शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

जाणीव आणि श्रीमंती

By admin | Updated: February 13, 2015 23:02 IST

अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय...

विजयराज बोधनकर - संकटकाळी अनेक माणसं एकमेकांना सहकार्य करतात. त्यामुळे अनेक संकटांचं निवारण होतं. त्या सहकार्याला जे विसरतात आणि पुन्हा स्वार्थीपणाने वागायला लागतात, तेव्हा त्यांचं हळूहळू पतन होतं. ती माणसं मग सामान्य ठरतात. त्यांनाच जाणीव नसलेली माणसं म्हणतात. पण जाणीव असलेली माणसं नेहमीच सर्वांना घेऊन चालतात. या जाणिवेच्या जाणतेपणामुळे जनमानसांत प्रसिद्धीस येतात. हा त्यांचा जाणतेपणा शुद्ध असतो, सात्त्विक असतो. ही श्रीमंत जाणीव माणसाला असा विचार करायला लावते की, आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी कष्ट घेतले, लहानाचं मोठं केलं ! नात्यागोत्यातल्या मित्रपरिवाराने अडचणीच्या वेळी मानसिक, आर्थिक सहकार्य केलं ! गरिबीच्या काळातही बायकोने काटकसरीने संसार चालविला! विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवावेत म्हणून गुरुजींनी मेहनत घेतली ! योग्यता नसतानाही एका मोठ्या माणसाच्या शिफारशीमुळे नोकरी लागलीे! कुठलंही व्याज न घेता मित्राने रक्कम दिली, म्हणून व्यवसाय बहरला ! या कंपनीत लागलो तेव्हा साधा क्लार्क होतो, पण साहेबांच्या स्फूर्ती आणि सहकार्यामुळे आज मोठ्या हुद्यावर कार्यरत आहे ! अशा हजारो उदाहरणांची पंगत इथे मांडता येईल. जे हे सारं मान्य करतात आणि कृतज्ञता व्यक्त करतात तीच माणसं मोठी होतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्माविभूषण रघुनाथ माशेलकरांनी आपल्या गुरुचा उल्लेख एका भाषणात केला. ते म्हणाले, ‘आमच्या जोशी सरांनी साबण कसा बनवितात हे दाखवायसाठी सर्व विद्यार्थ्यांना कारखान्यात नेले. तिथेच मला संशोधनाची आवड निर्माण झाली. खिशातले पैसे तिकिटासाठी वापरून कारखान्यात घेऊन जाणाऱ्या जोशी सरांमुळेच मी आज शास्त्रज्ञ झालो’ ही कृतज्ञता त्यांनी वयाच्या पंचाहत्तरीत व्यक्त केली. त्यामुळे सारे सभागृह भावनाविवश झाले. हे सांगण्याची श्रीमंत जाणीव माशेलकरांकडे होती. त्यामुळेच त्यांच्या प्रगतीची पाऊले झटपट पडली असावीत. अत्यंत गरिबीतून शिक्षण घेताना रात्र रात्र आई माझ्यासाठी जागायची. तिच्या कष्टामुळेच मी आज इथे दिसतोय... हेही सांगायला ते विसरले नाहीत. म्हणूनच रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, जाणत्याचे पहावे ज्ञान।जाणत्याचे सिकावे ध्यान।जाणत्याचे सुक्ष्म चिन्ह।समजूनी घ्यावे॥जाणीव हीच खरी ईश्वराची पूजा आहे. पण दुर्दैवाने अशा ग्रंथांचा अभ्यास होण्यापेक्षा त्या ग्रंथांचे फक्त गंध, अक्षता, फुलांनी पूजन होते व पालखीतून मिरविले जाते. म्हणूनच अभ्यासनीय कृतीपेक्षा कर्मकांडामुळेच अजाणतेपणा शिल्लक राहतो व दु:खाचा वनवास घडतो.