शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

अवयव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 00:42 IST

एखादा गायक कायम गात असतो? एखादा अ‍ॅथलेट कायम पळत असतो? एखादा लेखक कायम लिहीत असतो? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हो आहेत. म्हणजे? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?

- किशोर पाठकएखादा गायक कायम गात असतो? एखादा अ‍ॅथलेट कायम पळत असतो? एखादा लेखक कायम लिहीत असतो? तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं हो आहेत. म्हणजे? तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे?प्रत्येक कलाकार कायमच आपल्या कलेतच असतो. त्याला एखादा क्षणच लागतो टिचकी मारायला की लगेच कलाकार डुचमळतो, फुटतो, वाहू लागतो तो निर्मितीचा क्षण. या क्षणी कलावंत पूर्ण कलागम असतो. एरवी तो कलावंत असतोच. त्याला सगळं करावंसं वाटतं. म्हणजे उत्कृष्ट क्रिकेटर फुटबॉल खेळतच नाही असे नाही किंवा एखादा उत्तम गायक चांगलं चित्र काढूच शकत नाही वा चविष्ट भाजी करू शकत नाही, असे नाही. आपण जगण्याच्या प्रत्येक विभ्रमाशी बांधलेलो आहोत. म्हणजे ही कलात्मकता संसारातील प्रत्येक गोष्टीत आपण शोधतोच. तौफिक कुरेशी वाद्यांचं एक माहोल उभे करतात. म्हणजे ते काड्यापेटीपासून टेबलखुर्ची कोणतीही अचल वस्तू ते बोलकी करतात ही त्यांची कला. आपण या क्षणांशी बांधलेलो आहोत. पण हे जगणे माणसाशी, माणूस होणेशी निगडित आहे. म्हणजे एखादा माणूस रस्त्याने त्याच्या कामासाठी चाललेला असतो. क्षणात एखादा अपघात घडतो. त्याच्याजवळ, त्याच्यापाशी. कधी आग लागते. तो डोळ्यादेखत काही जळताना पाहतो, क्षणात तो मागचा-पुढचा विचार न करता पुढे धावतो. आगीतील माणसांना वाचवतो. स्वत:ही जखमी होतो. काजळले पण एक समाधान त्याच्या चेहºयावर असते. ते समाधान माणसांसाठी माणूस होण्याचे, माणूस असण्याचे. असा एखादा क्षण आपण साधत जगत असतो. मुंगी शिस्तीत चालत राहाते. कायम घाईत.सुगरण इवल्याशा चोचीने घरटे बांधते. म्हणून तर सुगरणीचा खोपा म्हणतात. निसर्गाने प्रत्येक प्राणी, पशू, पक्षी ह्यांना एक इंद्रिय दिलंय. कुणाला चोच, कुणाला जीभ, कुणाला दात तर कुणाला शिंग, कुणाला नख अर्थात प्रत्येक प्राणी या संरक्षक कवचाचा वापर युद्धपातळीवरच करतो, फक्त माणूस असाय तो नखं मारतो, दात दाखवतो, जिभेचा वापर करतो. आपल्या प्रत्येक अवयवाचा बरा-वाईट वापर करतो माणूसच त्यातून प्रगती करतो किंवा वाईट कृती करतो. म्हणूनच खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असतात म्हणतात बघा.

टॅग्स :scienceविज्ञान