परंतु एकीकडे असे होत असताना दुसरीकडे माणुसकीला नख लावणारे प्रकार समोर येत असल्याने भीतीची जागा अस्वस्थतेने घेणे स्वाभाविक ठरून गेले आहे.

तिकडे प्रयागराजमध्ये शेकडो शव गंगेत वाहून येत असल्याचे दूरचित्रवाणी माध्यमातून बघायला मिळाले असताना, नदीकाठी वाळूत पुरलेल्या प्रेतांवरील चादरी व त्याभोवती रोवले गेलेले बांबू काढून नेल्याचा दुर्दैवी प्रकार पुढे आला आहे. मनुष्य इतका कसा स्वार्थांध, माणुसकीशून्य व संवेदनाहिन होऊ शकतो, असा प्रश्न हे चित्र पाहून पडावा. आपल्याकडचेच उदाहरण घ्या, एकीकडे रुग्णालयात दाखल झालेला एकेक जीव वाचविण्यासाठी वैद्यकीय सेवकांचा मोठा वर्ग अविरत सेवा देत प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, दुसरीकडे अपवादात्मक संख्येत का होईना काहीजण सेवा व विश्वास या संकल्पनांशी फारकत घेत याहीस्थितीत आपला व्यवसाय मांडून बसल्याच्या तक्रारी आहेत. केवळ पैसे लाटण्यासाठी चक्क मृतदेहावर तीन दिवस उपचार केले गेल्याचा प्रकार नांदेडात पुढे आला असून, मृतकाचा चेहरा दाखविण्यासाठी म्हणजे अंतिम दर्शनासाठी पैसे मागितले जात असल्याचा प्रकार साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये घडल्याची तक्रार ऐकावयास मिळाली. विदर्भातील खामगावमध्ये रुग्णाच्या शिल्लक बिलापोटी महिलेचे मंगळसूत्र ठेवून घेतले गेल्याची बाब समाजमाध्यमात व्हायरल झाली, तर नाशकात मेडिक्लेमचे पैसे कंपनीकडून पदरात पडूनदेखील रुग्णाची अनामत रक्कम परत न दिल्यामुळे संबंधितांना रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन करावे लागल्याची घटना चर्चित ठरली. ही झाली काही प्रातिनिधिक उदाहरणे, परंतु यासारखे लहान-मोठे प्रकार अनेक ठिकाणी घडले ज्यातून संधीसाधूपणाचा निर्मम व क्रूर चेहरा पुढे येऊन गेला.

अशा घटनांचे प्रमाण नगण्य आहे, यापेक्षा सेवाभावाने झटणाऱ्या व अडल्या-नडल्याच्या मदतीला धावून जाणाऱ्यांचे प्रमाण खूप मोठे आहे हे खरे, परंतु मोठ्या पांढऱ्या कॅनव्हासवरील छोटा का होईना काळा डाग हा लक्ष वेधून घेतो, तसे माणुसकीशून्यतेचा अनुभव देणाऱ्या अपवादात्मक घटनांबद्दल होते; म्हणूनच त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. संवेदना इतक्या का ओहोटीला लागल्या की, मनुष्याकडून पशुत्वाचे वर्तन घडावे; हा या संदर्भातून उपस्थित होणारा खरा प्रश्न आहे. ‘नरेचि केला हीन किती नर’ या उक्तीचा प्रत्यय यावा, अशाच या घटना म्हणायला हव्यात. कधी ना कधी जायचे प्रत्येकालाच आहे, परंतु राहायच्या कालावधीत जगण्यासाठी इतकी वा अशी यातायात करावी लागणार असेल तर त्या जगण्याला अर्थ तो काय उरावा? पण दुर्दैवाने भावनाशून्यता वाढीस लागली आहे. कोरोनाचे संकट हे संपूर्ण मानवजातीवरचे संकट आहे, तेव्हा त्याला सामोरे जाताना माणुसकी सोडून चालणार नाही, इतकेच यानिमित्ताने सांगणे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत