शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाची संभ्रमावस्था!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 05:25 IST

साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात अध्यक्षपदाचे महत्त्व कितपत उरले, हा मुद्दा अलाहिदा;

साहित्य संमेलनाच्या सोहळ्यात अध्यक्षपदाचे महत्त्व कितपत उरले, हा मुद्दा अलाहिदा; पण एक निश्चित, की अध्यक्ष झाल्यानंतर त्या साहित्यिकाला वर्षभर प्रचंड महत्त्व येते. एका अर्थाने मराठी साहित्याचा राजदूत म्हणूनच त्याच्याकडे पाहिले जाते. लोकशाही पद्धतीने अध्यक्षपदाची निवडणूक होत असली, तरी साहित्यिकांचा एक मोठा गट या सर्व प्रक्रियेपासून दूर राहतो. महामंडळ, घटकसंस्था, त्यांचे मतदार, अध्यक्षपदासाठी इच्छुक साहित्यिक, आयोजक संस्थेचा मतांचा कोटा येथपासून ते गेल्या काही वर्षांत जात, भाषा, लिंग, प्रदेशापासूनचे वाद यातून अध्यक्षपदाची निवडणूक केवळ साहित्याच्याच मानदंडाने होते, असे मानले जात नाही. आर्थिक पातळीवरही ही निवडणूक खर्चीक झाल्याची चर्चा ऐकू येते. अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिकांना हा सगळा व्यवहारच मान्य नसल्याने त्यांच्यापासून अध्यक्षपद दूर राहिल्याची उदाहरणेही आहेत. याच पार्श्वभूमीवर, निवडणुकीऐवजी अध्यक्षपद सन्मानाने ज्येष्ठ साहित्यिकाला देण्यात यावे, यासाठी साहित्य महामंडळात साहित्य परिषदेने आग्रही भूमिका घ्यावी, असा ठराव महाराष्ट्र साहित्य परिषदेने एकमताने मंजूर केला आहे. या ठरावाचे सर्व स्तरांतून स्वागतच झाले आहे. प्रश्न उरतो की, हादेखील एक ठरावच राहणार की परिवर्तनाच्या दिशेने पुढचे पाऊल पडणार? समाजातून ज्या प्रतिक्रिया उमटत आहेत, त्यातून येणारा सूर म्हणजे यासंदर्भातील निवडप्रक्रिया कशी ठरविणार? ज्येष्ठ आणि श्रेष्ठ साहित्यिक ठरविणे खरोखरच शक्य आहे का? यावर मराठी साहित्य जगतात सर्वव्यापी मंथन घडण्याची अपेक्षा आहे. साहित्यासारख्या प्रांतातही लोकशाहीचा आग्रह धरून कंपूशाही सुरू ठेवायची का? सध्याची अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पाहता, संपूर्ण मराठी समाजाचे प्रतिबिंब त्यातून उमटू शकत नाही, या आरोपाला उत्तर कसे द्यायचे? १,१८५ मतदार, ज्यांच्यातील अनेकांच्या साहित्यिक जाणिवांबाबत शंका आहेत, त्यांनी निवडलेला अध्यक्ष लोकशाही प्रक्रियेने आला असला तरी योग्यच आहे, असे अनेक प्रश्न आहेत. सन्मानाने पद देण्यासाठीच संभ्रमावस्था असेल, तर त्याइतके दुर्दैव नाही. ज्ञानपीठपासून ते नोबेल पुरस्कार जर निवड पद्धतीने दिले जात असतील, तर अध्यक्षपदी योग्य व्यक्ती का निवडता येणार नाही, याचा विचार करायला हवा. त्यामुळेच मराठी सारस्वतांनी एकत्र येऊन या ठरावाबाबत चर्चा करण्याची गरज आहे. यातूनकदाचित पुढच्या पिढ्यांसाठी एक आदर्श व्यवस्था निर्माण होऊन साहित्य संमेलन खऱ्या अर्थाने मराठी जनांचे होण्यासाठी पुढचे पाऊल पडेल.