शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बंद करा ही दुकानदारी

By admin | Updated: November 8, 2016 03:54 IST

केवळ उद्देश चांगला असून भागत नाही, तर त्याच्या पूर्तीची आकांक्षा गरजेची असते. ती नसेल तर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात आदिवासी आणि विमुक्त जाती

केवळ उद्देश चांगला असून भागत नाही, तर त्याच्या पूर्तीची आकांक्षा गरजेची असते. ती नसेल तर काय होते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात आदिवासी आणि विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली आश्रमशाळांची योजना! या शाळांमधील कोवळ्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या पुढारलेपणाची लक्तरे देशभर टांगली गेली असतानाच, बुलडाणा जिल्ह्यातील पाळा येथील आश्रमशाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनींवरील लंैगिक अत्याचारांच्या प्रकरणामुळे तर राज्य सरकारच्या अब्रूचेच धिंडवडे निघाले आहेत. राज्यातील डोंगराळ व दुर्गम भागातील मागास जाती-जमातींमधील विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेता यावे, या चांगल्या उद्देशाने आश्रमशाळांची योजना अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. राज्यात सध्या ५४७ शासकीय, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तेथील विद्यार्थ्यांना भोजन, गणवेश, शैक्षणिक साहित्य व इतर सवलती मोफत उपलब्ध करून दिल्या जातात. या सुविधांवरील तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनादी खर्चाचा संपूर्ण भार शासन पेलते. पण या अनुदानासाठी मोठ्या प्रमाणात दुकानदारी सुरू असल्यानेच पाळासारखी प्रकरणे समोर येतात. विद्यार्थ्यांना सकस भोजनासोबत दूध, केळी, अंडी, टूथपेस्ट, हेअर आॅईल, रेनकोट, स्वेटरही पुरविले जात असले तरी ते केवळ कागदोपत्रीच! प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ होतो. बहुतांश विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सरकार आपल्यासाठी असा काही खर्च करते, याची गंधवार्ताच नसते.दहा वर्षात केवळ १९ आश्रमशाळांमध्ये तब्बल १०७७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे विदारक सत्य डॉ. सुभाष साळुंखे समितीने नुकतेच उघडकीस आणले. त्यापैकी काही मृत्यू नैसर्गिक व अपघाती असले तरी, प्रामुख्याने कुपोषण आणि आरोग्य सुविधांचा अभाव या दोन बाबीच कोवळ्या बालकांच्या जीवावर उठल्याचे स्पष्टपणे दिसते. अर्थात अपवाद म्हणून काही आदर्श आश्रमशाळा व निवासी शाळाही सुरू असून त्यातील काही तर अनुदानाविना सुरू आहेत.शंभरपेक्षा जास्त बेवारस गतिमंद, मूक-बधिर व बहुविकलांग मुलांचे मातापिता झालेल्या शंकरबाबा पापळकरांद्वारे संचलित स्व. अंबादासपंत बालसुधारगृह, बालपणी उकिरड्यावरचं जीणं जगून, आता फासेपारधी समाजातील मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी भीक मागणाऱ्या मतीन भोसलेंची प्रश्नचिन्ह ही निवासी आश्रमशाळा, प्रा. रमेश बुटेरे यांनी अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी येथे साकारलेली आदर्श आश्रमशाळा, डॉ. प्रकाश आमटेंद्वारा नक्षलग्रस्त भागात चालविला जात असलेला लोक बिरादरी प्रकल्प आश्रमशाळा यांसारखी निराशेच्या समुद्रातील आशेची बेटं, अजूनही सगळं काही संपलं नसल्याची उमेद देतात इतकंच. त्यामुळे अब्रूचे निघाले तेवढे धिंडवडे पुरे झाले, असे सरकारला वाटत असल्यास अशा अनुदानित आश्रमशाळांची दुकानदारी सरकारने ताबडतोब बंद करायला हवी. पण म्हणून ही योजनाच बंद होता कामा नये. गरज आहे योजनेच्या प्रामाणिक अंमलबजावणीची! ती कशी करता येईल, याचा आदर्श वस्तुपाठ पापळकर, भोसले, बुटेरे, आमटे यांनी घालून दिला आहे. केवळ स्वपक्षाच्या नेते-कार्यकर्त्यांची पोटं भरण्याची सोय लावण्याऐवजी, सेवाभावी वृत्तीच्या धडपड्या तरुणांचा शोध घेऊन त्यांच्या हाती या आश्रमशाळा दिल्यास, सरकारचा पैसा सत्कारणी लागेल व समाजाच्या वंचित घटकांमधील मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्गही मोकळा होऊ शकेल. फडणवीस सरकारने जलसंधारणाच्या क्षेत्रात सुरेश खानापूरकर, पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी निर्माण केलेल्या आदर्श प्रणालींचा अंगिकार करून जलयुक्त शिवारसारखी एक आशादायी योजना जन्माला घातली. आश्रमशाळा व निवासी शाळांच्या संदर्भातही सरकार तोच कित्ता गिरवू शकते. तसे झाले तरच या क्षेत्रातही महाराष्ट्र उर्वरित देशासमोर एक आदर्श उभा करू शकेल. - रवी टाले