शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

जुळवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 00:25 IST

एकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्यांच्या वेळचा गाळ स्वच्छ करतात. नवीन पेरणी करतात. जातात. त्याला ते पटलं. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी उघडपणे हो-नाही सध्या म्हटलं जातं.

- किशोर पाठकएकाने विचारले, राम दरवर्षी कसा जन्मतो? तो तर कधीच जन्मला. बरोबर तुही कधी जन्मला? तू वाढदिवस करतो ना पहिल्यापासून शंभरपर्यंत. आपली मजल शंभर खूप. मध्येच गचकतो. आता शोध रामाचा जन्म त्याचा इतका हजार लाखावा वाढदिवस. अरे बाबा संत अधूनमधून जन्म घेतातच. त्यांच्या वेळचा गाळ स्वच्छ करतात. नवीन पेरणी करतात. जातात. त्याला ते पटलं. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी उघडपणे हो-नाही सध्या म्हटलं जातं. विज्ञानवारी ईश्वर नाहीच म्हणतात. हा वाद सनातन आहे. निसर्गाचा समतोल साधण्यासाठी परमेश्वर सतत कार्यमग्न असतो. तो लहान मूल देतो तसा म्हातारा घालवतो. तो काळा-गोरा, सुंदर-कुरूप, सुष्ट-दृष्ट, चांगला-वाईट, रात्र-दिवस चालू असतो. म्हणून तर झाडाला पानगळ असते. जुन्या खोडाला नवी पालवी येते, काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्याेदय होतोच, पुनर्जन्मावर विश्वास असेल तर जन्मतो. म्हणजे हे नक्की नाही. आपल्या सोईने. माणूस एकच समजा नाव नसलेला माणूस असला तर त्याची जात कोणती धर्म कोणता? मूल जन्मते. ज्या मातेच्या पोटातून जन्मते तोच त्याचा धर्म. पुरुषाला महत्त्व तसे नाहीच. एखाद्या स्त्रीने मूल नाकारणे शक्य होते. त्याचा पुरावा असतो स्त्रीच. ज्याला एका स्त्रीने जन्म दिला, दुसरीने वाढविला, तिसरीशी लळा झाला आणि चौथीशी कोण कोणता म्हणून जवळ आला. माणूस एक अतर्क्य गोष्ट आहे. त्याचा शोध घेत राहणे आणि त्याला जोडू पाहणे कठीण. म्हणूनच माणूस अगाध याकरिता. परत त्याचा वेगळेपणा पहा. अगदी जुळ्यांमध्येही फरक असतोच. त्याच भांडवलावर सिनेमे निघाले. जुडवा म्हणजे एक काळा एक गोरा. एक सीता दुसरी गीता. हा ढोबळ समज. पण प्रत्येक माणूस वेगळा. केवळ चेहरा ठेवत नाही. त्याचा अवयव त्याचाच. तो दुसऱ्याशी जुळत नाही. म्हणून जुळवून घेणे ही म्हण झाली. म्हणजे काय? जुळत नाही हे सिद्ध झाले. जुळवून घेतच संसार होतो. भाऊ होतो, राज्य होते, सरकार होते. पाच वर्षे याच्या त्याच्याशी जुळवून घेण्यातच पक्षाची दमछाक होते. जे सत्ताधीश असतात ते विरोधक होतात आणि विरोधक सत्ताधीश. हा खेळ चालत राहतो. या जुळवणीत आपला लाभ करून घेणारे आणि इतरांचा लाभ हिसकावून घेणारेही असतात. प्रथम जुळवून घ्यायचं आणि ते टिकविण्यासाठी खोटं हसायचं तीही कसरतच. म्हणजे प्रथम जोडणे मग जुळवणे नंतर ते टिकवणे तसे भासवणे कठीणच. बघा जुळतंय का?

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकmarathiमराठी